
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपसून ( 13 सप्टेंबर) मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते ते कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान हे मिझोराममध्ये राज्यातील पहिल्या राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. एलफिनस्टन ब्रिजचे तोडकाम काम सुरू झाल्याने करी रोड ब्रिज, परळ ब्रीजवर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. करी रोड नाक्यावर सकाळ पासून वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर दिशा ठरविण्याचे कामही सुरू आहे. धाराशिव -येणाऱ्या चार दिवसात जिल्हाभरात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने अंदाज दर्शवला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच धाराशिव जिल्ह्यामध्ये वातावरण बदलले आहे तर काही ठिकाणी सकाळच्या वेळेत पाऊस देखील पडला. यासह देश-विदेश, महाराष्ट्रा, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. एकाच दिवशी तब्बल 35 जणांना चावा घेतल्याचे समोर आले आहे. रुग्ण रुक्मिणीबाई रुग्णालय व खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
चिपळूण मध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं जोरदार मुसंडी मारली आहे. चिपळूण शहरात जोरदार पाऊस आला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून भात शेतीला पाण्याची गरज होती त्यामुळे या पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
खराब हवामानामुळे आज सोलापूर-गोवा विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने विमान रद्द झाल्याची विमानसेवा प्राधिकरणाने माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता गोव्याहुन सोलापूरला येणारे विमान खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकलेलं नाही. त्यामुळे गोवा-सोलापूर आणि सोलापूर-गोवा दोन्ही बाजूची विमानसेवा आज रद्द झाली.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यात 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला आहे. या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
सांगलीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर दुपारी अचानक पावसाला सुरुवात झाली. दुपारपासून रिमझिम पाऊस जिल्ह्यामध्ये पडत आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच दिवसांनी पावसाने हजेरी जिल्ह्यामध्ये लावली आहे.
जालना शहरातील खडक तलाव परिसरामध्ये एका खदानीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सिद्धार्थ हरबळे आणि जस्मित रेहाल असे या तरुणांचे नाव असून दुपारी पोहण्यासाठी उतरले असता यातील एक जन पाण्यात अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या तरुणाने उडी घेतली. या घटनेत या दोन्ही तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोन्ही मयत तरुणांचे मृतदेह काढण्यात आले.
पुणे ग्रामीणमधील खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची चांगलीच धावपळ झालेली पहायला मिळाली. या पावसाने शेतातील सोयाबीन पिकाला याचा फायदा होणार आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागाक सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस बरसला. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तसेच जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
आगामी निवडणुकांच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. त्यातच जास्त त्रास देणाऱ्यांना लवकर आपल्यात घ्यावं म्हणजे आपला त्रास कमी होतो, असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. जळगाव जिल्हा भाजप पूर्वच्या वतीने जामनेरमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाजन यांनी हे विधान केलं.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी जालन्यात धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. सरकारने तात्काळ धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी समाज बांधवांची आहे. जोपर्यंतसमाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उपोषण करणार, असा निर्धार धनगर समाजाच्या नेत्यांनी बोलून दाखवला आहे.
जालन्यात आज धनगर समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 17 सप्टेंबर पासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी धनगर आंदोलक दीपक बोराडे हे 17 सप्टेंबर पासून उपोषणाला बसणार आहेत.
जम्मू-काश्मीरमधील अखनूरच्या गरखल भागात स्थानिकांनी एक संशयास्पद ड्रोन जप्त केला आहे. सध्या या ड्रोनची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण
पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत वाढ
पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ
कोर्टाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी
नाशिकमध्ये भर दिवसा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
पाणी पिण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन जाणांनी अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
दिवसाढवळा घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
सोलापुरात पावसाची आज पुन्हा तुफान हजेरी
शहरातील साखर पेठ परिसरातील पेट्रोल पंपाजवळ पाणीच पाणी
सलग तीन दिवसांपासून सोलापुरात जोरदार पाऊस
शहरातील मंगळवार बाजार, साखरपेठ, गणेश शॉपिंग सेंटर भागात पाणीच पाणी
जोरदार पावसामुळे नागरिकांचे हाल
धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात
आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरूवात
खरीपातील सोयाबीनसह पिकांच मोठं नुकसान होण्याची शक्यता
धाराशिव, तुळजापूर, येरमाळा परीसरात पावसाची जोरदार बॅटींग
नेपाळमध्ये सुरू असलेल्या अशांततेदरम्यान नेपाळच्या तुरुंगातून पळून जाऊन भारत-नेपाळ सीमेवरील विविध चौक्यांमधून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 75 कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) आतापर्यंत पकडले आहे. तथापि, प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पकडण्यात आले.
