
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज माफीच्या आंदोलनासाठी बच्चू कडू आज हजारो कार्यकर्त्यांसह ट्रॅक्टर घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना होणार. उद्या बच्चू कडू यांची नागपूरमध्ये एल्गार सभा आहे. त्यासाठी बच्चू कडू आज नागपूरसाठी रवाना होत आहेत. जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही लेखी स्वरूपात मिळत नाही, तोपर्यंत आता माघार नाही अशी बच्चू कडूंची भूमिका आहे.
नाशिक ते दिल्ली दरम्यानची रात्रीची विमानसेवा सुरू झाली आहे. खासदार भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे यांनी नव्या विमानाने थेट दिल्लीकडे केले प्रस्थान. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीसाठी जात असल्याची भास्कर भगरे यांची माहिती. “नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून त्याच विमानातून मी शेतकऱ्यांसाठी दिल्लीकडे जात आहे” अशी प्रतिक्रिया खासदार भगरे यांनी दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मीरा भाईंदरमधील जसल पार्क येथे आज छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी
शेकडो उत्तर भारतीय कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने सूर्याला अर्पण केले अर्घ्य
महानगरपालिकेकडून उत्तम नियोजन आणि स्वच्छतेची व्यवस्था
महिलांच्या गीत, पूजा आणि आरतीने वातावरण भक्तिमय.
संपूर्ण परिसरात आनंद आणि श्रद्धेचे वातावरण
महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणी उद्या वडवणी शहर बंद
फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर वडवणी तालुक्यातील रहिवासी
उद्याच्या बंदमध्ये सर्व संघटना आणि सर्व पक्ष सहभागी होणार
आरोपींना कडक शिक्षेची मागणी
–
‘गडकरींना नव्या कार्यालयात बोलवा. कारण गडकरी म्हणजे बाहेरचे म्हणजे सावजी चिकन. आता भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सतरंजी उचलण्यासाठी एक अधिकृत कार्यालय झालं. मी निष्ठावंताना सांगतो. त्यांच्याकडे अंधभक्तीत राहू नका.’, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही. म्हणून पैसे देऊन मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न आहे. इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहे. वाईट वाटतं अशा लोकांना आपण पोसलं कसं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहे. मी काय दिलं तुम्हाला. तुम्ही काय दिलं हे शिवसेनाप्रमुखांनी विचारलं तर काय सांगाल. कितीही अमित शाह आले तरी आपली धमक हरवू देऊ नका. चहा वाला पंतप्रधान झाला. चहावर जीएसटी लावणारा पंतप्रधान. हा कुठला न्याय आहे.’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
निवडणुकीच्या दिवशी मतदारयादी फोटोनिशी पोलींग एजंटच्या हातात पाहिजे. चेहऱ्याने ओळखणाऱ्यालाच पोलींग एजंट नेमा. बोगस मतदार आढळला. मतदान करायला आला तर तुडवा. निवडणूक आयोग ऐकत नसेल तर बोगस मतदाराला मतदान करू देऊ नका. भाजपवाले भुरटे चोर आहे.
अमित शाहाचं कार्ट क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटने झालं. मेरिटने झालं. आणि घराणेशाही कुणाची ठाकरेंची. अरे उभा राहून दाखव. त्या अब्दालीला सांगायचं. आमच्या आईवडिलांचे ऋण माणणारे पाईक आहोत.
वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे गटाचा निर्धार मेळावा सुरु आहे. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदी शाहांवर टीका केली. अमित शाह यांचा अप्रत्यक्षरित्या एनाकाँडा असा उल्लेख करत टीकास्त्र सोडलं. त्यांना मुंबई गिळायचीय. पण त्यांना मुंबई कशी गिळू देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही.
निफाड तालुक्यात गोई नदीला पूर
लहान-मोठे बंधारे फुटल्याने गोई नदीचे रौद्र रूप
गोई नदीच्या पाण्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
गोळेगाव, गोंदेगाव, मरळगोई परिसरात पूरस्थिती, शेतकरी हवालदिल
.
शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला आहे. या पदाधिकाऱ्यांची फसवणूक करून भाजपच्या विशाल परब यांनी भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता असा दावा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. अशा पद्धतीने फसवणूक प्रवेश घडवून आणल्यास विशाल परब यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा संजू परब यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने भात कापणीच्या वेळेस हजेरी लावल्याने हाता तोंडाशी आलेली भात शेती कुजून गेली आहे. आधीच कंबर्डे मोडून गेलेला शेतकरी त्यामुळे हैराण झाला आहे. भात शेतीचे नुकसान झाल्याने सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना येणाऱ्या दहा तारखेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अल्टीमेंटम दिला आहे. चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना ऊसाला पहिली उचल 3751 रुपये दर द्यावा अन्यथा कारखाना चालू देणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. आज वसंतदादा सहकारी साखर करखान्या समोर आंदोलन करीत निवेदन देण्यात आले.
मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. यावर ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्याचा मोर्चा’, ‘झालाय लोकशाहीवर वार, उधळून टाकू निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
नागपूर – प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला ‘महा एल्गार’ मोर्चा मंगळवारी दुपारी नागपुरात पोहोचणार आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ५०० च्या वर पोलीस सभास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
नांदेड – जय जवान जय किसान म्हणत शेतकऱ्यांनी मुदखेडच्या तहसीलदाराची गाडी फोडली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असताना अधिकारी मस्त खुर्चीवर बसतात, असा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांना अनुदानाची मदत मिळाली नसल्याचाही आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. तर गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी 6 हजार 290 रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांची माहिती
रत्नागिरी : खेड तालुक्यातील शिवतर, कोडबा, जामगे आणि परिसरातील गावांना शाश्वत पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने उभारण्यात आलेल्या शिवतर-कोडबा धरणाचे जलपूजन आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रकल्पातून प्रत्यक्ष पाणी वाटपाला सुरुवात झाली असून या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
ठाणे : भाजप विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ कळवा रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. यावेळी पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक उपस्थित आहेत. चित्रा वाघ यांनी रुग्णालयातील आकडेवारीबद्दल माहिती घेतली आहे. गेल्या काही दिवसात प्रसूतीगृहात बेड नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याचीच माहिती चित्रा वाघ यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. अमित शाहांच्या हस्ते भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवक निशाणा साधला. “भाजप काचेच्या घरात राहत नाही,हमारे उपर पत्थर फेकने का प्रयास मत करना. जागा बळकावण्याची सवय असणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये” असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला. तसेच ‘मुंबईत चांगलं प्रदेश कार्यालय असावं अशी आमची इच्छा होती’ असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. अमित शाहांच्या हस्ते भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी रविंद्र चव्हाणांनी भावना व्यक्त करत “लवकरच नवीन वास्तूमध्ये जाणार” असं त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन आहे. अमित शाहांच्या हस्ते भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित.
रणजीत निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्या आरोप तरूणींनी केला आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणजीत निंबाळकरांनी अनेक ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप अंधारेंनी केला आहे. फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळतंय असा सवालही अंधारेंनी विचारला आहे.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी काढलेल्या महाएल्गार मोर्चाला अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून सुरुवात. शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. उद्या बच्चू कडू यांचा नागपूरला महाएल्गार मोर्चा आहे.
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दारात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 22 हजार 500 रुपयांवर आले आहे. तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 51 हजार रुपयांवर आले आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 26 हजार 175 रुपयांवर आले आहेत तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर आले आहे
महाराष्ट्रातील 31% महिलांना कामाच्या ठिकाणी संरक्षण भेटत आहे. पोलिसांची तक्रार डॉक्टर विरोधात आणि डॉक्टरांची तक्रार पोलिसांविरोधात होती. फिट अन फिट संबंधित तक्रार होते. डॉक्टरची तक्रार होती रात्रीच्या वेळी आरोपी आणले जातात. 3 वेळा त्यांची बदली झाली असती… मात्र त्यांनी फलटण रुग्णालय हवय असं सांगितल असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
अमरावती- कर्जमाफीसाठी बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसह काही वेळातच अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून नागपूरकडे कूच करणार आहेत. शेकडो ट्रॅक्टर काही वेळातच नागपूरकडे कूच करणार आहेत. बच्चू कडूंच्या मोर्चात अनेक दिवसांची जेवण्याची, राहण्याची व्यवस्था घेऊन शेतकरी आंदोलन सहभागी झाले आहेत. अन्नधान्य, कपडे, झोपण्यासाठी चादरी ,भाजीपाला घेऊन शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी ही बच्चू कडूंची प्रमुख मागणी आहे.
