
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरूस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध. हॉटेल व्यावसायिकाचे हॉटेल बळकवण्यासाठी धमकावणारा छोटा राजनचा खास हस्तक डी.के. राव याने मध्यस्थी करण्यासाठी इतर आरोपींकडून पैसे घेतल्याचा संशय असून याप्रकरणी गुन्हे शाखा त्याचे आर्थिक व्यवहार तपासणार आहे. किरीट सोमय्या आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर असून ते छावणी पोलिस, धान्य वितरण कार्यालय व महापालिकेला भेट देणार आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस तीन दिवस दिल्ली विधानसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. रायगड पालकमंत्री सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाही. रायगड मध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
नाशिकच्या सिडको परिसरात घरात नमाज पठणावरून वाद झाला आहे. बाहेरील नागरिक नमाज पाठणासाठी येत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांचं आंदोलन सुरु आहे.
खारघरमध्ये एका क्षुल्लक कारणासाठी मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. पार्टीसाठी पैसे देण्यावरून वाद झाला. क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहरा आणि पाठीवर जबर मारहाण केला. मारहाणीत जयेश वाघे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला.
सोनियांच्या पुअर लेडीच्या वक्तव्यावर जेपी नड्डा म्हणाले की काँग्रेस पक्षाने राष्ट्रपती आणि भारतातील आदिवासी समुदायांची बिनशर्त माफी मागावी अशी माझी मागणी आहे. असे शब्द त्यांनी जाणीवपूर्वक वापरले. घटनात्मक पदाचा अपमान करणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे.
महाकुंभ दुर्घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यायिक आयोगाचे पथक प्रयागराजला पोहोचले आहे. हे पथक जखमींचे जबाब नोंदवणार आहे. सध्या ही टीम स्वरूप राणी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे.
मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यां तक्रारी नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी 100 जणांना बाबतीत पुरावे दिले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिलीय.
बनावट कागदपत्रे देणारे एजंट आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकऱ्याची चौकशी करून होणार कायदेशीर कारवाई आहे. तसेच बांगलादेशी नागरिक असून बनावट कागदपत्रे दाखले बनवुन राहत असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशिमच्या रिसोड तालुक्यात रिसोड-करडा मार्गावरील बिबखेड शिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू, तर 1 शेळी गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी मोरे यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, वन विभागाने तत्काळ लक्ष घालून बिबट्याचा शोध घ्यावा आणि त्याला जेरबंद करावे, व शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
“राजकारणात कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर राहावं लागतं. जे नशिबात असंत तेच मिळतं. बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे माझा छगन शरद घेऊन गेला. बाळासाहेबांचं शेवट पर्यंत माझ्यावर प्रेम होतं. छगन भुजबळ राज्यपाल होणार म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखं आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले.
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्यानंतर किन्नर अखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर आता ममताला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे. त्याचसोबत लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.
पुसद रोडवरील रेल्वे उड्डाणंपुलावर घडली घटना. चालकांच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. अमरावती ते धर्मबाद जाणार होती बस. अचानक टायर जाम झाल्याने, फरफटत जाऊन आग लागल्याची माहिती. वाशीम नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत तातडीने विझवली आग. पुसद महामार्गावर वाहतुकीचा अर्धा तास खोळंबा.
पुण्यातील नांदेडगावतील 60 वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय. मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत, त्यातील हा एक रुग्ण होता. पुण्यातला तिसरा आणि राज्यातला चौथ्या रुग्णाचा मृत्यू झालाय.
पालघर येथील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या पत्नी आणि मुलाने मंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पालघर पोलिसांना 12 दिवसानंतर ही अपयश आले. फरार आरोपींना अजूनही शोधण्यात न आल्याने धोडी कुटुंबाने पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली.
