PM Modi Navi Mumbai Airport Inauguration LIVE : नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याची हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

PM Narendra Modi Navi Mumbai International Airport Inauguration Event LIVE Updates : गोल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईचे विमानतळ कधी चालू होणार असे विचारले जात होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

PM Modi Navi Mumbai Airport Inauguration LIVE : नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटातील अभिनेत्याची हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह
Tv9 Marathi Live Updates
Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 09, 2025 | 4:02 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रो 3 च्या अंतिम टप्याचे लोकार्पण केल जाणार आहे. भूमिगत असलेली मेट्रो 3 आता पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे असून त्याच्याच उद्धाटनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत आहेत. आज शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोर्टात अंतिम सुनावणी आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचे संजय राऊतांनी म्हटले. कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली करण्यात आली. त्याबद्दल काल रात्री उशीरा आदेश काढण्यात आली. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत. पंतप्रधान आज मुंबई दाैऱ्यावर असल्याने महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Oct 2025 06:59 PM (IST)

    निलेश घायवळची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याचं समोर

    निलेश घायवळची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर आली आहे. जामखेड, अहिल्यानगर , धाराशिवमध्ये घायवळची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे. घायवळच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

  • 08 Oct 2025 06:50 PM (IST)

    योगेश कदमांच्या सहीने सचिन घायवळला 20 जून रोजी शस्त्रपरवाना

    पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात आला आहे. सचिन घायवळवर पुणे पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. घायवळला शस्त्रपरवाना देऊ नये असे पोलिसांनी गृहखात्याला अहवाल दिला होता.

  • 08 Oct 2025 06:30 PM (IST)

    शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला परदेशात जाण्याची परवानगी नाकारली

    शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला परदेशात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. 60 कोटी जमा करून मगच परदेशात जाण्याची परवानगी मागा असं हायकोर्टाने म्हटले आहे.

  • 08 Oct 2025 06:12 PM (IST)

    नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याची हत्या; अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह

    नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटातील तथा बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्याची हत्या झाली आहे. या अभिनेत्याचे नाव प्रियांशु क्षत्रिय उर्फ ​​बाबू छत्री असून त्याची नागपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे. एका कुख्यात गुन्हेगाराने किरकोळ वादातून त्याच्याच साथीदाराची निर्घृणपणे चाकूने वार करून हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. अतिशय निर्दयीपणे त्याची हत्या करण्यात आली आहे.

  • 08 Oct 2025 05:50 PM (IST)

    ठाण्यात मनसेची महाविकास आघाडीत एन्ट्री? बॅनर व्हायरल

    ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सामील झालीय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाण्यात एकाच बॅनरवर शरद पवार , उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचे फोटो पाहायला मिळाले. त्यामुळे मनसेची मविआत एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी शरद पवार युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे पदाधिकाऱ्याने हे बॅनर लावले आहेत.

  • 08 Oct 2025 05:42 PM (IST)

    पुण्यातील काही भागात पावसाची हजेरी

    अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. फर्ग्युसन रोड परिसर, शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांची तारांबळ उडाली. पुण्यात सकाळपासूनच कडक ऊन पडलं होतं. अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय.

  • 08 Oct 2025 05:18 PM (IST)

    स्थानिक भूमिपुत्र नाराज, पंडालमध्ये मोदींच भाषण संपताच घोषणाबाजी, कारण काय?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही वेळापूर्वी नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळेस मोदींनी दी बा पाटील यांच्या नावाबाबत कुठलंही विधान न केल्याचा दावा भूमिपुत्रांकडून करण्यात आला. दी बा पाटील यांच्याबाबत वक्तव्य न केल्याने स्थानिक भूमिपुत्र नाराज झाला आहे. या नाराज भूमिपुत्रांनी पंडालमध्ये मोदींच भाषण संपताच घोषणाबाजी सुरू केली.