“समाजाला दिलेला शब्द आज खरा ठरला असा वाटतोय. मी आजही विकृतीविरोधात बोलतोय, भाजपविरोधात नाही. निलेश घायवळ कसा पळाला, तो विषय अजून संपलेला नाही. या लढाईत शिंदेंनी मला कुठेही अडवलेलं नाही. शिंदेंचा शब्द खरा ठरला, त्यांचे मी आभार मानतो. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो,” असं धंगेकर म्हणाले.
सर्वसामान्य मतदारांचा रोष एक नोव्हेंबरच्या ‘ सत्याच्या मोर्चा’त दिसू द्या. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा. निवडणूक आयोगाच्या चुकीच्या कार्यप्रणाली बाबत प्रेझेंटेशन माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत लोकांशी याबाबत उघडपणे बोला. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या चुका, यादीतील घोळ, कार्यप्रणालीतील राजकीय हस्तक्षेप या सर्व गोष्टींबाबत पुरावे जमा करून लोकांशी बोला, असे आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले.
“प्रशांत बनकर आणि बदने हजर झाले. यामध्ये सर्व गोष्टी संशयास्पद वाटतात. फिजिकली फिट असणं काय प्रकरण? बीडमधून अनेक ऊसतोड मजूर तिथे आणले जातात. अत्यंत अमानुष पद्धतीने कारखानदार त्यांच्याकडून उचली वसूल करून घेतात. रणजितसिंह निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावरती उड्या मारत आहेत”, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला.
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. “काल फलटणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले आणि रणजित निंबाळकर यांना त्यांनी क्लीन चीट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी अशा कित्येक जणांना क्लीन चीट दिली आहे. महिला डॉक्टरने लिहिलेलं हातावरील सुसाईड नोट हे तिचं हस्ताक्षर नाही,” असा खुलासा अंधारेंनी केला.
येवल्यात खतांच्या दरवाढीविरोधात छावा क्रांतिवीर सेना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना सोबत घेत पुणे-इंदोर महामार्गावर येवला बाजार समितीच्या समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फलटणमध्ये दाखल झाल्या आहेत. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणा संपूर्ण आढावा घेण्यासाठी त्या पोहोचल्या आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. फटलण उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी घटनेचा आढावा घेतला.
पुण्याील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मालमत्ता सध्या गोखले बिल्डरच्या नावाने आहे. याबाबत ट्रस्टीची भूमिका गुलदस्त्यात आहे. मोहोळ यांनी गोखलेंना व्यवहार रद्द करायला सांगितलं. प्रकरण मिटलं नाही तर ट्रस्टींना जाब विचारणार आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.
पुण्याील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बिल्डर विशाल गोखलेंची जमीन व्यवहारातून माघार घेतल्याचं कळतंय. गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्यात आलं असून ट्रस्टीदेखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक आहे.
गंधार कलासंस्थेकडून दरवर्षी कला क्षेत्रातील मान्यवरांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांना जाहीर करण्यात आला आहे. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार घोषित करण्यात आला. येत्या १४ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा शानदार सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पुण्यातील जैन समाजाच्या होस्टेल आणि मंदिराच्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीच्या विरोधात मालेगावात सकल जैन समाज आक्रमक झाला आहे. या निषेधार्थ मालेगावातील जैन मंदिर परिसरातून भव्य मोर्चा काढण्यात आला, जो अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी संतप्त जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी करत जमिनीचा हा बेकायदेशीर व्यवहार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. समाजाच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना सादर करून संबंधित व्यवहार त्वरित रद्द करण्याची मागणी केली.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची भक्कम एकजूट कायम राहील असा दावा आठवले यांनी केला. ते म्हणाले की, या एकजुटीमुळे महायुतीच्या उमेदवारांवर मतांची लयलूट होईल आणि महाविकास आघाडीत मात्र भरून न निघणारी मतांची तूट पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, मनसेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. तसेच, निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएम मशीनवर जे आरोप केले जात आहेत, ते खोटे आहेत. महाविकास आघाडी जरी निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार असली, तरी मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार, अशी चर्चा असल्याचे मत रामदास आठवले यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याने त्याला मोठे बळ मिळाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांना फोनवरून संवाद साधत आभार मानले. काँग्रेस पक्षाने दिलेल्या या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानत, आता केवळ पाठिंबा न देता काँग्रेस पक्षाने देखील या मोर्चात थेट सहभागी व्हायला पाहिजे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत सलग दोन दिवस महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत. आज नंदुरबार, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या १० जिल्ह्यांच्या स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. या बैठकांमध्ये स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन महापालिका निवडणुकीत कुठे महाविकास आघाडीसोबत जागा वाटप करायचे आणि कुठे स्वबळाचा नारा देत पक्षाची ताकद वाढवायची, यासंबंधी सविस्तर रणनितीवर चर्चा होणार आहे.
