
“महिलांना रूढी पूर्तीच्या जाळ्यातून बाहेर काढून त्यांना मोकळं रान द्यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन. आपल्या देशातील 142 कोटी समाज जेव्हा देशासाठी कार्य करेल तेव्हा देशाचा विकास होईल, देशाचे भाग्य बदलेल. केवळ मूठभर लोकं काम करतील तर त्यामुळे देशाचे भाग्य बदलणार नाही. महिला घटक उभारणे गरजेचे आहे, कारण त्याचं देशाचे भाग्य बदलू शकतात” असं मोहन भागवत म्हणाले. सोलापुरातील उद्योगवर्धिनी या महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त मोहन भागवत सोलापुरात आले होते. जालन्याच्या घनसावंगी मंठा आणि परतूर या 3 तालुक्यात सर्व जोरदार पावसाची हजेरी. 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाचं जोरदार कमबॅक. शेतकऱ्यांच्या शेतात साचलं पाणी,तळ्याच स्वरूप प्राप्त. पावसामुळे सुकलेल्या पिकांना मिळालं जीवदान तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात झालं नुकसान. घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव आणि पानेवाडी शिवारात शेतकऱ्यांची सोयाबीन गेली पाण्याखाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मिरा भाईंदरमध्ये घेणार सभा
सभेसाठी मनसेकडून मोठी तयारी
सभेपूर्वी राज ठाकरे यांचे मनसे पदाधियाकाऱ्यांकडून केलं जाणार जंगी स्वागत
राज ठाकरे यांचे पाहिले स्वागत हे बोरिवली येथील देवीपाडा मेट्रो स्थानक जवळ करण्यात
विधानभवन परिसरातील राड्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, लहानपणी अंगणवाडीत जसे वाद व्हायचे तसे आता विधानसभेत होत आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवायचे म्हणून एखादा वाद पुढे आणला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याची सन 2024-25 च्या ऊस गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम न मिळाल्यान ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. 40 ते 50 शेतकऱ्यांनी पुण्यातील साखर संकुलात साखर आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, निवडणुकीत सत्ताधारी कर्ज माफी करू असे म्हणाले होतेस मात्र ते फक्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम करत आहेत.
मिरा रोडच्या जोधपुर स्वीट आणि नमकीन दुकान मालकाच्या मारहाणीनंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी-हिंदी भाषेचा वादाला मोठे तोंड फुटले आहे. आज राज ठाकरे यांचे याच दुकानासमोरील ओम शांती चौकात जंगी स्वागत करण्यात येणार आहे
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जग विकसित भारताच्या संकल्पावर चर्चा करत आहे. यामागे भारतात दिसणारे बदल आहेत ज्यावर विकसित भारताची इमारत बांधली जात आहे. या बदलांचा एक प्रमुख पैलू म्हणजे भारताची पायाभूत सुविधा. त्यात सामाजिक, भौतिक आणि डिजिटल अशा सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचा समावेश आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा हा गुन्हा आहे. खरंतर, काल विधान भवनात झालेल्या हाणामारीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाबाहेर धरणे आंदोलन केले, त्यानंतर त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथेही त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यानंतर मुंबई पोलिसांनी आता पोलिसांच्या कामात अडथळा आणण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही भाषेची सक्ती लागू होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं. कोणत्याही भाषेला आमचा विरोध नाही, पण सक्ती नको असं त्यांनी यावेळी सांगितलं.
विधानभवनात मारमारी करणारे कडवे डावे की कडवे उजवे होते, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे याने जनसुरक्षा विधेयकावर तोंडसुख घेतलं. विधेयकात स्पष्टता आणावी असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच काय तर दहशतवादी विरोधी बिल असेल तर आमचा पाठिंबा असेल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात मुसळधार पाऊस पुराच्या फटक्यामुळे एसटी महामंडळाला 40 लाख रुपयांच्या तोटा झाला आहे. पुरामुळे अनेक भागात एसटी महामंडळाची सेवा ठप्प पडली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सध्या हुमणी अळीने हैराण झाला असून संकटात सापडला आहे, हुमणी अळीमुळे अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन शेती खराब होत असून शेतकऱ्यांनी त्यावर ट्रॅक्टर फिरविणे सुरू केले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे मत समीर भुजबळ यांनी जळगावात बोलताना व्यक्त केले आहे.
मुंबईतील काळबादेवी येथील 120 वर्ष जुनी स्वदेशी मार्केट इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तिचा पुनर्विकास करण्याच्या मागणीसाठी मराठी-गुजराती यांनी एकत्र आंदोलन केले आहे.