  • 08 Oct 2025 05:05 PM (IST)

    जळगावातील सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही तब्बल 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 26 हजार 100 रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपये इतके आहेत.

  • 08 Oct 2025 04:53 PM (IST)

    काही लोकांची सत्ता आली अन् हजारो करोडोंचं नुकसान झालं – मोदी

     

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मी मेट्रोच्या भूमिपूजनात आलो होतो. तेव्हा अडचणी दूर होतील असं मुंबईकरांना वाटलं होतं. पण काही लोकांची सत्ता आली. पण देशाचं हजारो करोडोंचं नुकसान झालं. आता मेट्रो तयार झाल्याने दोन तासाचा प्रवास अर्ध्या तासात होणार आहे. मुंबईकर तीन चार वर्षापासून सुविधेपासून वंचित होते. हे कोणत्या पापापेक्षा कमी नाहीये.’

  • 08 Oct 2025 04:44 PM (IST)

    दि. बा. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी – PM मोदी

     

    पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘आज मला महाराष्ट्राचे सुपुत्र, दिग्गज नेते दि. बा. पाटील यांचीही आठवण येते. त्यांनी सेवाभावाने काम केलं. त्यांचं कार्य प्रेरणादायी. आमच्यासाठी ही प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाज सेवा करणाऱ्यांना प्रेरणा देत राहील.’

  • 08 Oct 2025 04:26 PM (IST)

    आज मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं – PM मोदी

    आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल. मुंबईला आज अंडरग्राऊंड मेट्रो मिळाली. त्यामुळे मुंबईचा प्रवास सोपा होईल. विकसित भारताचं हे जिवंत प्रतिक आहे.’

  • 08 Oct 2025 04:13 PM (IST)

    आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे – CM फडणवीस

     

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. गेली 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी सांगतो, त्याचं लोकार्पण होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा एअरपोर्ट नव भारताचं प्रतिक आहे. 90 च्या दशकातील एअरपोर्टची संकल्पना होती. ती आता पूर्ण होत आहे.

  • 08 Oct 2025 04:11 PM (IST)

    PM मोदींच्या कार्यकाळात विमानतळांची संख्या दुप्पट झाली – एकनाथ शिंदे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशात 74 विमानतळ होते. पण आता ही दुप्पट झाली आहे. 150 झाली आहे. आता ती तिप्पट होत आहे. मोदी है तो मुमकीन है, हे उगाच म्हटलं जात नाही. या विमानतळाची तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी करत आहेत. पण लवकरच लंडनवाले हिथ्रोची तुलना नवी मुंबईशी करतील.

  • 08 Oct 2025 03:33 PM (IST)

    विमानतळामुळे पर्यटन, गुंतवणूक याला चालना मिळणार- अजित पवार

    मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतो. मुंबईच्या विकासाला पंख देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मुंबईच्या आणि महाराष्ट्राला विकासाला मोदी यांचे नेहमीच प्रोत्साहन सहकार्य मिळत आले आहे. आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आज मोदी स्वत: उपस्थित राहिले आहेत. त्यामुळेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असे अजित पवार म्हणाले. या विमानतळामुळे पर्यटन, गुंतवणूक याला चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

  • 08 Oct 2025 03:20 PM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

    नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या निवडणुका गेल्या चार वर्षापासून रखडल्या होत्या. आता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्याने निवडणुकीच्या मार्ग मोकळा झाला असून इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
  • 08 Oct 2025 03:06 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्तित होते.