माजी जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड भाजपच्या गळाला. उद्या मुंबईत पक्षप्रवेश करणार. रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे नागेंद्र राठोड भाजपच्या गळाला लागले आहेत.
जळगावात शाहूनगरनजीक एका मॉलमधील चित्रपटगृहातील शौचालयामध्ये गेलेल्या तरुणीचे शेजारील शौचालयातून अर्धनग्न चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ वर्षीय तरुणी चित्रपट संपल्यानंत शौचालयात गेली. त्यावेळी शेजारील शौचालयातून एक मुलगा मोबाइलमध्ये तिचे चित्रीकरण करीत असल्याचे तिला दिसले. याबाबत तरुणीने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना. बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी शिवदास भालेराव याने केली आत्महत्या. सिन्नर तालुक्यातील रहिवासी असून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी केली होती अटक , जून 2024 पासून कारागृहात भोगत होता शिक्षा
सध्या सोलापूर मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु आहे. मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेता आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना 1 नोव्हेंबर पासून दररोज करता येणार सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रवास
दिल्लीतील भाजप कार्यालय बघायल तर व्हाईट हाऊस मागे पडले, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी 83 वर्षाच्या माजी आमदार डॉ.नारायण मुंडे यांचा टोकाचे आंदोलन करण्याचा इशारा. सरकारने योग्य पद्धतीने प्रकरण हाताळले नाही तर बीड ते फलटण काटीच्या आधारावर पायी जाणार – माजी आमदार नारायण मुंडे
रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे नागेंद्र राठोड भाजपच्या गळाला लागले आहेत. राठोड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या 28 ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत.
“भाजप आहे म्हणून मोहोळ आहे. माझी लढाई संपलेली नाही, सुरु झालीय. पुणे जैन बोर्डिंग व्यवहार दोन्ही बाजूने रद्द झाला पाहिजे” अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.
जालना जिल्ह्यात वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्याने बियाणं पडलं उघडं. कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे अनुदान देखील खात्यावर जमा झाले नसल्याच शेतकऱ्यांच म्हणणं. बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द गावासह आसपासच्या परिसरात पावसामुळे कपाशीचे नुकसान.
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याला चांगलेच झोडपले. गेल्या सहा महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष शेती धोक्यात. द्राक्ष बागेला फळधारणा न झाल्याने लासलगाव जवळील वेळापूर येथील राजेंद्र विठ्ठलराव पालवे या शेतकऱ्याचा टोकाचं पाऊल. 30 ते 32 लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर झाल्याने चार एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. गेल्या तीन-चार वर्षांपासून अस्मानी संकटामुळे लाखो रुपयांचा तोटा होत असल्याने नैराश्यापोटी कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय.
मुंबईच्या पश्चिम उत्तर महामार्गावर अंधेरी-विलेपार्लेपासून कलिना सिग्नलपर्यंत वाहतुकीचा खोळंबा. पुलाचे काही भाग घेऊन एक मोठा ट्रक या ठिकाणाहून भल्या पहाटे निघाल्याने दक्षिण मुंबई बांद्राकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू. पंधरा ते वीस मिनिटं वाहतूक उशिराने सुरू असल्याची माहिती. दिवाळीच्या सुट्टीनंतर नोकरदार आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामानिमित्त निघाले. मात्र वाहतूक कोंडीचा बसला फटका.
नाशिकमध्ये आज जैन समाज उतरणार रस्त्यावर. पुण्यातील बोर्डिंग आणि मंदिर जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणी नाशिक मधील जैन समाज आक्रमक. अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला जाणारा मोर्चा. विरोधी पक्षांसह उतरणार रस्त्यावर. मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन.