
मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटं उशिराने सुरू. मुसळधार पावसामुळे कल्याणवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. वेस्टर्न रेल्वेवरील विरार-चर्चगेट लोकल गाड्या 5 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर लाईनवरील नेरूळ-सीएसएमटी लोकल गाड्या 6 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहेत. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे चाकरमानी आणि प्रवाशांना सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठा फटका बसला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह मुंबई उपनगरातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पुणे शहर आणि जिल्हा परिसरात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुण्याचा घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे… यासह देश-विदेश, महाराष्ट्रा, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
आज बीडमध्ये बंजारा समाजाचा हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी आरक्षणात समावेश करावा या मागणीसाठी विराट मोर्चा संपन्न झाला. या मोर्चासाठी आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना वंजारी-बंजारा एकच आहेत असं म्हणताच आंदोलकांनी खालुन जोरदार घोषणाबाजी केली होती. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान या बंजारा बांधवांनी वंजारी आणि बंजारा एक नसून धनंजय मुंडे यांनी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. यामुळे आम्ही तिथेच त्यांचा घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यामुळे त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या गोरी गंधारी शिवारामध्ये जोरदार पाऊस
पुलावरून पाणी वाहत असताना पुलावर दुचाकी नेण्याचा प्रयत्न अंगलट
दुचाकीस्वार वाहून जाताना थोडक्यात वाचला
गावकऱ्यांनी दुचाकीसह वाहून जाणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला
गोंदिया जिल्ह्यात आज दुपारपासूनच आकाश ढगाळ झाले होते, सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, तसेच या पावसामुळे धान पिकांना देखील फायदा होणार आहे.
सारथी संस्थेत चुकीचा कारभार सुरु आहे. याबाबत आता मराठा समन्वय क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात कामकाजातील चुकारपणाची माहिती देण्यात आली आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील नदीला पूर आला आहे. नदीच्या काठी रागणारा 28 वर्षीय तरुण अफरोज बशीर बागवान ही पुराच्या पाण्यात वाहून गेला. यानंतर त्याचा शोध सुरू होता. आता स्थानिकांना त्याचा मृतदेह झाडात अडकलेला आढळला आहे.
आमदार धनंजय मुंडे यांनी वंजारा-बंजारा एक आहे अशी घोषणा केली होती. यावर बंजारा समाज आक्रमक झाला आहे. या अगोदरच तुम्ही आमच्या ताटातले अडीच टक्के आरक्षण घेतले आहे. वंजारा-बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या अशी मागणी करत बंजारा समाजाने घोषणाबाजी केली.
भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक करण्यात आली आहे. राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी निमसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. 22 ऑगस्टला धोत्रेवर करण्यात प्राणघातक हल्ला झाला होता. 29 ऑगस्टला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता निमसे यांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण मधील पटेल मार्ट मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठी आलं नाही तर काय फरक पडतो, असं पटेल मार्टमधील अमराठी महिला कर्मचाऱ्याने म्हटलं. कल्याण टिळक चौकातील पटेल मार्टमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. त्यानंतर संतप्त ग्राहकांनी आवाज उठवला. पुढील एक महिन्यात पूर्ण स्टाफला मराठी आले नाही तर आंदोलन करणार असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला. त्यानंतर पटेल मार्टच्या मॅनजमेंटने ग्राहकांशी मराठीत बोला, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
ST आरक्षण न दिल्यास मंत्र्यांच्या घरी-मंत्रालयात धनगराच्या मेंढ्या सोडणार, असा इशारा यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुराडे यांनी दिला आहे. समाजाला ST मधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या नेत्यांची पुण्यात राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली. या दरम्यान कुराडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
या सरकारने इकडच्या मराठा बांधवांची फसवणूक केली आहे. हा तकलादू जीआर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही, असं वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर सोलापूर म्हणाले.