  • 08 Oct 2025 02:52 PM (IST)

    जळगावात मध्यरात्री टोल नाक्यावर ट्रॉली कलंडली

    जळगावातील नशिराबाद टोल नाक्यावर मध्यरात्री फरशी भरलेला ट्रॉला गतिरोधकावर आदळून कलंडल्याने मोठा अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अपघातानंतर ट्रॉलात असलेल्या फरशा रस्त्यावर विखुरल्या होत्या. रस्त्यावर अंतरापर्यंत डिझेल सांडलेले होते. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

  • 08 Oct 2025 02:40 PM (IST)

    अहिल्यानगरात उद्या असदुद्दीन ओवैसी यांची उद्या सभा

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांची उद्या अहिल्यानगर येथे जाहीर सभा होत आहे. याआधी 29 सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या दगडफेक आणि पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर 30 सप्टेंबरची नियोजित सभा रद्द करण्यात आली होती.त्या घटनेनंतर पुन्हा एकदा ओवेसींची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 08 Oct 2025 02:25 PM (IST)

    चाळीसगाव नगरपरिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

    जळगावच्या चाळीसगाव नगरपरिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. एकूण 18 प्रभागांसाठी 36 सदस्य निवडले जाणार आहे. एकूण 36 जागांपैकी 18 जागांवर महिलांचे राज्य असणार आहे. लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी टाकून महिला प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले आहे. चाळीसगाव नगरपरिषदेत प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

  • 08 Oct 2025 02:16 PM (IST)

    शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा अभ्यास करतोय – सुप्रिया सुळे

    इंदापूरमध्ये शेतकरी म्हणतात 50 विहिरीचं नुकसान झाले आहे.  मात्र तालसीदार म्हणतात विहिरीला मदत नाही. म्हणून याचा अभ्यास आम्ही करतो त्यांना कसे पैसे मिळतील असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

  • 08 Oct 2025 01:56 PM (IST)

    60 कोटींच्या फसवणुकीप्रकरणात शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला दिलासा नाहीच

    अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रांना यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला परदेशात जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली आहे. आधी ६० कोटी रुपये कोर्टाकडे डिपॉझिट करा मग आम्ही परवानगी देण्यावर विचार करू असं कोर्टाने स्पष्ट केलं. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे.

  • 08 Oct 2025 01:46 PM (IST)

    पूरग्रस्तांना भरघोस मदत मिळावी यासाठी ठाण्यात आंदोलन

    उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाड्यातील पूरग्रस्तांना शासनाकडून भरघोस मदत मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. ठाण्यात देखील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी यांना ठाकरे गडाचे माजी खासदार राजन विचारेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

  • 08 Oct 2025 01:34 PM (IST)

    टीव्ही9 मराठीच्या बातमीची इम्पॅक्ट, प्रशासनाने घेतली दखल

    पंढरपूर शहरातील आंबेडकर चौक, सावरकर चौक, भोसले चौक, भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने भाविक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची बामी टीव्ही9 मराठीने दाखवली होती. या बातमीची दाखल घेत प्रशासनाने विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांची डागडुजी करण्यास सुरुवात केली.

  • 08 Oct 2025 01:23 PM (IST)

    दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दराने सव्वा लाख रुपयांचा आकडा केला पार

    सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 26 हजार 100 रुपयांवर तर चांदीचे दराने जीएसटीसह 1 लाख 56 हजार रुपयांवर पोहोचला आहे. दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दराने सव्वा लाख रुपयांचा आकडा पार केला आहे.

  • 08 Oct 2025 01:13 PM (IST)

    आरक्षणाबद्दल प्रफुल्ल पटेलांकडून छगन भुजबळांचं समर्थन

    “ओबीसी समाजाचं पूर्ण भान ठेवून बाकीचे निर्णय घेतलेले आहेत. ओबीसींबद्दल छगन भुजबळांची भूमिका नवीन नाही, पूर्वीपासूनच आहे. यात काहीही मतभेद नाहीत. ओबीसींचं कुठेही नुकसान होता कामा नये, याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाहीत”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

     

  • 08 Oct 2025 12:56 PM (IST)

    झाड कापण्याच्या कटरमध्ये आग लागल्याने स्फोट

    झाड कापण्याच्या कटरमध्ये आग लागल्याने स्फोट. नाशिकच्या सातपूर परिसरात घडली घटना. झाड कापण्याच्या कटरमध्ये असलेल्या डिझेलने घेतला पेट. सिगरेट पेटवत असताना ठिणगी पडल्याने झाला स्फोट. 3 ते 4 जण गंभीर भाजल्याची प्राथमिक माहिती. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.

