AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पुण्यातील त्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन अखेर मागे, नेमकं प्रकरण काय?

Devyani Pardhi : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील पोषण आहाराच्या दर्जाबाबत अंगणवाडी सेविकेने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता ते निलंबन मागे घेण्यात आले आहे.

TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, पुण्यातील त्या अंगणवाडी सेविकेचे निलंबन अखेर मागे, नेमकं प्रकरण काय?
Devyani Pardhi Suspension RevokedImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 21, 2026 | 4:46 PM
Share

अंगणवाडीतील लहान मुलांना आणि गरोदर मातांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट असल्याचा दावा करत सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. टीव्ही 9 मराठीने हा मुद्दा उचलून धरला होता. आता अखेर प्रशासनाने देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली आहे. त्यामुळे सेविकेला दिलासा मिळाला असून, आता पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रशासन पुढे काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पोषण आहाराचा मुद्दा उचलल्याने अंगणवाडी सेविकेचे केले होते निलंबन

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अंगणवाडीत पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते.

काय म्हणाल्या होत्या देवयानी पारधी?

लहान मुलांना कुपोषणापासून मुक्त करण्यासाठी अंगणवाड्यांमधून पोषण आहार दिला जातो. मात्र, याच पोषण आहारासाठी पुरवण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेवर देवयानी पारधी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये पांढरा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. ‘9 ते 10 शिट्ट्या काढूनही वाटाणा शिजत नाही आणि भरडा शिजवल्यानंतरही कच्चाच राहतो. असा आहार आम्ही लहान मुलांना कसा खाऊ घालायचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

तुकाराम मुंढेंकडे केली होती मागणी

या निकृष्ट कच्च्या मालामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, हा मुद्दा सोशल मीडियावर मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून देवयानी पारधी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

अखेर निलंबन मागे

मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेविकेवरच कारवाई का करण्यात आली? पोषण आहाराचा कच्चा माल नेमका कोणत्या दर्जाचा आहे? या प्रकरणाची प्रशासनाकडून सखोल चौकशी होणार का? असे प्रश्न टीव्ही 9 मराठीने उपस्थित होत होते. मात्र आता देवयानी पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

Follow Us
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?