बीडच्या आष्टी तालुक्यातील कडी नदीला मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्याचा साप्ते कुटुंबाच्या घराला वेढा पडला होता. यामध्ये हे कुटुंब पहाटेपासून घरावर अडकून पडले होते. यानंतर काही वेळापूर्वी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साप्ते कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
थेऊरमध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामध्ये जवळपास थेऊरमधील रुकेवस्ती येथील जवळपास 40 घरामध्ये पाणी शिरले. गाई, म्हशी आणि 30-40 शेळ्यांचा यामध्ये मृत्यू झालाय. तर काही जनावरे वाहून गेली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरलेय त्यांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
पाथर्डी तालुक्यात ढग फुटी सदृश पावसाचे थैमान घातले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ज्या ठिकाणी नागरिक अडकले त्या ठिकाणावरून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन काम करत आहे. पुरात अडकलेल्या ग्रामस्थांची जेसीबीच्या सहाय्याने सुटका करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीला पूर आला आहे. यामुळे काही घरं, मंदिरांसह शेतीपिकं पाण्याखाली गेलीआहेत. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरं, वाहनं आणि घरोपयोगी वस्तुंचेही प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चतुर्श्रृंगी पोलीस ठाण्यात काल दाखल झालेल्या एफआयआरच्या चौकशीसाठी पुणे शहर पोलिसांचे एक पथक मनोरमा खेडकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. नवी मुंबईतील रोड रेज घटनेत दोन अज्ञात व्यक्तींनी एका ट्रक चालकाच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोरमा खेडेकर यांच्या निवासस्थानी आणल्याचा आरोप आहे. पुणे शहर पोलिसांनी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई खेडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
#WATCH | Maharashtra: A team of Pune City Police arrived at the residence of Manorama Khedkar for the investigation of the FIR registered against her yesterday in Chaturshrangi Police station.
Pune City Police have registered a case against Khedekar, mother of ex-IAS trainee… pic.twitter.com/HVYlug8gJQ
— ANI (@ANI) September 15, 2025
नेपाळमधील विविध तुरुंगांमधून पळून गेलेल्या एकूण 79 कैद्यांना भारत-नेपाळ सीमेवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) अटक केली आहे.
जळगावच्या बिलवाडी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मयत व्यक्तीच्या संताप्त नातेवाईकांसह समाजबांधवांच्या जमावाने आरोपींच्या घरावर दगडफेक करत हल्ला केला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बिलवाडी गावात नेण्यात आला होता मात्र या ठिकाणी अंत्यसंस्कार सोडून काही संतप्त समाज बांधवांनी आरोपीच्या घराकडे मोर्चा वळवला. संतप्त जमावाने पोलिसांच्या समोर आरोपीच्या घरावर मिळेल ते साहित्य फेकत, दगडफेक करत तोडफोड केली. बिलवाडी गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा निघाला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून एक मोठा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी पोलीस दाखल झाले आहेत. बंद असलेलं गेट ओलांडून पोलीस बंगल्याच्या आत गेले आहेत. पोलिसांनी लावलेली नोटीसह फाडण्यात आली होती. नवी मुंबईत ट्रक क्लिनरचं अपहरण केल्याप्रकरणी कारवाई सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच खेडकर कुटुंबाकडून चौकशीसाठी कोणतंही सहकार्य झालेलं नाही असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
बीडमध्ये बंजारा समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाने पांढरे झेंडे हातात घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन केलं. ST आरक्षणासंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील जायकवाडी वसाहत पाण्याखाली गेली आहे. पावसामुळे संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाल्यासारखं वाटत आहे. तर दुसरकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आहे. आष्टीमध्ये अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करा अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत.
मुसळधार पावसात स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणाऱ्या बीएमसी कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल. अनवधानानं उघड्या मॅनहोलमध्ये पडुन अनेकदा जीवघेणे अपघात होतात. ते टाळण्यासाठी बीएमसी कर्मचाऱ्याने मॅनहोलच्या झाकणावरच बसुन पहारा दिला.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच कालपासून शहरातही पाऊस जोरदार पडत असल्याने खडकवासला धरणातून १५ हजार क्युसेस वेगाने मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर कोकणातील मनसेचा चेहरा कोण? हा प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे थेट पदाधिकारी यांना भेटून चर्चा करणार आहेत. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहाघर, खेड, दापोली आणि मंडणगड येथील पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली जाणार.
अहिल्यानगर शहरासह अनेक तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आल्याने शहरासह अनेक तालुक्यात देण्यात आली सुट्टी.