  • 08 Oct 2025 12:55 PM (IST)

    ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यव्यापी आंदोलनाला पंढरपूरमध्ये सुरुवात

    पंढरपूर तहसील कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे आंदोलन. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी, पीक विम्याची रक्कम दिवाळी पूर्वी मिळावी या मागणीसाठी करण्यात येत आहे आंदोलन.दिवाळीच्या आत नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी.

  • 08 Oct 2025 12:28 PM (IST)

    सोलापुरातील समर्थ बँकेमध्ये ठेवीदारांचा गोंधळ

    समर्थ सहकारी बँकेवर RBIचे निर्बंध आल्याने ठेवीदार बँकेच्या शाखेत घुसून गोंधळ घालत आहेत. समर्थ सहकारी बँकेच्या शाखेत ठेवीदार महिलांना अश्रू अनावर. बँक मॅनेजरला घेराव घालत बँक फोडण्याचा ठेवीदारांकडून इशारा. रिझर्व्ह बँकेकडून सोलापुरातील समर्थ सहकारी बँक कठोर आर्थिक निर्बंध लादले. 7 ऑक्टोबर 2025 पासून हे निर्बंध लागू, बँकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन घेतला निर्णय.

  • 08 Oct 2025 12:10 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. आता 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा सुनावणी बाबतचा खटला 16 व्या क्रमांकावर होता.

     

  • 08 Oct 2025 12:09 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली. आता 12 नोव्हेंबरला होणार सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा सुनावणी बाबतचा खटला 16 व्या क्रमांकावर होता.

  • 08 Oct 2025 11:51 AM (IST)

    राज्यात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई

    राज्यात बनावट कफ सिरपवर मोठी कारवाई रेडिनेस्क फार्मसिटीकल कंपनीचा साठा जप्त करण्यात आला. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे १९ बालके दगावल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, FDA ने पुण्यात मोठी कारवाई करत रेडनेक्स फार्मसिटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील ‘रेसपिफ्रेश टी आर’ (Respifresh TR) या औषधाचा मोठा साठा जप्त केला.

  • 08 Oct 2025 11:37 AM (IST)

    सोलापूर – शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकार विरोधात आंदोलन

    सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा लावत व्यक्ती टेबलवर झोपवली.  शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी असून भरीव मदत देण्याची मागणी, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

  • 08 Oct 2025 11:13 AM (IST)

    मराठ्यांनी सावध होणं आता गरजेचं – मनोज जरांगे यांचा इशारा

    मराठ्यांनी सावध होणं गरजेचं, मराठ्यांच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही. मराठ्यांना आता आरक्षणासाठी लढावं लागणार आहे.

  • 08 Oct 2025 11:09 AM (IST)

    नवी मुंबई विमानतळ उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदाराचा बहिष्कार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा बहिष्कार

    नवी मुंबई विमानतळ उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट.) पक्षासह, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बहिष्कार टाकला आहे.

    उद्घाटनापूर्वी नवी मुंबई विमानतळास  लोकनेते स्व. दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सर्व भूमिपुत्रांची सुरवातीपासून होती. याच पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

  • 08 Oct 2025 10:57 AM (IST)

    जळगाव-मुंबई विमानसेवेला २६ ऑक्टोबरपासून सुरुवात, दीड तासात मुंबई गाठता येणार

    जळगाव विमानतळावरून प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अलायन्स एअर कंपनीकडून सध्या आठवड्यातून चार दिवस सुरू असलेली जळगाव-मुंबई विमानसेवा, २६ ऑक्टोबरपासून दररोज उपलब्ध होणार आहे. ही सेवा दररोज सुरू झाल्यामुळे जळगावकर केवळ दीड तासात मुंबई गाठू शकतील. यासोबतच, गेल्या दोन महिन्यांपासून खंडित झालेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद अशा प्रमुख शहरांना विमानसेवा सध्या सुरू आहे.

  • 08 Oct 2025 10:42 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील ११ नगरपालिकांवर महिला राज

    जळगाव जिल्ह्यातील १९ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. या १९ पैकी तब्बल ११ पालिकांवर महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे, ज्यामुळे या पालिकांची ‘चावी लाडक्या बहिणींच्या हाती’ येणार आहे. आरक्षणामुळे जिल्ह्यातील मोठ्या पालिकांची सूत्रे आता महिलांकडे जातील हे स्पष्ट झाले आहे. धरणगाव, रावेर, जामनेर, पाचोरा, यावल, फैजपूर, चाळीसगाव, चोपडा, भुसावळ, सावदा आणि बोदवड या ११ पालिकांवर महिला उमेदवारांना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. दुसरीकडे, अमळनेर, एरंडोल, नशिराबाद, वरणगाव, शेंदुर्णी, मुक्ताईनगर आणि पारोळा या पालिकांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी संधी उपलब्ध झाली आहे.

  • 08 Oct 2025 10:29 AM (IST)

    सरकारच्या अतिवृष्टी निधीवर शेतकरी असमाधानी; कर्जमाफीची मागणी

    पंढरपूर – अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेला निधी अपुरा असल्याने शेतकरी असमाधानी आहेत. शेतकऱ्यांनी बागायत जमिनीसाठी हेक्टरी एक लाख रुपये आणि जिरायती (कोरडवाहू) जमिनीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी आजही शेतातून पाणी वाहत असल्याने, काही शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय उरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मात्र, यापूर्वीच्या सरकारांनी २७,००० रुपयांपेक्षा कमी निधी दिला होता, त्याच्या तुलनेत सध्याच्या सरकारने किमान ३२,५०० रुपयांचा तरी निधी दिल्याने काही शेतकऱ्यांनी अंशतः समाधान व्यक्त केले आहे. तरीही, सरकारने प्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, यावर बहुतांश शेतकऱ्यांचा भर आहे.

  • 08 Oct 2025 10:18 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो लाईन-३ फेज २-बी चे आज उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यात ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे राष्ट्राला समर्पण करतील. याशिवाय, मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी मुंबई मेट्रो लाईन-३ चा फेज २-बी मुंबईकरांसाठी खुला करतील. ही लाईन आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंत विस्तारलेली असून, ती आरे JVLR मेट्रो स्टेशनपासून सुरू होते. या प्रकल्पांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधा मजबूत होऊन मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

  • 08 Oct 2025 10:06 AM (IST)

    पुण्याच्या शनिवारवाड्याची चिंताजनक अवस्था, पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

    पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याची देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने न झाल्यामुळे सध्या वाड्याची अवस्था चिंताजनक बनली आहे. अनेक ठिकाणी वाड्याच्या भिंतींवर झाडे उगवलेली दिसून येत आहेत, ज्यामुळे वाड्याच्या संरचनेला धोका निर्माण झाला आहे. शनिवार वाडा हा पेशव्यांच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असून पुण्याचे एक प्रमुख ऐतिहासिक व पर्यटन स्थळ मानले जाते. मात्र सध्या वाड्याच्या तटबंदीवर आणि आतील भिंतींवर वाढलेली झाडे व वनस्पती या वारशाच्या दुर्लक्षित स्थितीकडे बोट दाखवत आहेत. वाड्याच्या देखरेखीच्या जबाबदारीवर असलेल्या पुरातत्व विभागावर टीका केली आहे. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर जात असल्यामुळे दगडी रचना कमकुवत होण्याचा धोका वाढतो आहे. पुरातत्व विभागाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन, वाड्याच्या नियमित देखभालीसाठी पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  • 08 Oct 2025 09:57 AM (IST)

    दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळ स्वस्त गृहिणींना दिलासा

    हरभरा डाळीच्या दरात घट झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे दिवाळीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे.  गेल्या वर्षी घाऊक बाजारात एक किलो हरभरा डाळीसाठी 85 ते 94 रुपये दर होता तर किरकोळ बाजारात 100 रुपये किलो इतका दर होता. यंदा हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दरात किलोमागे 15 ते 20 रुपयांची घट झाली आहे… सध्या हरभरा डाळीचा दर प्रतवारीनुसार 72 ते 75 रुपये प्रतिकिलो आहे…

  • 08 Oct 2025 09:45 AM (IST)

    दोन अल्पवयीन मुलांनी केली 5 लाखांची चोरी

    सोलापूर शहरातील जेलरोड पोलिसांनी वेगवान कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांकडून 5 लाख रुपयांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून दोन अल्पवयीन मोटरसायकल घेण्यासाठी पद्मशाली चौकात आल्याचे समजले. पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी रविवार पेठेतील एका घरातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पडताळणी केली असता त्यांच्या कडून 4 लाख 10 हजाराची रोख रक्कम हस्तगत केली. तर उर्वरित 90 हजार रुपये त्यांनी खर्च केल्याचे सांगितले. पुढील तपास जेलरोड पोलीस करत आहेत.

  • 08 Oct 2025 09:30 AM (IST)

    चोरी करून OLX वर विक्री करणाऱ्या चोरट्यांना वानवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

    हरात रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटून चोरी करत होते चोर… फैजन मोहम्मद शेख असे रिक्षाचालकाचे नाव असून दोन अल्पवयीन मुलाना ताब्यात घेण्यात आले आहे… त्यांच्याकडून ३० मोबाईल फोन सह तीन लाख ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे…

  • 08 Oct 2025 09:13 AM (IST)

    शरद पवार गटाच्या ठाणे शहर अध्यक्षपदी मनोज प्रधान यांची झाली निवड

    आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक मनोज प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे… काही दिवसापूर्वी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला होता…

  • 08 Oct 2025 08:55 AM (IST)

    सततच्या वादातून प्रियसीने केली प्रियकराची हत्या

    चाकण पोलिस ठाण्यात हद्दीत एका 25 ते 30 वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने खून करून दाट गवतामध्ये टाकण्यात आले होते. अखेर या प्रकरणी चाकण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 48 तासांतच तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात, आकाश बीजलाराम उराव आणि दोन महिला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हे सर्व झारखंड येथील रहिवासी असून कामानिमित्ताने ते चाकण परिसरातील कडाची वाडी येथे राहत होते.

  • 08 Oct 2025 08:39 AM (IST)

    पीएमआरडीए क्षेत्रात हात दाखवा-बस थांबवा पीएमपी कडून 134 मार्गावर उपक्रम सुरू

    पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात हात दाखवा-बस थांबवा सेवा सुरू करण्यात आली आहे. पीएमपी ची ही सेवा 134 मार्गावर उपलब्ध झाले असून या सेवेमुळे प्रवाशांना स्थानकापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही

  • 08 Oct 2025 08:30 AM (IST)

    पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

    पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर यंदाही महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण मंडळात काम करणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा 8.33% बोनस दिला जाणार आहे

     

  • 08 Oct 2025 08:12 AM (IST)

    सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या रिस्टार भाईंची पोलिसांनी उतरावला माज

    सोशल मीडियावर गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या कंटेंटच्या रील तयार करून केल्या होत्या व्हायरल. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर रील स्टार भाईंचा माफीनामा. नाशिक जिल्हा म्हणजे गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशी केली होती रिल

  • 08 Oct 2025 08:12 AM (IST)

    कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

    जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद असणार नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी. कुंभमेळ्याच्या आधीच शर्मा यांची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. जलज शर्मा यांच्याकडे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त पदाची जबाबदारी तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून नियुक्ती