
वसंत पंचमी निमित्त आज पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे पंढरपुरात एकच लगीनघाई उडाली आहे. लग्नासाठी मंदिर हे फुलांनी एका राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आले. रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर साधारणपणे 11 ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विठ्ठल आणि रुक्मिणीचा अंतरपाठ धरून प्रत्यक्ष विवाह संपन्न होणार आहे. पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहे. शहरात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळून आले आहेत तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे शहरात चिंतेचा वातावरण निर्माण झालं आहे. मात्र अस असलं तरी आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबीएस आजाराच्या पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आला.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने नारायण गडावर जात आज नगद नारायण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नारायण गडाचे महंत शिवाजी महराज यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे, लवकरच शिवाजी महाराज मस्साजोग येथे येऊन भेट घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी घेतली एकमेकांची गळाभेट घेतली आहे.राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेला भेट देऊन तेथील सेवेची पाहणी केली आहे.
भाजप खासदार संबित पात्रा म्हणाले, “दिल्लीत निवडणुकीचे वातावरण तापले आहे आणि स्वाभाविकच अरविंद केजरीवाल यांची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. आप-दा ची सर्वात मोठी संपत्ती भ्रष्टाचार आहे, मग तो दारू धोरण असो, दिल्ली जल बोर्ड असो किंवा डीटीसी बस घोटाळा असो… आप- दा या सगळ्या घोटाळ्यांचा समानार्थी शब्द आहे… जमीन बळकावणे आणि निष्पाप लोकांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून घेणे, आपचे बडे नेते आहेत. चा व्यवसाय होता.
शिवसेनेच्या (यूबीटी) खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “महाराष्ट्राचा उल्लेख एकदाही केला गेला नाही. महाराष्ट्र हे सर्वाधिक जीएसटी भरणारे राज्य आहे. आपणही देशाचे राज्य आहोत याची आठवण महाराष्ट्राला दरवर्षी अर्थमंत्र्यांना करून द्यावी लागते. तुम्हाला 100 पेक्षा जास्त जागा दिल्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. निवडणुका होतात आणि तिथे विजय जाहीर होतो तेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे नावही घेत नाही. देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचे योगदान आहे, पण अर्थसंकल्पात त्यांची दखल घेतली जाते तेव्हा त्यांना बाजूला केले जाते.
पीएम मोदी म्हणाले की, जर तुम्ही नेहरूजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते तर 12 लाखांच्या उत्पन्नावर सरकारने तुमच्या पगाराचा एक चतुर्थांश हिस्सा परत घेतला असता. आज इंदिराजींची वेळ असती तर तुमच्या 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 लाखांवर कर लागला असता. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावले तर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागत असे.
चितळे उद्योग समूहाच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर म्हणाले, “अडचणीच्या काळात तुमची फॅमिली महत्त्वाची असते. घरचे सोबत असतात तेव्हा अपयशाची भीती वाटत नाही. लोकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे.”
पुणे- भारतरत्न सचिन तेंडुलकर हे चितळे उद्योग समूहाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर हे चितळे उद्योग समूहाचे ब्रँड अँबेसिडर असल्याने कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत.
छत्तीसगडमध्ये काल झालेल्या चकमकीच्या घटनास्थळाहून आज मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे रायफल आणि बंदूक जप्त करण्यात आले आहेत. बिजापूर जिल्ह्यातील तोडका कोरचोली चकमकीत आठ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आलं होतं. या ठिकाणी कालपासूनच एक सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं. यात आज काही नक्षलवाद्यांचे साहित्य, रायफल आणि बंदूक घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. निगडी प्राधिकरणात हा बिबट्या वावरत असल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. शहरातील मुख्य नागरिक वस्ती परिसरात बिबटे शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक नागरिकांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर बिबट्याला जेरबंद करत रेस्क्यू केले आहे.
पंढरपुरात आज विठ्ठल-रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरात देवाचा शाही विवाह सोहळा होणार आहे. यानिमित्त मंदिर फुलांनी सजविण्यात आलं आहे. यासाठी प्रतिकात्मक विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीला विवाहासाठी सजवण्यात आलं आहे.
नांदेड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिपॅडवर आगमन झालं आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज नांदेडच्या हादगाव दौऱ्यावर आहेत. हादगाव येथे श्रीकृष्ण मंदिराच्या कलशरोहणाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. हेलिपॅडवरून मोटारीने ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले आहेत.
भारत विरुद्ध इंग्लंडमधील पाचवा अंतिम टी-20 सामना वानखेडेवर… घरच्या मैदानावर सूर्यकुमार यादवला सूर गवसेल का? याची उत्सुकता… 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 3-1 ने आघाडीवर…
चव्हाणांच्या स्वबळासंदर्भातील वक्तव्यावर हेमंत पाटलांची टीका… अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही… अशोक चव्हाण भाजपात नवीन, युती धर्माची कल्पना नाही… असं वक्तव्य हेमंत पाटील यांनी केलं आहे.
ड्राय डे च्या दिवशी बारममधून अवैध दारू विक्री… अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील प्रकार… ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा विनय लवटेव व प्रफुल गोतमारे असे विरुद्ध गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे…. दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांचा पुत्र विनय लवटे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव.
नितीन देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्डला उच्च न्यायालयाचा दिलासा कंपनीविरुद्धचा प्राप्तिकर विभागाचा आदेश रद्द केला. दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडीज् आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध प्राप्तिकर विभागाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह अन्य तीन जणांवर 10 कोटी खंडणी मागीतल्या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनखे घेऊन कंटेनर पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या दिशेने रवाना झाली. मागील वर्षी 19जुलै रोजी लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून आणल्यानंतर ही शिवकालीन वाघनखे राज्य सरकारने राजधानी साताऱ्यात ठेवण्याचा पहिला बहुमान दिला होता.
पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील एका पब हॉटेलमध्ये दोन गटात् फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीवो देखील व्हायरल झाला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला असून त्यामध्ये चार ते पाच जाणाचे डोके फुटल्याची माहिती आहे. मागील काही दिवसापासून मुंढव्यात वाहने तोडफोड, जबरी चोऱ्या, हॉटेलमधील हुक्का अश्या घटना घडल्या आहेत.
बजेट समजण्यासाठी 72 तास लागतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बजेट कळलं नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी केला.
वनमंत्री तसेच पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून उद्या नवी मुंबईत जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश नाईक नवी मुंबईत जनता दरबार भरवतात मात्र वनमंत्री व पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच हा जनता दरबार असणार आहे.
लिंगभाव समानता आणण्याबरोबरच महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे,’ असे मत व्यक्त करतानाच, ‘महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल,’ असे संकेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. रमेश बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलाय. ओबीसी नेते म्हणून रमेश बारसकर यांची ओळख आहे. आगामी काळात बारसकर यांच्यावर शिवसेना शिंदे गटाकडून ओबीसी सेलची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
बस 200 फूट दरीत कोसळल्याने झाला अपघात. अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक. पहाटे 5:30 वाआजेच्या दरम्यान झाला अपघात.
सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शिष्टमंडळासह आज भगवान गडावर जाणार आहेत. भगवान गडावर जाऊन आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची करणार मागणी. मस्साजोग येथून 10 वाजता कुटुंबासह शिष्टमंडळ भगवान गडाकडे होणार रवाना. दुपारी 01 वाजता नामदेव शास्त्री महाराज यांची घेणार भेट.
बीडचे एसपी नवनीत कॉवत Action मोडवर आहेत. त्यांनी 51 वाळू तस्करांना बोलवून इशारा दिला. त्याचवेळी 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे.