AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon Building Collapse : ते पूजा करण्यासाठी आले आणि बघता बघता संपूर्ण इमारतच कोसळली…

Jalgaon Building Collapse : जळगावमध्ये एका इमारतीत चार जण पूजा करण्यासाछी गेले होते. ते आत जातात न जातात तोच ती तीन मजली इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि एकच कल्लोळ माजला...

Jalgaon Building Collapse : ते पूजा करण्यासाठी आले आणि बघता बघता संपूर्ण इमारतच कोसळली...
| Updated on: Aug 30, 2023 | 1:20 PM
Share

जळगाव | 30 ऑगस्ट 2023 : शहरातील शिवाजी नगर येथे मंगळवारी मोठा अपघात झाला. तेथे एक तीन मजली इमारत अचानक कोसळली (building colllapsed) आणि मोठा गोंधळ माजला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चार लोक दबले होते. अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्यांच्यापैकी एका महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. राजश्री सुरेश पाठक (वय ७५) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या शिवाजी नगर येथे असलेली ही इमारत 74 वर्ष जुनी होती. राजश्री यांची ही बिल्डींग होती मात्र तेथे कोणीच राहत नव्हते. या इमारतीचे मालक असलेले पाठक कुटुंबिय येथे कधीतरी पूजा करण्यासाठी यायचे. मंगळवारी देखील राजश्री पाठक व इतर तिघे पूजेसाठीच तेथे आले होते. मात्र सकाळी साठेआठच्या सुमारास ही तीन मजली इमारत अचानक कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकाचे अधिकारी तेथे तातडीने दाखल झाले व मदत कार्य सुरू झाले.

तिघांना वाचवण्यात यश

त्यानंतर तिघांना वाचवण्यात यश आले, त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र राजश्री या ढिगाऱ्याखालीच अडकल्या होत्या. तब्बल पाच तासाच्या शोध मोहिमेनंतर त्या सापडल्या व त्यांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली.

महापालिकेने इमारत पाडण्याची नोटीस दिली होती

दरम्यान ही इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे इमारत पाडण्याबाबत महापालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. ती रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संबंधित कुटुंबांना नोटीस देण्यात आली होती असे समजते.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.