Chagan Bhujbal : छगन भुजबळांचा मोठा डाव; EWS च्या कट ऑफवरून पेचात पकडलं, जरांगेंना पुन्हा डिवचलं
Chagan Bhujbal on EWS Cut off : ईडब्ल्यूएस की ओबीसी, कोणत्या आरक्षणाचा फायदा कशात आणि नुकसान तरी कुणाचं? यावर मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा डाव टाकला आहे. त्यांनी यावरून पुन्हा एकदा गणित मांडलं आहे.

10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण हवं की ओबीसीत यायचंय ते अगोदर ठरवा असा सूर कालपरवा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आळवला होता. आपलं आवाहन हे सुशिक्षित मराठा समाजाला असल्याचे सांगत त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चिमटा काढला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा मोठा डाव टाकला. ईडब्ल्यूएस की ओबीसी, कोणत्या आरक्षणाचा फायदा कशात आणि नुकसान तरी कुणाचं? याचं गणित मांडत त्यांनी आरक्षणावरून सुरू असलेल्या वादाचा कासरा ओढला. भुजबळ यांनी आता विरोधाची पद्धत बदलल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना साईडलाईन करत थेट मराठा समाजाला आवाहन करण्याची खेळी खेळली आहे. मराठा, कुणबी असा भेद स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच सांगेल. पण भुजबळांनी नेमकं कुठं बळ लावावं हे मात्र शोधल्याचे दिसून येत आहे.
गुन्हे मागे घेण्याला विरोध नाही
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याला आपला अजिबात विरोध नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. नियमाप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळ करण्यात येत असेल तर माझा विरोध नाही. हा नियम शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, ज्या ठिकाणी अन्याय झाला आहे त्या ठिकाणी मोर्चे काढले असतील, रस्ता रोको केला असेल त्यांना सुद्धा हाच नियम लागू करून त्यांनाही मुक्त करण्यात आलं पाहिजे, अशी महत्त्वाची मागणीही त्यांनी लावून धरली.
एसईबीसी आरक्षणावर भूमिका
भुजबळांना यावेळी एसईबीसी आरक्षणावर मत मांडलं. माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी जेव्हापासून मंडळ आयोग स्थापन केला तेव्हापासून आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढतो आहे.आमची केस सुप्रीम कोर्टाच्या नऊ बेंच समोर गेली तिथून त्याला व्यवस्थित चाळणी लावून ओके करून घेतलं. कोर्टाच्या पायऱ्या या चढावाच लागतात या लढाया सुरूच असतात, असे ते म्हणाले.
तर ईडब्ल्यूएस या दहा टक्के आरक्षणांमध्ये फक्त एकच समाज आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे आरक्षण दिलं त्यात देखील 80 / 90% एकच समाज आहे. आम्ही ओबीसी , दलित आदिवासी यात बांधल्या गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नव्हतं. तुम्हाला ते नकोय तुम्हाला EWS दिले त्यात 80 टक्के तुम्ही आहात.तरी सुधा तुम्हाला ओबीसी पाहिजे कशासाठी असा सवाल त्यांनी केला.
ईडब्ल्यूएसचे कट ऑफचे गणित
यावेळी छगन भुजबळ यांनी कट ऑफ आधारे कोणते आरक्षण फायदेशीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या केला. मराठा आरक्षण ईडब्ल्यूएसमध्ये येते. मेडिकल मध्ये व इतर क्षेत्रात ओबीसींचा कट ऑफ पॉईंट वरती आहे. तर ईडल्ब्यूएसचा कटऑफ खाली आहे. मग हा फायदा आहे की नुकसान आहे, असा सवाल त्यांनी विचारला. मराठा समाजाला खरं म्हणजे राजकारणामध्ये आरक्षण मिळालेच आहे. इथे काय एखादा व्यक्ती सरपंच होतो ते सुद्धा मराठा समाज नेते ठरवता. आमदार तुमचेच आहे, मंत्री तुमचेच आहे हे मी काय सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, असे भुजबळ म्हणाले.तुम्हाला राजकीय आरक्षण हवंय की शिक्षण नोकरीमध्ये हवंय असा सवाल त्यांनी केला.
जरांगेंना पुन्हा चिमटा
म्हणून म्हणतो ज्यांना समजत अशा नेत्यांनी त्यांनी बोललं. त्यांनी प्रकाश टाकला तर बरं होईल. आमचाही अभ्यास होईल आणि समाजाचा अभ्यास होईल, असा चिमटा त्यांनी नाव न घेता जरांगेंना लगावला. नाही तरी एकतर्फी सर्व चालेल आहे. यात नुकसान देखील होईल. इथे आल्यानंतर ते सोडावंच लागेल.काही लोकांनी ईडब्ल्यूएस चे सर्टिफिकेट घेऊन ठेवले. मराठा आरक्षण देखील चे घेऊन ठेवले. तुम्ही इडब्ल्यूएस घ्या मराठा आरक्षण घ्या. कुणबी म्हणून घ्या मग बाकीच्यांनी जायचं कुठे, असा सवाल त्यांनी केला. मराठा समाज सुप्रीम कोर्टाने देखील सांगितला आहे पुढारलेला समाज आहे. त्यामुळे या गोष्टीचा सर्व अभ्यासू लोकांनी विचार करायला हवा, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली.