अहिल्यानगर शहरासह जिल्हात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव इथल्या नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आला आहे. या पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल होत आहेत. सैफुल, स्वामी विवेकानंद भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे, ड्रेनेजचं पाणी घरात शिरल्याने सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे सोलापूरकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जालन्यातील गोंदी इथल्या गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. गोंदी महसूल मंडळामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने परिसरातून वाहणाऱ्या मांगणी, डोरली, गल्हाटी या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडून काठावरील गोंदेश्वर महादेव मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे.
मुसळधार पावसाचा फटका तिन्ही रेल्वे मार्गांना बसला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील अप लोकल 20-25 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर मध्य रेल्वेवरील डाऊन लोकल 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल 15-20 मिनिटे उशिराने सुरू आहेत. अप-डाऊन या दोन्ही मार्गावरील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडत आहे. आचार्य देवव्रत यांनी राज्यपालपदाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
नाशिक – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आदिवासी आयुक्तालयासमोर बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली. गेल्या 71 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 च्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. बाह्य स्त्रोताद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा जीआर रद्द करावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.
चाकण-पुणे परिसरात मुसळधार पावसाचा कहर. वाकी येथे पुणे-नाशिक महामार्ग पाण्याखाली. धोकादायक पाण्यातून प्रवासी व कामगारांची वाहतूक सुरूच. अवजड वाहनांची धोकादायक वाटचाल, अपघाताचा धोका वाढला. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवाशांचा जीव धोक्यात.
“सर्व रस्त्याची चाळण झालीय.आजही CSMT स्थानकाबाहेर ट्रॅफिक जॅम बघितलय. आज बांधून 150 वर्ष झाली. त्याला प्लानिंग म्हणतात. आपल्याला पैसे खायचे आहेत. मोनो, मेट्रोमुळे मुंबईतील रस्ते छोटे झालेत” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
अमरावती-नागपूर महामार्गावर मोझरी गुरुकुंजमध्ये मोकाट जनावरांचा मुक्काम. महामार्गाच्या मधोमध मोकाट जनावरे सतत बसत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना अडथळा. IBR प्रशासनाचे मोकाट जनावरांकडे दुर्लक्ष. मोकाट जनावरांमुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले.महामार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांची मागणी.
करमाळा तालुक्यातील कंदर येथे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ लागले 20 फुटी बॅनर. कुर्डु येथील अवैध मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी केला होता आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी लावले आय पी एस अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ बॅनर. ही तर बॅनर लावण्याची सुरुवात असून असे हजारो बॅनर आय पी एस अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ लावणार बॅनर अतुल खूपसे पाटील यांची माहिती.
“संघाची इच्छा नसताना सरकारने खेळायला लावलं असं गावस्कर म्हणाले. सामना खेळून देशाची नाचक्की केली. भारत-पाकिस्ताना मॅच फिक्सिंग दीड लाख कोटींचा जुगार होता” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पावसामुळे मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये मोठी वाहतूककोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे. रात्रीपासूनच परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय.
आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी, देवळाली, दादेगाव येथे पाणीच पाणी. नदीकाठच्या जनावरांसह झाडंही गेले वाहून-शेतकरी. मागील शंभर वर्षांमध्ये असा पाऊस झालाच नाही शेतकऱ्याचा दावा. मध्यरात्री बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगावसह गेवराई परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
मोनो रेले वडाळा येथे बंद पडली होती. अखेर अडीच तासानंतर ही रेले सुरू झाली आहे. 17 प्रवासी यादरम्यान अडकले होते.
दादर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आहे. दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिर कडून राजगृह दिशेने जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना पाण्यातून चालत स्टेशन गाठावे लागत आहे. सकाळपासून मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे. मुंबईत मुसळधार पावसाचा फटका दादर परिसरावर सर्वाधिक बसला आहे.
पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय… तर पुण्याचा घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे…
पुण्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची हजेरी… आज सकाळी 7 वाजल्यापासून 4697 क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे… नदी काटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे… पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता पाठबधारे विभागाने विर्तवली आहे…
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला… सकाळपासून ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाला सुरुवात… पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता… स्टेशन परिसरात टॅक्सी–बससाठी प्रवाशांची झुंबड, वाहतुकीवर ताण…
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रविवारी पश्चिम राजस्थान मधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे दरम्यान महाराष्ट्र राज्यातील चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अति जोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.