AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhdav Thackeray : सरदार पटेल आज पंतप्रधान हवे होते…उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला खोचक टोमणा

Uddhav Thackeray criticized BJP : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होणार आहे. त्याविरोधात उद्धव सेना आक्रमक झाली आहे. 14 सप्टेंबर रोजी सेनेची महिला आघाडी माझं कुंक, माझा देश असं आंदोलन करणार आहे. त्यापूर्वी ठाकरेंची आज अशी तोफ धडाडली.

Udhdav Thackeray : सरदार पटेल आज पंतप्रधान हवे होते...उद्धव ठाकरे यांचा मोदी सरकारला खोचक टोमणा
उद्धव ठाकरेंचा घणाघात
| Updated on: Sep 13, 2025 | 12:56 PM
Share

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामना धावपट्टीऐवजी राजकीय मैदानावर रंगला आहे. चार महिन्यांपूर्वी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संघर्षात देश एकसंघ झाला होता. रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावलं होतं. पण आता आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा सामना होणार आहे. त्याविरोधात उद्धव सेना आक्रमक झाली आहे. 14 सप्टेंबर रोजी सेनेची महिला आघाडी माझं कुंक, माझा देश असं आंदोलन करणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi) आज अशी तोफ धडाडली.

पाकिस्तान शिल्लकच नसता राहिला

मोदी आणि भाजपवाले म्हणतात त्यावेळी सरदार पटेल पंतप्रधान हवे होते. पण मला वाटतं आज सरदार पटेल पंतप्रधान हवे होते. कारण सरदार पटेल असते तर आजपर्यंत पाकिस्तान शिल्लक राहिला नसता. आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा प्रश्न शिल्लक राहिला नसता, असा खणखणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

सिंदूर रक्षा आंदोलन

उद्या शिवसेनेच्या वतीने निषेध राज्यभर केला जाणार आहे. देशभक्तांनी देशभरात निषेध करावा. पाकिस्तानवर चढाई केली होती. त्याला यांनी नाव चांगलं ठेवलं. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव. उद्याच्या मॅचला काय नाव ठेलं माहीत नाही. त्यांनी हर घर सिंदूर मोहीम राबवली होती. तीव्र विरोध झाल्याने त्यांनी ही मोहीम गुंडाळली होती. आता हर घरसे सिंदूर ही मोहीम राबवून मोदींना पाठवली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आम्ही तर पाठवतोच. उद्या रविवार आहे. संध्याकाळी मॅच आहे. उद्या ११ वाजता महिला आघाडीच्या कार्यकर्ता चौकात जमतील आणि डब्यात सिंदुराच्या पुड्या टाकतील आणि हे सर्व सिंदूर मोदींना त्यांच्या कार्यालयात पाठवणार आहोत. हर घरसे सिंदूर मोदींना पााठवणार आहे. आताच ही वेळ आहे. देशवासियांना सांगतो. मोदींना दमदारपणे सांगायला पाहिजे की नही होगा, असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून ठणकावले. ठाकरे सेनेची महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे. माझं कुंक, माझा देश असा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार आहे.

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.