Maharashtra Breaking News LIVE : शिवसेनेला मोठा धक्का, प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : शिवसेनेला मोठा धक्का, प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये
live breaking
| Edited By: | Updated on: Aug 11, 2025 | 7:58 AM

आज सकाळी महाराष्ट्रात विविध ठिकाणी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहाटेपासूनच बारामतीमधील विकासकामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात तीन हत्ती चौक आणि एसटी बसस्थानकाचा समावेश आहे. विकासकामांच्या पाहणीनंतर त्यांच्या सहयोग निवासस्थानी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या 31 व्या वर्षा मॅरेथॉनचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाले. 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. ज्यात 20,000 हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या मॅरेथॉनमध्ये विविध गटांसाठी शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. दरम्यान, महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून 11 ऑगस्ट रोजी राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करत हे आंदोलन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दुपारी 12 वाजता होणार आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत. यासह महाराष्ट्र, देश विदेशातील महत्वाच्या, राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Aug 2025 06:55 PM (IST)

    नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे भुसावळ स्थानकावर जल्लोषात स्वागत

    आज 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते पुणे वंदे भारत उद्घाटन विशेष गाडीचे लोकार्पण करण्यात आले. या गाडीने पहिला प्रवास करताना भुसावळ रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

  • 10 Aug 2025 06:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरवरून पुन्हा धावणार नवीन वंदे भारत ट्रेन

    छत्रपती संभाजीनगरहुन धावणारी वंदे भारत ट्रेन आता नांदेडहुन धावत आहे, आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहुन मुंबईला जाणारे प्रवासी नाराज झाले होते. आता येत्या तीन ते चार महिन्यात पुन्हा एकदा वंदे भारत सुरू होणार असल्याची माहिती भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.

     

  • 10 Aug 2025 06:38 PM (IST)

    बीड: धुळे-सोलापुर महामार्गावर बिंदुसरा धरणाजवळ ट्रक पलटी होऊन अपघात

    बीड तालुक्यातील पाली परिसरातील बिंदूसरा धरणाजवळ आज दुपारी धुळे-सोलापूर महामार्गावर पाऊस सुरू असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ट्रक मध्ये असलेल्या शिमला मिरचीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. बिंदुसरा धरणाच्या अगदी जवळच हा अपघात झाला असुन सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही पर्यटक किंवा इतर वाहने उभी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

  • 10 Aug 2025 06:15 PM (IST)

    गोंदिया – एक दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

     

    गोंदिया जिल्ह्यात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे गोंदियाकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दुपारी ऊन तापल्यानंतर अचानक पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, तर या पावसामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या धान पिकाला देखील फायदा झाला आहे.

     

  • 10 Aug 2025 05:04 PM (IST)

    सांदोशी मार्गावर दोन एसटी बसचा भीषण अपघात

    सांदोशी मार्गावर दोन एसटी बसचा भीषण अपघात

    किल्ले रायगडच्या पायथ्याची असणाऱ्या सांदोशी मार्गावर दोन एसटी बसेसचा भीषण अपघात

    सांदोशी गावाजवळ असणाऱ्या मुख्य वळणार एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक

    तीन प्रवासी गंभीर जखमी

    माणगाव- पाचाड मार्गावरील सांदोशी गावाजवळ घडला अपघात

     

  • 10 Aug 2025 04:51 PM (IST)

    गोंदिया जिल्हात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    एक दिवसाच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

    उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

    धान पिकाच्या शेतीला पावसाचा फायदा

    पावसामुळे शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

  • 10 Aug 2025 04:09 PM (IST)

    नांदुरा – बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळला

    नांदुरा – बुऱ्हाणपूर मार्गावरील भिंगारा घाटात भीषण अपघात

    ट्रक दीडशे ते दोनशे फूट खोल दरीत कोसळला

    अपघातात दोन जण ठार

    अतिशय दुर्गम व चिंचोळ्या मार्गावर अपघात झाल्याने मदत कार्यात अडथळा

    जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह दरीतून काढण्याचं काम सुरू

    ट्रकमधून किती लोक प्रवास करत होते याची माहिती घेण्याचं काम सुरू

  • 10 Aug 2025 03:53 PM (IST)

    उत्तराखंड: धराली आपत्तीसाठी बँक ऑफ बडोदाने दिले 1 कोटी रुपये

    बँक ऑफ बडोदाच्या एका शिष्टमंडळाने उत्तराखंडमधील देहरादून येथे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेऊन धाराली आणि हर्षिल भागातील आपत्ती निवारण कार्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीत 1 कोटी रुपयांचे योगदान दिले.

  • 10 Aug 2025 03:41 PM (IST)

    खरगेंकडून उद्या इंडिया अलायन्सच्या खासदारांसाठी रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या संध्याकाळी 7.30  वाजता इंडिया अलायन्स खासदारांसाठी रात्रीचे जेवण आयोजन केलं आहे.

  • 10 Aug 2025 03:22 PM (IST)

    मागाठाणे विधानसभेत शिवसेनेला मोठा धक्का, प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये

    मागाठाणे विधानसभेत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वार्ड क्र ११ चे शिवसेना शाखाप्रमुख आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये दाखल झाले. सुभाष येरुणकर गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेत होते पण आज त्यांनी शिवसेना सोडून प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला.

  • 10 Aug 2025 03:16 PM (IST)

    पाकिस्तानवर त्यांच्या घरात अनेक किलोमीटर आत घुसून हल्ला केला – पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये सांगितले की, संपूर्ण जगाने नवीन भारताचे हे रूप पाहिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे कारण तंत्रज्ञान, संरक्षण आणि मेक इन इंडियाची शक्ती आहे. पाकिस्तानने काही तासांतच शरणागती पत्करली आहे. अनेक किलोमीटर आत घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

  • 10 Aug 2025 01:45 PM (IST)

    त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी ग्रामीण पोलिसांकडून विशेष व्यवस्था

    त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामीण पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये खाजगी वाहणाने येणाऱ्या भाविकांना आज दुपारपर्यंत प्रवेश त्यानंतर एसटी महामंडळाच्या बसचा पर्याय उपलब्ध आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी तिसऱ्या श्रावण सोमवारी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हे नियोजन करण्यात आले आहे.

  • 10 Aug 2025 01:30 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करतायेत- मनोज जरांगे पाटील

    ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचे काम करत आहेत. तर मराठा अधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय. प्रशासनातील मराठा अधिकाऱ्यांना त्रास होत असेल तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहन आहे’ असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 10 Aug 2025 01:19 PM (IST)

    निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

    इलेक्शन कमिशन चोर है… असे म्हणत मतांची चोरी झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले आहे.सार्वजनिक निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात ठाकरे गडाची मागणी आहे.

  • 10 Aug 2025 12:50 PM (IST)

    शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन

    शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत.

  • 10 Aug 2025 12:40 PM (IST)

    शरद पवारांनी 40 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं?- बावनकुळे

    “शरद पवारांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांनी 40 वर्षांत ओबीसींसाठी काय केलं? सत्तेत असताना ओबीसीच्या गोष्टी करायचा नाहीत आणि सत्तेच्या बाहेर गेल्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला भूलथापा देण्याचं काम करत आहेत. ओबीसी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.

  • 10 Aug 2025 12:30 PM (IST)

    अमरावती- पुणे विमानसेवा लवकरच- बावनकुळे

    अमरावती- “आज वंदे भारत ट्रेनद्वारे अमरावती-पुणे जोडण्याचं काम होत आहे. लवकरच पुढच्या काळात अमरावती- पुणे विमानसेवा सुद्धा सुरू करण्यात येईल,” अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

  • 10 Aug 2025 12:20 PM (IST)

    बीड – परळी वैद्यनाथ बॅंकेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात

    बीडच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या वैद्यनाथ को. ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी आज जिल्ह्यासह राज्यात एकूण 435 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रितम मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.

  • 10 Aug 2025 12:10 PM (IST)

    नागपूरहून पुण्यासाठी आजपासून ‘वंदे भारत’

    नागपूर-पुणे वंदे भारतचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. व्हीसीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.

  • 10 Aug 2025 11:59 AM (IST)

    शरद पवार ‘लोकपिता’

    इगतपुरी तालुक्यातील वासाळी ग्रामपंचायत येथे ठराव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना लोकपिता ही पदवी बहाल करण्यात आलीय.

  • 10 Aug 2025 11:53 AM (IST)

    प्रवाशांचा आरामदायी प्रवास होईल

    विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी नागपूर-पुणे वंदे भारत ट्रेनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीसीद्वारे उद्धघाटन केलं. आता 12 तासात हा प्रवास होईल. प्रवाशांचा आरामदायी प्रवास होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 10 Aug 2025 11:40 AM (IST)

    उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली

    धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी येथे गेली दहा दिवसापासून स्मशानभूमीमध्ये प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाचे आमरण उपोषण सुरू आहे. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये नियमबाह्य वृक्ष लागवड केल्याने प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे यांचे गेले दहा दिवसापासून उपोषण सुरू आहे.

  • 10 Aug 2025 11:29 AM (IST)

    सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस

    उद्धवजी दिल्लीला आले तेव्हा आम्ही कपिल सिब्बल यांच्या बाबत चर्चा केली आणि ज्यावेळी लोक मिळत नाहीत, त्यावेळी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करावा लागतो. मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्या व्यक्तीला शोधून आणण्यात येते. माजी उपराष्ट्रपती धनखड यांना शोधण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी असे आमचे मत झाल्याचा चिमटा संजय राऊतांनी काढला.

  • 10 Aug 2025 11:10 AM (IST)

    उजनी धरण १००% भरले

    सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाणारे उजनी धरण १००% भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी पातळी सातत्याने वाढत होती. आज सकाळी धरणाने आपली पूर्ण साठवण क्षमता गाठली.यामुळे सोलापूर, पुणे, आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उजनी धरण पूर्ण भरल्यामुळे पुढील एक ते दोन वर्षांसाठी पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच आहे, पण त्याचबरोबर शेतीसाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे रब्बी आणि उन्हाळी पिकांना मोठा फायदा होईल.

  • 10 Aug 2025 11:09 AM (IST)

    गावगुंडांची काढली धिंड

    धुळे जिल्ह्यातील शहादा शहरात गावगुंडची मस्ती उतरवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. शहरात दहशत पसरवण्याचे आणि महिलांची छेड काढणाऱ्या युवकाला पोलिसांनी चांगला धडा शिकवला. शहरातील मुख्य रस्त्यावर हात जोडत, माफी मागत आरोपीला फिरवले.

  • 10 Aug 2025 11:00 AM (IST)

    थोड्याच वेळात वंदे भारतचं लोकार्पण

    नागपूरहून पुण्यासाठी वंदे भारतचं आज लोकार्पण होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी वंदे भारत या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

  • 10 Aug 2025 10:24 AM (IST)

    गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई

    महापालिका कर्मचाऱ्यांसमोर सूर्यप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीने कबुतरांना खाद्य टाकले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सूर्यप्रकाश यांना 500 रुपयांचा दंड आकारत दिली समज. व्यक्तीने TV 9 Marathi शी बोलताना चूक मान्य करत पुन्हा खाद्य टाकणार नाही अशी दिली प्रतिक्रिया

  • 10 Aug 2025 10:06 AM (IST)

    निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्या मोर्चा

    निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्या मोर्चा काढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 10 Aug 2025 09:55 AM (IST)

    अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची पाहणी सुरु

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी पहाटेपासूनच बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी सुरू केली आहे. यामध्ये तीन हत्ती चौक, एसटी बसस्थानक अशा अनेक ठिकाणांचा समावेश आहे. विकास कामांची पाहणी झाल्यानंतर बारामतीतील त्यांच्या सहयोग निवासस्थानी जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ते नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील.

  • 10 Aug 2025 09:43 AM (IST)

    मंत्रालयात ऑफलाइन प्रवेश बंद, DG प्रवेश ॲपवर नोंदणी केल्यावरच प्रवेश मिळणार

    महाराष्ट्राच्या मंत्रालयात आता 15 ऑगस्टपासून प्रवेशासाठी DG प्रवेश ॲपवर नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. गृह विभागाच्या उपसचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ऑफलाइन प्रवेश बंद करण्यात आला आहे. डीजी स्कॅन प्रवेश प्रणाली सुरू होऊनही मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ऑफलाइन पाससाठी मोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यांच्यासाठी मंत्रालयाकडून पर्यायी व्यवस्था केली जाईल.

  • 10 Aug 2025 09:35 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आता मोबाईलद्वारे हजेरी लावता येणार

    पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी आता मोबाईलद्वारे हजेरीची नवी पद्धत लवकरच सुरू होणार आहे. प्रशासनाने ऑनलाईन हजेरीसाठी हा नवीन पर्याय निवडला आहे. यापूर्वी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा विचार होता. पण आता त्यात बदल करण्यात आला आहे. नवीन पद्धतीनुसार, शिक्षक शाळेच्या परिसरात पोहोचल्यानंतर आपल्या मोबाईलद्वारे हजेरी लावू शकणार आहेत, ज्यामुळे शिक्षकांची उपस्थिती अधिक प्रभावीपणे नोंदवली जाईल.

  • 10 Aug 2025 09:22 AM (IST)

    सोलापूरमध्ये शरणू हांडे अपहरण प्रकरणात पोलिसांकडून मोठी कारवाई, सर्व आरोपींना अटक

    सोलापूरमध्ये शरणू हांडे अपहरण प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सातव्या आणि शेवटच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. समर्थ वासुदेव भैरी असे या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वी अटक झालेल्या पुजारी आणि माने यांच्या संपर्कात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ भैरी शिलाई काम करतो. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून, आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.

  • 10 Aug 2025 09:15 AM (IST)

    जळगावात दुष्काळाचे सावट, पावसाने पाठ फिरवल्याने गंभीर परिस्थिती

    जळगाव जिल्ह्यात या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमी पावसाच्या जिल्ह्यांच्या यादीत जळगावचा समावेश असून जिल्ह्याला ‘रेड झोन’मध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. जळगावमध्ये आतापर्यंत ८६ महसूल मंडळांपैकी केवळ १३ मंडळांमध्ये १०० टक्के पाऊस झाला आहे, तर २२ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. विशेषतः, रावेर, यावल, अमळनेर, चोपडा आणि धरणगाव हे पाच तालुके ‘डेंजर झोन’मध्ये आहेत. कमी पावसामुळे पिकांची वाढ खुंटली असून, कापूस, मका आणि सोयाबीन यांसारख्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

  • 10 Aug 2025 09:08 AM (IST)

    सतीश उर्फ खोक्या भोसलेला न्यायालयाकडून जामीन मंजूर

    शिरूर कासार तालुक्यात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाटोदा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी 8 मार्च रोजी खोक्याच्या घरावर छापा टाकून वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस आणि गांजा जप्त केला होता. त्यानंतर त्याला अटक झाली होती. शिरूर कासार येथील न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.