
गोंदिया येथे मागच्या सहा महिन्यांपासून डिझेल निधी नसल्याने 102 रुग्णवाहिकांची चाके थांबली आहेत. बीजीडब्ल्यूसह ग्रामीण भागातील रुग्णवाहिका जागेवरच. रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. बाई गंगाबाई महिला रुग्णालयासह, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात एकूण 56 रुग्णवाहिका आहेत. प्रत्येक रुग्णवाहिकेचा महिन्याकाठीचा खर्च 80 हजार रुपये आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने या समस्येत वाढ. येत्या आठ दिवसात शासनाने निधी उपलब्ध न करून दिल्यास या 56 रुग्णवाहिकांची चाके थांबण्याची शक्यता. परिणामी बिकट समस्या निर्माण होऊ शकते. नियोजित गृहप्रकल्पाच्या चौथ्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील काळेपडळ भागात घडली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नाशिक येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक झाली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चौकशी केली आहे.
एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री गावात चार ते पाच जण तरुणाला काठी, पायातील बुट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे..
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने पुन्हा नवा विक्रम नोंदविला आहे. सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचे दर Gst सह 97 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत.
नाशिकमध्ये शिवसेना उबाठा गटाचा निर्धार मेळावा अधिवेशनात आदित्य ठाकरे बोलत असताना त्यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली. तसेच फडणवीसांची नक्कलही केली. “आता नाराजीनाट्य सुरु होईल, शिंदे अमरावतीतून थेट गावी जाणार असल्याची खोचक टीका केली आहे. तसेच आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांच्या भाषणाच्या शैलीची नक्कल केली.
भिडे गुरुजींना कुत्रा चावल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र त्यानंतर त्या प्रसंगावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावर आता माजी आमदार राजू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,” दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो बहुतेक भिडे गुरुजी विसरले असतील, असं खोचक वक्तव्याचं ट्वीट मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. राजू पाटलांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे. भिडेंच्या आडून राजू पालटलांना दुसऱ्याच कोणावर निशाणा साधायचा आहे का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
अमरावती विमानतळ लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाबद्द तसेच मोदींचे भरभरून कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, “मोदींनी अमरावतीला टेक्सटाईल पार्क दिलं आहे.मोदींच्या कार्यकाळात आपल्याला मोठी भेट मिळाली आहे. देशातील 7 पैकी 1 टेक्सटाईल पार्क अमरावतीत असणार आहे. या टेक्सटाइल पार्कचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, एवढंच नाही तर अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल सुरु होणार असून यामुळे अमरावतीचे नाव आता जगाच्या नकाशावर येत आहे” असं म्हणत फडणवीसांनी टेक्सटाईल पार्कच्या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे तसेच त्याचे कोणते फायदे आहेत हे देखील सांगितलं आहे. तसेच विदर्भ आता लवकरच दुष्काळमुक्त होणार असल्याचं आश्वासनही त्यांनी जनतेला दिलं आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांना एक लाखाचा दंड. कांचन गायकवाड यांच्याकडून बेकायदेशीर बांधकाम प्रकरणातील राज्य माहिती आयुक्त यांचा दिशाभूल करण्यात आली.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत योग्य माहिती न पुरवता बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य माहिती आयुक्त शेखर चन्ने यांची दिशाभूल करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चन्ने यांनी याची गंभीर दखल घेऊन कांचन गायकवाड यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
ठाणे जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यास मनाई केल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला होता. मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन अशा शाळांवर कारवाई करावी असे निवेदन दिले होते.
या निवेदनाची शिक्षण विभागाने तात्काळ दखल घेत, विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश काढले आहेत.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
“भाजपला कमळाबाई हे नाव बाळासाहेब यांनी ठेवलं होतं. त्याचं बारसं बाळासाहेब यांनीच केलं होतं. बाळासाहेब द्रष्टे होते, जाहीर सभेत ठेवलं नाव ठेवलं होतं,” असं संजय राऊत म्हणाले.
