
राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जीआरची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे. या आंदोलनाला मनसे नेते नितीन सरदेसाईही हजेरी लावणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे येत्या ५ जुलैला होणाऱ्या मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना भवनात ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होत आहे. तर मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यात ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख विलास शिंदे यांचाही समावेश आहे. ज्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे.
महायुती सरकारने तीव्र विरोधानंतल अखेर हिंदी सक्तीचे जीआर रद्द केले. त्यानंतर पुण्यात मनसेचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मनसेकडून पुण्यातील गुडलक चौकात पेढे वाटत आनंद साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत आनंद साजरा केला जात आहे.
राज्य सरकारने हिंदी जीआर रद्द केल्यानंतर आता मनेसेने मोठा निर्णय घेतला आहे. मनसेची 30 जून रोजी महत्वाची बैठक होणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत राज ठाकरे नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत सर्व मनसे नेते उपस्थित राहणार आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मी जीआर काढला तर मग 3 वर्ष झोपले होते का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे. माझ्या अध्यक्षतेखाली फक्त समिती नेमली होती. हिंदीचा जीआर फडणवीस यांनीच काढला, असही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे बंधू 5 जुलैला मुंबईत हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढणार होते. मात्र त्याआधीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचे 2 जीआर रद्द केले आणि ठाकरे बंधुंना एकत्र येण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. त्यानंतर आता 5 जुलैच्या मोचाऐवजी विजयी सभा होणार, अशी माहिती शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
राज्य सरकारने तीव्र विरोधानंतर अखेर हिंदी सक्तीचे 2 शासन निर्णय रद्द केले. त्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत आता काय काय बोलतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय अखेरीस रद्द केला आहे. ठाकरे बंधुंनी हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र त्याआधी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेतून हिंदी सक्तीचे दोन्ही शासननिर्णय रद्द करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्याला पावसानं झोडपलं
नंदूरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
वादळामुळे दोन राज्यांना जोडणाऱ्या नेत्रंग शेवाळे महामार्गावर झाडं कोसळल्याची घटना
झाडामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीस अडथळा
रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक झाली होती ठप्प
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना मध्यवर्ती शाखेबाहेर आज शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले आहेत. आंदोलनात सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या परिपत्रक फाडत त्याची होळी करत, “मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया!” अशा आशयाचे बॅनर झळकले.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांकडून बँक अधिकाऱ्याला दम देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपल्याशी हिंदीत आणि मोठ्या आवाजात बोलायचे नाही म्हणत दम दिल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. किसान युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून अनुदानाची रक्कम कपात केल्याचा आरोप करत बँक अधिकाऱ्याला तंबी दिल्याचं समोरी येतेय.
भाजपच्या बूलढाणा चिखली मदतार संघाच्या आमदार श्वेता महाले यांनी वारकर्यांसोबत फुगडी खेळण्याचा घेतला आनंद. चिखली मतदारसंघातील मौजे म्हसला येथील आळंदी ते पंढरपूर दिंडीला फलटण येथे भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी वारकरी माऊली व श्री विद्याधरजी महाले यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा घेतला आनंद.
दिवसभर इंग्रजी बोलतात आणि रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करण्याकरिता यांचं प्रेम जागृत होते, असा टोला परिणय फुकेंनी दोन्ही ठाकरे बंधुंना लगावला.
गडचिरोलीत पाच वर्षापासून प्रतीक्षेत असलेले 45 युवक युवती अनुकंपाच्या नियुक्तीवर जिल्हा परिषदेत रुजू झाले. जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत अनुकंप यादी पाच वर्षापासून प्रतीक्षेत होती. अखेर अनुकंपाधारकांना जिल्हा परिषद मार्फत नियुक्ती देण्यात आली. हे 45 युवक युवती व त्यांचे कुटुंब नियुक्ती मिळाल्यामुळे आनंदात आहे
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील प्रमुख चार दरवाजांना चांदीने मडवण्याच्या कामाला सुरुवात झाली.एक दरवाजा 30 किलो चांदीने मडवला जाणार आहे. चारी दरवाजांना मिळून 120 किलो चांदी लावली जात आहे. श्री विठ्ठलाचा नैवेद्य दरवाजा, हत्ती दरवाजा, हनुमान दरवाजा, चोळखांबी दरवाजा असे प्रमुख चार दरवाजे आज रात्री चांदीचे होणार आहेत.
राज्य सरकारने पारित केलेल्या अध्यादेशाची ठाकरे गटाचे पदाधिकारी होळी करणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात हिंदी भाषेच्या विरोधातील पोस्टर घेत निदर्शन केली. हिंदी सक्ती बंद करा महाराष्ट्र वाचवा ठाकरे गटाचे नाशिक मध्ये आंदोलन केले.
नाशिक महापालिका ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विलास शिंदे सह इतर माजी नगरसेवक ,पदाधिकारी यानी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला.
अहिल्यानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि राजकिय पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोर्चाच आयोजन केलं आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी सहभागी होत संग्राम जगताप यांना समर्थन दिलं आहे. “संग्राम जगताप हे माझे मित्र असून आतापर्यंत त्यांना माझ्या अनेक गोष्टींना पाठिंबा दिला आहे. मी देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोय” असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.