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना होत आहे. हा सामना 14 सप्टेंबरला होत आहे. मात्र या सामन्यामुळे वादाला फोडणी मिळाली आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावरून अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईतील दादर परळ परिसरात सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना तोंड द्यावं लागत आहे. सायनकडून परळकडे वाहनांच्या 4 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. प्रभादेवी पूल बंद केल्याने वाहतुकीच्या समेस्येला वाहतूकदारांना तोंड द्यावं लागत आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा मानला जाणार 125 वर्षांहून अधिक जुना प्रभादेवी पूल अखेर शुक्रवारी रात्री 10 वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
पुणे शहरात हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झालीये. गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहारात पावसाला सुरुवात झालीय. पुढील 3 तास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय.
मुंबईतील दादर परळ परिसरात सध्या प्रचंड वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना तोंड द्यावं लागत आहे… सायनकडून परळकडे वाहनांच्या ४ किलोमिटर लांब रांगा लागल्या आहेत.. प्रभादेवी पूल बंद केल्याने वाहतुकीच्या समस्याला वाहतूकदारांना तोंड द्यावं लागत आहे…
दिल्लीकल्याणचे आफ्ताब–सुफियान अटकेत”दिल्ली पोलीस व एटीएसकडून पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी रॅकेट उघड. टार्गेट किलिंगसाठी ठाण्यातील दोघांना दिल्लीतून अटक. दिल्लीहून शस्त्रास्त्र आणताना ठाण्याचे आफ्ताब व सुफियान पकडले
हॉटेल कृष्णाई येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक. आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. बैठकीला धुळे शहरासह शिरपूर शिंदखेडा साखरी येथील कार्यकर्ते उपस्थित..
बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी सुसाईड नोट लिहून युवकाची गळफास घेत आत्महत्या. पवन गोपीचंद चव्हाण असं तरुणाचं नाव, आरक्षणासाठी पवनने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या वाढलेल्या दराचा फायदा करून घेण्यासाठी सोने मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरात वाढ होत असल्यामुळे सोन्याने चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत.
१० सप्टेंबर २०२५ रोजी पुन्हा कल्याणचा तरुण गायब झाला. आफ्ताब कुरेशी नावाचा तरुण दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली. ISISसोबत मिळून दहशतवादी हल्ल्याची आखणी केल्याचा संशय.
चंद्रपूर जिल्ह्यात रोज रात्री मुसळधार पाऊस पडत असलेल्या ग्रामीण व शहरी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. इरई धरणाची सर्व 7 दारे एक मीटरने उघडल्याने ईरई-वर्धा नदी तुडुंब वाहत आहे. ग्रामीण भागातील कित्येक मार्ग बंद झाले आहेत.
हैदराबाद गॅजेट संदर्भात राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर स्थानिक प्रशासनाला गाव पातळीवर समित्या नेमण्याच्या सूचना दिल्या. समितांचे प्रशिक्षण ही पार पडलं. मात्र आणखीही गाव पातळीवरती कुणबी प्रमाणपत्र मागणी करण्यासाठी कुठलीही जनजागृती होत नसल्याने प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज कोठे करायचा आणि पुढची प्रोसेस काय असेल या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
फडणवीस हे आडनाव होते म्हणून सदाभाऊ खोत आमदार झाला,फडणवीस नावा ऐवजी देशमुख किंवा पाटील,नाव असते तर सदाभाऊ खोत कधीच आमदार झाला नसता,असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे.राजकारणात आपण अपघातानं आलो,पण कुणाचा तरी आधार लागतो,तो आधार देवाभाऊ यांचा मिळाला, त्यामुळेच आपण आमदार,मंत्री होऊ शकलो,असं ही सदाभाऊ यांनी स्पष्ट केले, सांगलीच्या कामेरी या ठिकाणी आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं समन्वय खूप चांगला. तुमच्या सूत्रांकडून काही वेगळ्या माहिती येतात. नगर विकास खात्यासंदर्भात फडणवीस सर निर्णय घेत असतील तर ते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतात, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.
अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. मराठा समाज मागास नाही असा युक्तीवाद प्रदीप संचेती यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.प्रदीप संचेती हे मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्यासाठी वेगवेगळे दाखले देण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिवंगत सुषमा स्वराज यांची आठवण काढत या परराष्ट्र मंत्री होत्या. तेव्हा त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटला विरोध केला होता. तेव्हा जयशंकर हे त्यांचे सेक्रेटरी होते. आता सेक्रेटरी परराष्ट्र मंत्री होत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
बाळासाहेबांवर बोलता तुमची औकात आहे का. बाळासाहेबांच्या देशभक्तीवर संशय व्यक्त करताना औकातीत राहावं. बाळासाहेब जावेद मियादांदच्या घरी गेले नव्हते. मियादादा मातोश्रीत आला होता. मोदीं सारखं केक खायला गेले नव्हते. बाळासाहेबांनी मियादांदला तोंडावरच सुनावलं होतं. त्यांनी भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला होता. त्यामुळे औकातीत राहूनच बोला. भाजपच्या अंधभक्तांनी बाळासाहेबांच्या देशभक्तीवर बोलू नये, असे उद्धव ठाकरे आज कडाडले
जालन्यात सकल बंजारा समाजाच्या दोन तरुणांचं जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याची आक्रमक भूमिका या तरुणांनी घेतली आहे. येत्या 15 तारखेला सकल बंजारा समाजाच्या वतीने जालन्यात भव्य विराट मोर्चा निघणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मोदी आणि भाजपवाले म्हणतात त्यावेळी सरदार पटेल पंतप्रधान हवे होते. पण मला वाटतं आज सरदार पटेल पंतप्रधान हवे होते. कारण सरदार पटेल असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता. आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्न शिल्लक राहिला नसता, असा खणखणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
देशापेक्षा पैसे प्यारे आहेत का?. प्रत्येक घरातून आम्ही मोदींना सिंदूर पाठवणार. उद्या मॅच पहायला जय शाह गेलेत तर त्यांना तु्म्ही देशद्रोही म्हणाल का? आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान मॅचआधी उद्धव ठाकरेंचा सवाल
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसला आहे. प्रकाश महाजन यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणाचा विरोधात जनहित याचिका दाखल करणाऱ्या मनोहर धोंड्याच्या संस्थेत मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही… रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी भूमिका घेतल्यानंतर ओबीसी बांधव आक्रमक… तर आता मराठा संस्थाचालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही…. रिसनगाव येथील ओबीसी समाज बांधवांनी जाहीर केली भूमिका…. मनोहर धोंडे सर यांची लढाई कायदेशीर आहे, मराठा समाजाच्या भूमिके नंतर समाजाचे स्पष्टीकरण….