मुंबईत १४ मेट्रोचं काम सुरु आहे. एकूण ३३० किलोमीटरचे जाळे होणार आहे. कुलाबा -बीकेसी – सीप्झ असा संपूर्ण भुयारी मेट्रो मार्ग – ३ हा येत्या ऑक्टोबरपर्यंत सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत केली आहे.
शिक्षकांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मारहाण केल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संस्थाचालकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाशी सेक्टर 31 मधील व्ही फाईव्ह लिविंग लिक्विड्स या वाईन शॉपमध्ये चोरी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी दुकानाचं शटर आणि लॉक तोडून दारु चोरी केली होती. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी तब्बल 17 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या दारूच्या बॉटल टेम्पोमध्ये टाकत चोरी केल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दहिसर येथून दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. त्यानंतर या दोघांनी गुन्हा कबूल केलाय. वाशी पोलिसांनी दारूच्या बॉटल, गुन्ह्यात वापरलेला टेम्पो आणि चोरीसाठी वापरलेले हत्यार असा एकूण 9 लाख 33 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
वाशी सेक्टर 31 मधील व्ही फाईव्ह लिविंग लिक्विड्स या मद्यविक्री दुकानाचे शेटर आणि लॉक तोडून विविध कंपन्यांच्या दारूच्या बॉटल चोरी करण्यात आल्याची घटना घडली होती. या चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीने वाशी पोलीसांनी अटक केली आहे.
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध भोंग्यांचा मुद्दा चर्चेत आहेत. अशात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अवैध भोंग्यांवरुन भाष्य केलं आहे. अवैध भोंगे आढळल्यास कारवाई होणार, असं फडणवीस विधानसभेत म्हणाले.
राज्यात 30 हजार 802 पोलिसांची भरती केली, हा रेकॉर्ड असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पोलिसांच्या अजुनही 13 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना दिली.
सध्या सोशल मीडियावर आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दिसत आहेत. तेथे रोहित पवार आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये बाचाबाची झाली. एक पोलीस अधिकारी हातवारे करत रोहित पवार यांच्याशी बोलत होता. ते पाहून रोहित पवार यांना राग अनावर झाला. त्यांनी मोठ्या आवाजात त्या अधिकाऱ्याला सुनावले. ते पाहून पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे.
आमदार रोहित पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर व्यक्त केलेल्या रोषा विरोधात पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. रोहित पवार यांच्यावर 353 नुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली. राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. शरद पवार कधीच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला वाकड्या शब्दात बोलले नाही. मात्र रोहित पवार तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर मुंबईतील आझाद मैदानावर पोलीस बॉईज संघटनेकडून निदर्शने केली जाणार आहेत.
ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष प्राशन केल्याने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 20 महिन्यांपुर्वी झालेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करत त्यांनी विष प्राशन केले होते. आता मराठा क्रांती मोर्चाच्या कुंदाताई काळेंनी जिल्हा रुग्णालयात जाऊन ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली आहे.
मला सूचना आहेत म्हणून मी शांत आहे, त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. मला जास्त बोलायला लावू नका असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला.
कल्याण पूर्वेत आरक्षण जागेवर कचरा प्रकल्प, स्थानिक नागरिक आम आदमी पार्टी व भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
परवानगी व हरकत न मागता मनमानी पद्धतीने सुरू केल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन करत विरोध दर्शवला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विधान भवनात काल झालेल्या राड्यावरून विधान परिषदेत वातावरण तापलं. विधानभवनाचे पास कोण विकतंय सांगू का ? बाहेर कोण-कोण पास विकतंय हे नाव घेऊन सांगू, अनिल परब यांचा इशारा.
ते हल्लोखर प्लान करून आले होते, मला मारायला आले होते. 5 जणं मारायला आले होते, पण एकालाच अटक केली. – जितेंद्र आव्हाड
आम्हाला फसवलं गेलं अशी माझी आणि जयंत पाटील यांची भावना आहे. आंदोलन करण्याचा आम्हाला संवैधानिक अधिकार आहे – जितेंद्र आव्हाड
शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने बदनापूर शहरात करण्यात आला रास्ता रोको… वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी… पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात… महायुती सरकारने सत्तेमध्ये येण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची पदाधीऱ्यांसह शेतकऱ्यांची मागणी
सहकार नगर परिसरातील एका गुंडाने पोलीस स्टेशनमध्ये घातला राडा… पोलीस स्टेशनमध्ये गुंडाकडून तोडफोड… राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव… पोलीस ठाण्यात तोडफोड करत खिडक्यांच्या फोडल्या काचा… कोंबिंग ऑपरेशन मध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये आणण्यात आलं होतं… याचवेळी सराईत गुन्हेगाराने पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला असल्याची माहिती… पोलीस स्टेशन मधील कॉम्प्युटर देखील फोडलं… पुण्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आलाय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय
संगीता चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना दिले होते आदिवासी प्रमाणपत्र… आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली अधिवेशनात घोषणा
समोरचा आरोपी काल हॉस्पिटलमध्ये एकटा मज्जा करत होता… तो आरोपी मकोकाचा आहे… पाच पाच जण मारायला होतो, मात्र एकाला ताब्यात घेतलं… चुकी कोणाची आहे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे… असं वक्तव्य जितेंद्र अव्हाड यांनी केलं आहे.
काल विधान भवनात घडलेल्या घटनेचा निषेध करत, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आज पुन्हा विधान भवनाबाहेर मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन केले. आव्हाड यांचे हजारो समर्थक, संतप्त पदाधिकारी देखील यात सहभागी होते. निषेध नोंदवण्यासाठी आणि आपल्या नेत्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले. यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की ते शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचेही ऐकणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची आहे. या शक्तिप्रदर्शनादरम्यान, कार्यकर्त्यांनी पोलिसांना हात न उचलण्याचे आवाहन करत आव्हाड यांना भावनिक साद घातली.
महाविकासआघाडीचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाले आहे. काल विधानभवनात झालेल्या राड्यानंतर आज मविआचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे. तसेच जनसुरक्षा विधेयकावर स्वाक्षरी न करण्याची मागणी केली जाणार आहे.
आम्ही आमच्या घरची माणसंही अधिवेशनात आणलेली नाही. काही पक्षाचे लोक पक्षाचे चिन्ह लावून खुलेआम वावरतात. काल थोडक्यावर भागलं, आळा घातला नाही तर भयानक होईल. हे घडणारचं होतं. विधानभवनाचा गेट सेल्फी पॉईंट झालाय अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.
विधानसभा अध्यक्ष कालच्या घटनेच्या कारवाईसंदर्भात १.३० वाजता बोलणार आहेत. यापुढे विधानभवनात कमी लोकांना प्रवेश देण्यात येणार, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तरानंतर कारवाईसंदर्भात राहुल नार्वेकर बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे.
धुळे तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरणी होऊनही पावसाअभावी पिके कोमजू लागली आहेत. पुरेसा पाऊस नसल्याने पिकांवर विविध प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव देखील वाढू लागला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जर येत्या आठ दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी, सरकारने दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी धुळ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जळगाव बाजार समितीत ज्वारीला ३ हजार ३७१ रुपये क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. तीनच दिवसात ज्वारीच्या दरात ११०० रुपयांची वाढ झाली आहे. जळगाव बाजार समितीमध्ये २२०० रुपये क्विंटल एवढा भाव असलेल्या ज्वारीचा दर ३ हजार ३७१ रुपयांवर पोहोचला आहे.
गोंदियातील 42 हजार शेतकऱ्यांचे 413 कोटींचे धान चुकारे रखडले आहे. तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाही. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिकवणीसाठी गेलेल्या 11 वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न उधळून लावला. आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी रात्रीतून दोन अपहरणकर्त्याना बेड्या ठोकल्या. चिमुकलीच्या आजोबांकडूनच दीड कोटी रुपयांची खंडणीसाठी हा अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. संदीप पवार, बाबासाहेब मोरे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष भगवान पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाची माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचे भाजप प्रवेश निश्चित. पुढच्या आठवड्यात या दोन नेत्यांसह समर्थकांचा होणार भाजप प्रवेश. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने रखडला होता सुनील बागुल आणि मामा राजवडे यांचा भाजपा प्रवेश.
पती-पत्नीच्या वादातून पतीने केली आत्महत्या. पत्नीने ही इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथील रात्री उशिराची घटना. पतीने स्वतःच्या छातीवर चाकूने वार करत केली आत्महत्या
जालना जिल्ह्यात जवळपास 57 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ही योजना सुरू झाल्यानंतर जालना जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 5 लाख 42 हजार 392 अर्ज दाखल झाले होते.
8 जुलै रोजी पोलिसांचा बंदी आदेश झुगारून मनसैनिकांनी आणि मराठी नागरिकांनी उत्सफूर्त मोर्चा काढला होता आणि त्याच अनुषंगाने मनसैनिक आणि मराठी नागरिकांना शाबासकीची थाप देण्यासाठी राज ठाकरे आज मिरा रोड येथे येत आहेत. मुंबईची लाईफलाईन रेल्वेत ही राज ठाकरेंच्या आजच्या सभेची चर्चा आहे.