
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी वैष्णवीचा पती आणि सासू यांच्याविरुद्ध जेसीबी यंत्राच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हे यंत्र जप्त केलं आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. प्रशांत अविनाश येळवंडे यांनी 29 मे रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शशांत हगवणे आणि त्याची आई लता यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली. तर दुसरीकडे ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांना मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या निरनिराळ्या घटनांमध्ये सर्व मिळून 34 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा..
पश्चिम बंगाल सरकारने जे काम केले आहे ते उत्तम आहे…- अबू आझमी
देवी देवतांवर अभ्रद्र पद्धतीने टीका करणे हे तुम्हाला पटतं का? देवी देवतांवर किंवा महापुरुषांवर कोणी खालच्या पातळीवर टीका केली तर 10 वर्षाची शिक्षा झाली पाहिजे…
यासाठी कायदा निर्माण झाला पाहिजे, ही मागणी मी विधिमंडळात देखील केली होती…
यावर्षी आम्ही महिला आयोगाचे बजेट तीन कोटीवरून १० कोटी ७० लाखांवर नेले आहे…
पहिल्यांदाच नंदिनी आव्हाडे यांच्याकडे आयोगाच्या सचिव म्हणून पूर्णवेळ जबाबदारी दिली…
पेन्शनची प्रकरणं १० वर्षापासून पेंडीग होती…
वन स्टॅाप सेंटर वाढविण्याचा प्रयत्न आहे. आधी ते एन्जीओ चालवणार होते आता मात्र ते राज शासनाकडे आले आहे..
अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
सीडीएस अनिल चौहान यांचं मोठ विधान
आपल किती नुकसान झाल हे महत्वाचं नाही तर आपण काय प्रतिकार केला हे महत्वाचं आहे
आपला नुकसान काय यावर आता बोलण योग्य नाही आम्ही ती माहिती देवू
मात्र पाकिस्तानने सांगितल होत मी ४८ तासात भारताला गुडघ्यावर आणू
आपण ८ तासात पाकिस्तानला गुडघ्यावर आणल
भारताची दहशत वादविरोधातील लढाई सुरूच राहील
भारताने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पाकिस्तानवर हल्ला केला
आपण एवढा खोल हल्ला केला हे त्यांना नंतर कळाला
त्यांना अजून नुकसान करून घ्यायचं नव्हत म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केला
ठाकरेंच्या शिवसेनेतील नाशकातील नेते नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे. नाराज नेत्यांनी नाशकात सर्वात मोठा बंड केला आहे. हे सर्व नाराज असलेले नेते संजय राऊतांचे राईट हँन्ड असल्याचं म्हटलं जातं.तसेच काल फडणवीसांना भेटणारे बडगुजर आज पक्षात नाराज असल्याचं चित्र आहे. विलास शिंदे देखील पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जात आहे.
राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आहे. देवेन आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं समजत आहे. राज ठाकरेंनी देवेन यांची सदिच्छा भेट घेतल्याच म्हटलं आहे. त्यामुळे चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली याबाबत माहिती अजून समोर आलेली नाही.
गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आलेले पाहायला मिळाले.गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांशी संवादही साधला तसेच वडिलांच्या आठवणींना उजाळाही दिला.
विश्रामबाग चौक येथील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली तोडफोड. राज्य कामगार विमा योजना व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत करण्यात आली तोडफोड. तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील पेपर फुटी प्रकरणात शिक्षकासह तिघांना युनिट सहाने केली अटक. इंजीनियरिंगचा पेपर फोडणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना अटक. पुणे पोलिसांच्या युनिट सहाची करवाई, अटक करतान दोन लाख रुपये जप्त.
बीडमध्ये ऊसतोड कामगार आठशे महिलांच्या गर्भ पिशव्या काढल्याचा प्रकरण समोर आल्यानंतर यावर माजी मंत्री काँग्रेसचे नेत्या यशोमती ठाकूर यांनी संतप्त सवाल राज्य महिला आयोगावर उपस्थित केला. बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, महिला आयोग काय झोपला आहे काय? अतिशय शॉकींग बातमी आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.