सगे सोयरे अंमलबजावणी कायदेशीर आहे, त्याचे कायद्यात रूपांतर करावे. सगे सोयरे कायदेशीर नसती तर तुम्ही हरकती मागवल्या नसत्या. 83 क्रमांकावर कुणबी आणि मराठा एकच आहेत, तेव्हा सरसगट मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा आयोगाकडून 3 वेळा मागास सिद्ध झालेला आहे. फडवणीस यांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“आज बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला नमन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेटमध्ये विकसीत भारताचा चेहरा दिसले, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी देशाच्या समृद्धीसाठी लक्ष्मी मातेला नमन केले. तिसऱ्या कार्यकाळात सरकारचे मिशन मोडवर असल्याचे ते म्हणाले. सर्वांचा विकास हेच आपल्या सरकारचे मिशन असल्याचे ते म्हणाले. आमचा देश तरुणांचा आहे. आपल्याकडे तरुणांची शक्ती आहे. आज जी 20-25 वर्षांचे तरुण आहेत. ते जेव्हा
45-50 वर्षांचे होतील, तेव्हा ते या विकसीत भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील असे मोदी म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे. त्या संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधित करत आहेत.
या देशात एक वाईल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्ट आहे. त्याअंतर्गत सेव्ह टायगर अशी एक योजना आहे. जे टायगर आहेत, त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत होत आहे, झालेलं आहे. आता जे ऑपरेशन टायगर आहे, हे ज्याला वाईल्ड कॅस म्हणतात, इकडे तिकडे फिरत असतात जंगलात. त्यापैकी कोणी असेल तर मला माहीत नाही. मला कुणाची नावे घ्यायची नाही. जी नावे तुम्ही घेत आहात, येतील अशी अपेक्षा आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
अमरावतीचे कुलदैवत असलेल्या अंबादेवीच्या आणि एकविरा देवीच्या दर्शनासाठी बावनकुळे अंबादेवी मंदिरात दाखल… पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज पहिलाच अमरावती दौरा… जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला लावणार चंद्रशेखर बावनकुळे हजेरी… आमदार रवी राणा यांच्याही निवासस्थानी देणार सदिच्छा भेट…
भाजपचे दत्ता गायकवाड याची सभापती पदी बिनविरोध निवड… कल्याण एपीएमसीवर पहिल्यांदाच महायुतीमधील सभापती निवडून आल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे.
देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्त्वाची संधी दिली. गरीब, मध्यमवर्गीय परिवारामध्ये महालक्ष्मीची कृपा असावी. स्वातंत्र्याच्या 100 वर्षात भारत विकसित होणारच… भारत सध्या मिशनमेडमध्ये आहे. 2047 पर्यंत भारत विकसत होणारच… असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
राजन साळवी यांच्यासोबत कालच बोलणं झालं, ते पक्ष सोडतील असं वाटत नाही. ठाकरे परिवारानं काय दिलं याचा पक्षांतर करणाऱ्यांनी विचार करावा. पक्ष सोडणाऱ्यांची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
राजन साळवी यांच्यासोबत कालच बोलणं झालं, ते पक्ष सोडतील असं वाटत नाही. ठाकरे परिवारानं काय दिलं याचा पक्षांतर करणाऱ्यांनी विचार करावा. पक्ष सोडणाऱ्यांची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार सारथी संस्थेला देणार भेट. आज सकाळी १० वाजता संस्थेला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार, तसेच सारथीच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. अजित पवार महिन्याभरात दुसऱ्यांदा सारथी संस्थेत जाणार आहेत. सध्या सारथी संस्थेचे नूतनीकरण चालू आहे. गेल्याच आठवड्यात शरद पवार यांनी हीसारथी संस्थेत बैठक घेतली होती.
भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याचा तयारीत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरल्याची चर्चा आहे. 3 फेब्रुवारीला राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घाटकोपरच्या कैलास प्लाझा इमारतीमध्ये भीषण आग. या इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या, आणि चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी 6 च्या सुमारास ही आग लागली असून ती अद्याप विझलेली नाही. आग विझविण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत. मानखुर्द, विक्रोळी, चेंबूर परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत
पंकजा मुंडेंच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे.
पालकमंत्री पदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटण्याची शक्यता आहे. दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी सध्या देवेंद्र फडणवीस राजधानीत आहेत.
नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास मिटला असून नाशिक च्या पालकमंत्री गिरीष महाजन यांचीच नियुक्ती होईल अशी माहीती आहे. मात्र खरा तिढा अद्यापही रायगड बाबत आहे. रायगड पालकमंत्री सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाही. तर रायगड मध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. सरकारकडून वादग्रस्त वक्फ मंडळ दुरूस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध.