AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई; FDA च्या अधिकाऱ्यांनी नामांकित बेकरीला ठोकले टाळे

तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई केली आहे. मुंढे यांच्या FDA अधिकाऱ्यांनी नामांकित बेकरीला टाळे ठोकले आहे. एफडीए विभागाच्या कारवाईची चर्चा सर्वत्र होत आहे.

तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई; FDA च्या अधिकाऱ्यांनी नामांकित बेकरीला ठोकले टाळे
prince bakeryImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 2:46 PM
Share

सुनील जाधव : कल्याणमधील नामांकित बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट बेकरी सील केली आहे. लाकडाची भट्टी वापरून पाव निर्मिती होत असल्याची तक्रार होती. या भट्टीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर आणि प्रदूषण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकरींना एलपीजी, पाईप गॅस किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यानंतरही भट्टी मालकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने एफडीएने कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील नामांकित प्रिन्स बेकरीवर एफडीएने कारवाई करत बेकरी सील केली. पाव तयार करण्यासाठी लाकडाची भट्टी वापरली जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. या भट्टीतून निघणाऱ्या धूरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असून प्रदूषण वाढत असल्याचीही तक्रार होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील बेकरींना लाकूड आणि कोळशाच्या भट्ट्यांऐवजी एलपीजी, पाईप गॅस किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर एफडीएने बेकरीला टाळे ठोकले. या कारवाईमुळे शहरातील इतर बेकरी व्यावसायिकांमध्येही नियमपालनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बेकरी कर्मचारी नसीम खान यांनी म्हटलं की, लाकूड, कोळशाचा वापर केला जात असल्याने भट्टी सील केली. बाकीच्या भट्टी चालू आहेत. भट्टीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जात होता. त्यामुळे कारवाई केली. नोटीस पाठवलेली नाही. आम्ही आता नोटीसची वाट पाहत आहोत. प्रिन्स नावाची बेकरी सील केली आहे’. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने परिरात खळबळ उडाली आहे.

चेंबूरमधील बेकरीवरही धाड

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी चेंबूरमधील नामांकित अशफाक बेकरीवर अन्न व औषध विभागाने कारवाई केली. अन्न सुरक्षा आणि स्वच्छता निकषांचा उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना निलंबनाची कारवाई प्रलंबित आहे. चेंबूरमधील सम्राट अशोक नगर, आर.सी. मार्ग या भागातील या बेकरीची विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी अहवालानुसार, बेकरीला 156 गुणांपैकी 56 गुण हे मिळाले. या निकालानुसार, नियमांचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे नोंदवण्यात आले.

Follow Us
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...