“माणिकराव कोकाटे यांच्यावरती आता भाष्य करण्याची ती वेळ नाही. त्यांची जी वक्तव्य होती, ती कोण कोणत्या परिस्थितीमध्ये झाली ती वेगळी गोष्ट आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता कोणत्याही पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने पाळली पाहिजे. आजचा केंद्रीय मंत्र्यांचा दौरा या सर्वांवरती फुंकर घालणारा होता” असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
सोलापुरातील कोंतम चौकाजवळील धाकटा राजवाडा येथे जुन्या भांडणाच्या वादातून तुफान राडा झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धाकटा राजवाडा परिसरात तलवार, रॉड, बॅट आणि दगडाच्या साह्याने झालेल्या मारामारीत सात जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचताच परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील चणेगाव या ठिकाणी गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी जलजीवन मिशन योजने विरोधात थेट टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलय. मागील 18 महिन्यांपासून या गावात जलजीवन मिशनचे काम सुरू असून अद्यापही गावकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी मिळालं नसल्याने हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि संताप व्यक्त करत आहेत.
राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळ राजभावनात दाखल झाल्या आहेत. रोहिणी खडसे, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके, विद्या चव्हाण या पाच महाविकास आघाडीच्या महिला राज्यपालांच्या भेटीला राजभवनात दाखल झाल्या आहेत. काही महिला सदस्य अजून देखील राजभवनाच्या बाहेर उभ्या आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील राम गोरख शेळके यांनी 80 हजार रुपये खर्च केले. मिस्तरी काम करुन एक एक रुपया गोळा करून टोमॅटोची शेती केली. सव्वा एकर मध्ये सात हजार टोमॅटोच्या झाडाची लागवड केली. एप्रिल महिन्यात ठिबकने पाणी देऊन शेती फुलवली होती. ऐन तोडणीला आलेले टोमॅटो अवकाळीने हिरावले. सर्वच शेतात पाणी साचल्याने सर्व टोमॅटोची बाग जळून गेली. आज शेतात सर्वत्र फक्त लाल चिखल झाला. टोमॅटो सडून गेले आहेत.
स्वतःसाठी आणलेली दारू मुलाने पिल्याने रागावलेल्या बापाने मुलाची हत्या केली. अमरावती जिल्ह्यातील वरूड पोलीस ठाण्यातंर्गत ही घटना समोर आली. झोपेत असलेल्या मुलावर पित्याने हल्ला चढवला. त्यात तो गतप्राण झाला.
खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाची सातारा येथील पोवई नाका येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी होळी केली. शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख रणजीतसिंह भोसले यांच्यासह पदाधिकार्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडून जाळून निषेध केला.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाचे सदस्य राजभवन बाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे. पुणे काँग्रेस महाराष्ट्र महिला मंडळ अध्यक्षा संगिता तिवारी राज भवन बाहेर उपस्थित आहेत. थोड्या वेळातच महाविकास आघाडीचे महिला सदस्य त्याचबरोबर रोहिणी खडसे, सुषमा अंधारेंसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ एकत्र येणार असून ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनामासाठी भेट घेणार असल्याची माहिती आहे.
राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराबद्दल आज महाविकास आघाडीचे महिला शिष्टमंडळ राज्यपालांची भेटणार आहे. यामध्ये खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचा समावेश आहे.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धती, SOPs आणि अडचणींवर विशेष शासकीय बैठक आहे, मला बोलावण्यात आलंय, त्यासाठी मी पोहोचले आहे, असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया (SOPs), अंतर्गत अडचणी, अंमलबजावणीची स्थिती, तसेच आयोगाकडुन असलेल्या अपेक्षांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा यावर सविस्तर विचारमंथन होणार आहे. राज्यात महिला अत्याचार वाढतोय .याबाबत मी बैठक संपल्यावर भाष्य करेन. सध्या काही बोलणार नाही, असं चाकणकर म्हणाल्या.
कचरा प्रकल्प बंद करा, स्वच्छ हवा मिळू द्या अशी मागणी करत सूस खिंड परिसरातील प्रकल्पाविरोधात नागरिकांनी आंदोलन केले. बाणेर येथील सूस खिंड परिसरात (सर्व्हे नं. 48/2/1) महापालिकेने उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात नागरिकांनी मानवी साखळी करून आंदोलन केले.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. ब्रह्मगावात हिंगणकर येथील वस्तीवरील रेड्यावर बिबट्याने हल्ला चढवला. वर्षभरात बिबट्याने 20-25 जनावरांवर हल्ला चढवला.
लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. गिरीश महाजन हे भाजपचे दलाल असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ही दृश्ये आहेत. अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांची झालेली ही अवस्था अतिशय अस्वस्थ करणारी आहे. कर्जाऊ पैसे घेऊन बाग फुलवली मात्र हातातोंडाशी आलेला घास मातीत मिळाला. दुर्दैवाने कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाने प्रत्येक शेतकर्याची केली आहे. झालेल्या नुकसानाची सरकारने संवेदनशीलतेने दखल घ्यावी. त्वरित नुकसान भरपाई देऊन शेतकर्यांना धीर द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटाला गेले आहेत. राज ठाकरे अचानक पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले असून या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवारांना हिंगोलीत मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच निष्ठावंत अनिल पतंगे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
महिला आयोगाबाबत आज विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र या बैठकीला निमंत्रण नसल्याने महिला आयोगाच्या माजी सदस्य नाराज आहेत. महिला आयोगाच्या कार्यपद्धतीसाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. पित्याकडूनच मुलाचा खून झाला. स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू मुलाने ढोसली, याचा राग आल्याने वडिलांनीच मुलाला संपवलं.
वडिलांनी आणलेली दारू मुलगा प्यायल्याने दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडलं, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा गावातील धक्कादायक घटना आहे. आरोपी पिता हिरामण धुर्वेला पोलिसांनी अटक केली आहे.
मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या व पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. 10 जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे.
मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा हा पूल अत्यंत महत्ताचा आहे.
एकूणच पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्ट, कॅट आईज आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे 10जूनपर्यंत पूर्ण करण्यात येतील असे समजते.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अधिसूचना या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. ६ मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले होते. या अधिसूचनेसाठी ४ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. यामुळे या आठवड्यात अधिसूचना काढणे अनिवार्य असणार आहे.
नाशिकमध्ये कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. नाशिक शहराच्या दोन वेगवेगळ्या भागात कोयता गँगचा धुमाकुळ सुरु आहे. अंबड संजीवनगर भागात आणि नाशिक रोड येथील जेलरोड परिसरात कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील १४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वर्षभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसीमध्ये बदली करण्यात आली आहे. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची धुरा देण्यात आली आहे.
ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पूर्णतः काळोख पसरला आहे. मध्यरात्रीपासून अधून मधून पडणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास हाजेरी लावली आहे. सध्या तरी मध्य रेल्वे आणि द्रुतगती महामार्गावर वाहतूक सुरळीत आहे.
मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मे महिन्यात राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासून मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण आहे.
ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ढगाळ वातावरणासह हवेत गारवा पसरला आहे. पावसाच्या ढगांनी पूर्णतः काळोख पसरला आहे. मध्य रेल्वे आणि द्रुतगती महामार्गावर वाहतूक सध्या सुरळीत आहे.
मुंबईच्या नरीमन भवनमधील BEST मीटर बॉक्सला सकाळी 8.30 वाजता अचानक आग लागली. परिसरात धुराचे लोंढे असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नरीमन पॉईंट परिसरात तात्पुरती गर्दी आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी ठाण्यात ऑनलाइन सव्वा लाख अर्ज आले आहेत. राज्यातील सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे शासनाने बंधनकारक केले आहे. बनावट नंबर प्लेट लावून होणारे गुन्हे रस्त्यावर धावणारे वाहने नेमके कोणाचे या नंबर प्लेट वरून वाहनांची खरी ओळख पटणार आहे. 98 हजार वाहनांना अपॉइंटमेंट दिली असून 60 हजार वाहनांनी नवीन नंबर प्लेट बसवल्या असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहनने दिली आहे. 30 जून 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार.
कार्यारंभ आदेश नसलेल्या आरोग्य केंद्रांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २६ मार्च रोजी घेतलेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली किंवा आदेश मिळालेली कामे प्रथम पूर्ण करून कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. कोणत्याही नवीन आरोग्य प्रकल्पाला मंजुरी मिळणार नाही, जोपर्यंत पूर्वीची कामे पूर्ण होत नाहीत.
मेट्रो 4 मार्गिकेवर एकाच रात्रीत 8 गर्डर्सची यशस्वी उभारणी करण्यात आली असून ऑगस्टमध्ये चाचणी मार्ग मोकळा झाला आहे. वडाळा-कासारवडवली मेट्रो 4 मार्गावरील कापूरबावडी स्थानकात एका रात्रीत 8 यू गर्डर्स उभारले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक अडथळा न आणता काम पूर्ण केले. या यशस्वी टप्प्यामुळे मेट्रो मार्गाच्या कामाला गती मिळाली.
अमरावतीच्या मेळघाटमध्ये खडीमल गावात पाण्याचा टँकर येताच हंडाभर पाण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन दिवसानंतर केवळ टँकर येत असल्याने नागरिकांना ते पाणी अपुरं आहे. सध्या मेळघाटात 11 गावात 20 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरु आहे.
मे महिन्याच्या अभूतपूर्व पावसानंतर आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे.