AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे धुण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाही, काळ बनलेल्या नदीने अचानक गिळले? टिटवाळ्याच्या काळू नदीजवळ असं काय घडलं?

कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे काळू नदीत कपडे धुताना दोन बहिणी रिया आणि सिना अन्सारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्या बुडाल्या. अग्निशमन दलाने दोघींचेही मृतदेह सापडले. हा हृदयद्रावक प्रकार संपूर्ण परिसरात हळहळ निर्माण करणारा आहे.

कपडे धुण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाही, काळ बनलेल्या नदीने अचानक गिळले? टिटवाळ्याच्या काळू नदीजवळ असं काय घडलं?
| Updated on: Sep 11, 2025 | 11:31 AM
Share

नशिबापुढे कोणाचं काहीही चालत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. पण महाराष्ट्रातील टिटवाळा परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या काळू नदीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला. या दोघीही कपडे धुण्यासाठी नदीकिनारी गेल्या होत्या. मात्र काही क्षणात या दोन निरागस बहिणींना काळाने हिरावून घेतले. ही घटना कल्याण तालुक्यातील मांडा पश्चिमेतील वासुद्री रोड परिसरात घडली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी कल्याणजवळील टिटवाळा परिसरात काळू नदीच्या काठावर गणेश नगरात राहणाऱ्या दोन बहिणी या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. १८ वर्षीय रिया अन्सारी आणि तिची ९ वर्षांची धाकटी बहीण सिना अन्सारी या दोघीही दुपारच्या वेळी नदीत कपडे धुवत होत्या. यावेळी त्या दोघीही एकमेकींसोबत गप्पा मारत होत्या. यावेळी एकीने त्यांच्या मोबाईलमध्ये कपडे धुतानाचा एक व्हिडीओही रेकॉर्ड केला. पण हा व्हिडीओ त्यांच्या आयुष्यातील शेवटचा व्हिडीओ असेल, याची कल्पनाही त्यांना नसावी. यानंतर काही क्षणातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

रिया आणि सिना कपडे धुवत असताना अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान झाला की त्या दोघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही. यानंतर क्षणातच, पाण्याचा लोंढा त्यांना खोल पाण्यात घेऊन गेला. त्या दोघी बहिणी डोळ्यादेखत बुडाल्या. त्यावेळी मदतीसाठी कोणीही जवळ नव्हते. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

दोघींचे मृतदेह सापडले

या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस आणि केडीएमसी अग्निशमन दलाच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर, दोन तासांनी १८ वर्षीय रियाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, सिनाचा शोध सलग २८ तास सुरू होता. अखेर, तिचा मृतदेह कल्याण गांधारी खाडी परिसरात पाण्यावर तरंगताना आढळला.

दरम्यान ज्या नदीकिनारी त्या हसत-खेळत गेल्या होत्या, त्याच नदीने त्यांना कायमचे हिरावून घेतले. यामुळे अन्सारी कुटुंबात आक्रोश आणि दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दोन बहि‍णींचा कपडे धुतानाचा एक व्हिडिओ आता फक्त आठवण म्हणून उरला आहे. ज्यामुळे कुटुंबाला अश्रू अनावर होत आहे. या घटनेने संपूर्ण टिटवाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...