मोदींचा अपमान केल्यावरून भाजप आक्रमक… नाशिकच्या रविवार कारंजा वर भाजपाकडून घोषणाबाजी… राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी
रायगड प्रकल्पाच्या आउटलेटचे काम पूर्ण न केल्याने, आउटलेटचे खोलिकरण न केल्याने शेतकऱ्यांच्या पिकात शिरले पाणी… प्रकल्पाच्या आउटलेट परिसरातील पळसखेड, भिलटेक, सोनोरा सावंगी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान… शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर पीक पाण्याखाली….. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी…
परळी तालुक्यातील डाबी येथील शोभा तुकाराम मुंडे या महिलेचा खून… शोभा यांचे पती तुकाराम यांनीच शोभा यांचा खून केला खून करून तुकाराम पळून गेला आहे… घटनास्थळी ग्रामीण पोलीस दाखल झाले आहेत… खून कशामुळे केला अजूनही स्पष्ट झाले नाही…
सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा रविवारी 14 सप्टेंबर रोजी पार पडत आहे. हे या स्पर्धेचे 14 वे वर्ष आहे. याची मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी सध्या सातारा पोलीस कवायत मैदानावर सुरु आहे. भारतामधून आलेल्या स्पर्धकांची राहण्याची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आयोजकांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. स्पर्धा पार पडत असताना साताराहून कास पठाराकडे जाणारा मॅरेथॉन रस्ता सकाळी सहा ते दहा या सुमारास बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
ठाण्यात वाहतूक कोंडीमुळे वाहतूक विभागाच्या विरोधात मनसे आक्रमक होणार आहे. वाहतूक विभाग वाहतूक कोंडी सोडवण्यास असमर्थ ठरलं आहे. ठाण्यातील तीन हात नाका या ठिकाणी असणाऱ्या वाहतूक विभाग कार्यालयासमोर मनसेच्या वतीने येत्या सोमवारी 15 सप्टेंबर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी वाहतूक विभागाला देखील जाब विचारला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.
अमरावतीच्या आश्रम शाळेतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याने हे प्रकरण समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात ही घटना घडली. मे महिन्यात सुट्टी दरम्यान 1 मे ते 25 जूनपर्यंत अत्याचाराची घटना घडली. वरुड पोलीस ठाण्यात अत्याचार विरोधी आणि पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय राहुल इवनाते या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनी भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या देणगी दर्शन पासची रक्कम वाढवली आहे. श्री तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव पार पडेपर्यंत देणगी पासच्या रकमेतील वाढ तशीच असणार आहे. नवरात्र महोत्सवात 200 रुपयाचा दर्शन पास 300 रुपयाने तर 500 रुपयाचा देणगी दर्शन पास 1000 रुपये आणि गेस्ट देणगी दर्शन पास 200 रुपयावरून 500 रुपये करण्यात आला आहे. तसेच 300 रुपये असलेली सकाळच्या अभिषेक पासची संख्या नवरात्र महोत्सवामध्ये 400 अशी वाढवण्यात आली आहे. श्री तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव पार पडेपर्यंत असे बदल राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.
नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीने जीव सोडला. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबावार काळाने घाला घातला. एकुलता एक नातू अपघातात मृत्यू पावला त्यामुळे त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजी जनाबाई व्हानमाने यांनीही जीव सोडला. एकाच दिवशी दोन मृत्यूंमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यवतमाळ मध्ये सुरू असलेल्या मोरारी बाप्पू यांच्या रामकथा कार्यक्रमाला सर्वात आधी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पडणवीस हे पोस्टल ग्राउंड वर आयोजित आदिवासी विकास विभाग कार्यक्रमालाही लावणार हजेरी.
घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर कारचा अपघात झाला आहे. यामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले. कारने बॅरिकेटिंग तोडून दुकानाला धडक दिली. यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.
उद्धव ठाकरे आज माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावरून सविस्तर भूमिका मांडणार. उद्या ठाकरेंची शिवसेना पंतप्रधा मोदींना सिंदूर पाठवत आंदोलन करणार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज, 13 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार दौऱ्यावर जाणार आहेत, तेथे ते कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
“एलफिंस्टन ब्रिज” चे तोडकाम काम सुरू झाल्याने करी रोड ब्रिज, परळ ब्रिज वर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करी रोड ब्रिज वरून दादर , लालबाग च्या दिशेची लेन बंद करून, परेल, लोअर परेल च्या दिशेची वाहतूक सुरू घेवण्याची शक्यता आहे.
एल्फिन्स्टन ब्रिज हा प्राभादेवी (west) आणि परेळ (east) या भागांना जोडतो, आणि पूर्व-पश्चिम दिशा ओलांडतो. मात्र नवीन रचनेनुसार हा पूल डबल डेकर बनविण्यात येत असून, त्याला 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दादर, करी रोड, परेल, भोईवादा, चिंचपोकळी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास होण्याची शक्यता आहे.