मराठी मुलांना कामावरून काढून टाका, मगच पगार होईल अशी धमकी सिक्युरिटीच्या एमडीची कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी संभाषण मोबाईलवर रेकॉर्ड करत अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र मोर्चा काढत असून दुसरीकडे मेट्रोच्या कामात देखील स्थानिक आणि मराठी माणसांना डावलत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मीरा भाईंदर मधील गोरक्षक आणि वाहतून सेनेच्या शेकडो नागरिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज ठाकरे यांच्या स्पष्ट विचारांनी प्रेरित होऊन, मिरा भाईंदर शहरातील शेकडो नागरिकांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक मराठी तरुणांनी मनसेत प्रवेश केला आहे.
बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खंत व्यक्त केली. “बोरामणीचं विमानतळ व्हावं असं मी अनेकवेळा सांगितलं. पण काही हट्टी लोकं असतात, ते ऐकत नाहीत. बोरामणीचं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं क्रेडिट मला देऊ नका, पण ते सुरू करा. हवं तर आमचं नाव कचऱ्याच्या पेटीत टाका, पण सोलापूरच्या विकासासाठी ते बोरामणीचे विमानतळ सुरू करा,” असं ते म्हणाले.
बारामतीत उद्धाटनाच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन प्रोजेक्टच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. परंतु या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलंय.
“मनसे आणि शिवसेना यांची युती होईल की नाही यासंदर्भात आम्ही काहीच करत नाही. मराठी माणसावर अन्याय होत असेल आणि मराठी माणसाला दडपण्याचा प्रयत्न करण्यात येणार असेल तर त्याविरुद्ध उभं राहण्याचं काम मनसे स्थापनेपासून करत आलं आहे. युतीबद्दलचा निर्णय राज ठाकरे स्वतः घेतील. युती होणार आहे की नाही याबद्दल अजूनही आम्हाला कल्पना नाही,” असं नितीन सरदेसाई म्हणाले.
हिंदी सक्तीविरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चाबाबत मनसे नेते आणि पोलिस अधिकाऱ्यांची काल महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मनसे नेत्यांनी त्यांच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती सादर करत पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले. मात्र पोलिस अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हा मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम आणि अटींच्या अधिन राहून काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
“राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिल्यानंतर सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा हा कौल बघून सरकारला निर्णय मागे घ्यावा लागेल असं वाटतंय. जर ते निर्णय मागे घेणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. सक्तीचा निर्णय मोर्चाच्या आधीच मागे घेतला तर त्याचा आनंदच आहे,” अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली.
दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक.. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन… मनसेची दक्षिणमध्ये पदाधिकारी बैठक राजगड येथे तर दक्षिण मुंबई पदाधिकारी बैठक मुंबई मराठी पत्रकार संघ येथे
ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या विरोधात भाजप आमदार राम कदम आक्रमक झाले आहेत… ”मविआ काळात त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवर शिक्कामोर्तब उबाठा गटाच्या खोटारडेपणाची होळी करणार,” असे आमदार राम कदम यांनी म्हटले आहे… घाटकोपर येथे कदम यांच्यावतीने ठाकरे गटाच्या विरोधात आंदोलन केले जात आहे..
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण सोहळा आज इंदापूर मध्ये रंगणार… रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी… रिंगण सोहळा स्थळी जय्यत तयारी….
वाहतूक नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या हाईट्स बॅरिकेटला पहाटे 5 च्या सुमारास एसटी बसने दिली जोरदार धडक… सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी टळली मात्र या अपघातात एक बाईकस्वार किरकोळ जखमी असल्याची माहिती… कल्याण सुभाष चौक ते वालधुनी उड्डाणपुलावरील घटना .. पोलीस तपास सुरू
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून आमदार इद्रिस नायकवडी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर शहरांमध्ये आगमन होत आहे. गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी हजारो सोलापूरकर एकवटले आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आदी स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे.
बीड आष्टी येथील ॲकॅडमीमध्ये रात्रीच्या जेवणामुळे 40 तरूणांना विषबाधा झाली आहे. या अकॅडमीत आष्टी तालुक्यासह इतर शासकीय सेवेत जाण्यासाठी नवनिर्वाचित उमेदवार प्रशिक्षणासाठी ॲडमिशन घेत असतात. यामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या जेवणानंतर दोनच्या सुमारास विद्यार्थ्यांना जुलाब व उलटी होऊ लागली.
डोंबिवली पूर्वेकडील आजदेपाडा येथील साई दर्शन इमारतीत मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी घरात कुटुंब असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराला बाहेरून टाळा लावला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घरात अडकून पडले. याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कुटुंबाची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून शेजाऱ्यांची चौकशीही सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि ठाकरे गट दोन्ही आक्रमक झाले आहेत. दादर येथील शिवसेना भवनसमोर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात येणार आहे. ज्यात कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा असे आवाहन करत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाने देखील याच परिसरात बॅनरबाजी करत ‘हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ज्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेला पूर आता ओसरला आहे. कारण गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीपात्रात पाणी सोडले जात होते. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट अद्यापही कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिमझिम सुरू असून, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
बीड जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी फरार असलेल्या दोन शिक्षकांना अखेर अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. विजय पवार याला लिंबागणेश येथून एका कारमधून पलायन करत असतानाच शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले, तर प्रशांत खाटोकर याला चौसाळा येथून अटक करण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर या दोन्ही आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं, सगोसोयरे ही अधिसूचना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आज अंतरवाली सराटीत बैठक होत आहे. या बैठकीसाठी बीडमधून मराठा समाज अंतरवालीकडे रवाना झाला आहे. आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मुंबईकडे जाण्यासंदर्भात देखील निर्णय होणार आहे.