“आम्ही लढणारी लोकं आहोत. सत्ता आमचा ऑक्सिजन नाही. शिवसेना सत्तेवर फार कमी वेळा गेली. संघर्ष करण्यात आमचं आयुष्य गेलं. सत्तेसाठी काही जण गेले, काहीजण लाचारी, हुजरेगिरी करताना आम्ही पाहतोय. काहीजण कुंपणावर असतात, उड्या मारतात. राज्याची जनता अस्वस्थ आहे. सत्ता परिवर्तन झालं त्याच्याशी जनता सहमत नाही. जनतेला आम्हाला बरोबर घ्यायचं आहे,” असं राऊत म्हणाले.
वसई- आई आणि मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला वसई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2015 मध्ये एका हिऱ्याच्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीने तुलिंज पोलीस ठाणे हद्दीत निर्घृणपणे आईमुलाची हत्या केली होती.
या प्रकरणात केवळ घटनाक्रमावर आधारित पुरावे (परिस्थितिजन्य पुरावे) गृहीत धरून आरोपीला वसई सत्र न्यायालयाने काल मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरण मकवाना (वय 45) असं जन्मठेप मिळालेल्या आरोपीचं नाव असून सोनाली चव्हाण (वय 32) आणि कुणाल चव्हाण (वय 12) असं हत्या झालेल्या मायलेकाची नावं आहेत.
ससूनमध्ये तज्ज्ञांचं अहवालातील निष्कर्षावर एकमत होत नसल्याने अहवाल सादर होण्यास विलंब होत आहे. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी ससूनमध्ये तज्ज्ञांचा अहवाल थोड्याच वेळात ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांच्याकडे सादर होणार आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनमधील 6 तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल रात्री उशिरा तयार झाला. ससूनचे डीन एकनाथ पवार आज सरकारला अहवाल पाठवणार आहेत.
ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या तिघांवर ठाण्यात कारवाई झाली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातविरुद्ध लखनऊ सामन्यासाठी सट्टा लावला होता. सट्टा खेळणाऱ्या किरण शेट्टी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई केली आहे. या पथकाने 12 एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये छापा टाकला होता.
येत्या १ मे पर्यंत राज्य सरकारने गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर बैठक बोलावली नाही, तर कामगार रस्त्यावर उतरून सरकार विरुद्ध एल्गार पुकारतील,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी आजच्या कामगार आणि वारसदारच्या सभेत दिला आहे.
नाशिकमध्ये जमावाच्या दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी. दगडफेक करणाऱ्या 15 लोकांना घेतले पोलिसांनी ताब्यात. 57 संशयास्पद मोटरसायकली पोलिसांकडून जप्त. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करावा लागला सोम्य बाळाचा वापर. पोलीस उपयुक्त किरण कुमार चव्हाण यांच्याकडून रात्री घडलेल्या घटनेची माहिती
धाराशिव जिल्ह्यातील 621 सरपंच पदाच्या आरक्षणाची आज निघणार सोडत. धाराशिव जिल्ह्यातील एकूण मुदत संपणाऱ्या 621 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर. धाराशिव जिल्ह्यात खुल्या प्रवर्गासाठी ३४२, ओबीसी १६६, एससी १०० तर एसटीची १३ सरपंचपदे झाली आरक्षित. ६२१ पैकी ३११ पदे महिलांसाठी ठेवण्यात येणार राखीव. आज सकाळी ११ वाजता होणार आरक्षणाची सोडत, ग्रामविकास मंत्रालयाकडून देण्यात आल्या सूचना.
नाशिकमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत होणार शिबिर. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांचे शिबिर आयोजित. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर. 3 सत्रांमध्ये दिवसभर चालणार शिबिर टेक्निकल टीम ,वकिलांची फौज देखील करणार शिबिरात मार्गदर्शन. आधुनिक तंत्रज्ञान ai द्वारे होणार बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण