Maharashtra Breaking News LIVE : जालनातील कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांचा फोनवरुन संवाद

राज्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा संसार दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात खळमळ माजली असून दहशतीचं वातावरण आहे.. तर दुसरीकडे महत्त्वाची कामे बाजूला सारत कल्याण - डोंबिवली मध्ये KDMC च्या ‘E’ प्रभाग कार्यालयात कार्यलयीन वेळेत ‘केळवण पार्टी’ करण्यात आली... महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : जालनातील कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांचा फोनवरुन संवाद
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Nov 14, 2025 | 6:56 AM

महिनाभरापासून टिटवाळ्यातील रोहण-वाहोली गावात बिबट्या वावर करत कुत्रे आणि जनावर हल्ला करत असल्याने परिसरात दहशत पाहायला मिळाली आहे. वनविभाग आणि प्राणीमित्र पथक मैदानात; बिबट्याला सुरक्षित पकडण्याचे आणि ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. KDMC च्या ‘E’ प्रभाग कार्यालयात कार्यलयीन वेळेत ‘केळवण पार्टी’… कामकाज बाजूला ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेजवानी… नागरिकांनी व्हिडिओ बनवत कार्यालयात गोंधळ घालत जाब विचारला आहे. नागरिकांचा संताप पाहता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडून पळ काढला.. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर संबंधितावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Nov 2025 07:00 PM (IST)

    मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

    मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

    रेल्वेच्या दोन्ही अभियंतांवर अटकेची टांगती तलवार

    अभियंतांचे वकील शुक्रवारी घेणार उच्च न्यायालयात धाव

    मुंब्रा रेल्वे अपघातामध्ये अनेकांनी गमावला होता जीव

     

     

  • 13 Nov 2025 06:52 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर

    ताज लँड येथे आयोजित कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार

    माधव अगस्ती यांच्या कारकिर्दीची 50 वर्ष आणि ‘स्टिचिंग स्टारडम फॉर आयकॉन्स, ऑन अँड ऑफ स्क्रिन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा

    या  कार्यक्रम दोन्ही नेते राहणार उपस्थित

     

     

  • 13 Nov 2025 06:34 PM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

    एकनाथ शिंदे यांचा उद्या दिल्ली दौरा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ते दिल्लीला जाणार

    नोएडा येथे सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या घरी जाऊन ते त्यांची भेट घेणार

    राम सुतार यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे

  • 13 Nov 2025 06:14 PM (IST)

    108 रुग्णवाहिकेला आग लागल्याने भीषण स्फोट

    108 रुग्णवाहिकेला आग लागल्याने भीषण स्फोट

    गोंदियाच्या मुंडीपार येथील वर्कशॉप मधील घटना

    वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी गेली होती रुग्णवाहिका..

    रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने दुकान आणि घरांचेही नुकसान

    सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

  • 13 Nov 2025 05:53 PM (IST)

    डॉ. उमर स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन मेवातला गेला होता, सीसीटीव्हीत कैद

    डॉ. उमर याने स्फोटकांनी भरलेली कार मेवात, हरियाणा येथे नेली होती. त्यांची कार फिरोजपूर झारिका, नूह, हरियाणा येथील स्थानिक टोलजवळून जाताना दिसली. हे सीसीटीव्ही फुटेज 10 नोव्हेंबर रोजी पहाटेचे आहे, ज्या दिवशी स्फोट झाला.

  • 13 Nov 2025 05:34 PM (IST)

    बीड बस स्थानकात चोरी करताना महिला चोर पकडली

    बीड बस स्थानकावर चोरी करताना एका महिला चोराला पकडून नागरिकांनी चांगला चोप दिला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा बस स्थानकात चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करताना दिसत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने बस स्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुरक्षेचे कर्मचारी, सीसीटीव्ही यंत्रणा फक्त नावालाच आहे का? असा सवाल देखील प्रवासी विचारत आहेत. अनेक प्रवाशांच्या गळ्यातील सोने चोरीला जाणे, खिशातील पैसे, मोबाईल मौल्यवान दाग दागिने अशा चोरीचे शेकडो प्रकार उघडकीस आले. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

  • 13 Nov 2025 05:20 PM (IST)

    मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

    मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला. आरोपींचे वकील शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. विशाल डोळस, समर यादव या दोन्ही अभियंत्यांना पोलिस अटक करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

  • 13 Nov 2025 05:06 PM (IST)

    दिल्ली बॉम्बस्फोटाच्या फंडिंगची चौकशी होणार

    दिल्ली बॉम्बस्फोटांच्या फंडिंगची चौकशी केली जाईल. एनआयए, ईडी आणि इतर एजन्सींसह तपास करेल. शिवाय, अल-फलाह विद्यापीठाची संपूर्ण फॉरेन्सिक चौकशी देखील केली जाईल.

  • 13 Nov 2025 04:57 PM (IST)

    बदलापूरात आठ पक्षांची महाविकास आघाडी

    बदलापुरात महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेत जागा वाटप जाहीर केले आहे.  याठिकाणी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्तीपार्टी, आम आदमी पार्टी, आरपीआय आर के गट अशा आठ पक्षांनी एकत्रित मोट बांधली आहे. 24 प्रभांगांपैकी 22 प्रभागांमध्ये जागावाटप जाहीर करण्यात आले आहे.  नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रिया गवळी आणि मनसेकडून संगीता चेंदवणकर अशी दोन नावे वरिष्ठांकडे पाठावण्यात आली असून नगराध्यक्षपदाचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत होईल अशी माहिती मविआच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • 13 Nov 2025 04:39 PM (IST)

    नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात पाच महिला आणि दोन मुले अडकली

    नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात पाच महिला आणि दोन मुले अडकल्या असून  महिलांच्या सुटकेसाठी बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. या महिला वतमाळ जिल्ह्यातील एकांबा येथील आहेत. या  महिला धोकादायक परिस्थितीत जीव मुठीत धरून उभ्या आहेत.

  • 13 Nov 2025 04:27 PM (IST)

    जालनातील कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांचा फोनवरुन संवाद

    ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी काल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज ठाकरे गटाने  महत्त्वाची बैठक जालनात बोलावली होती. या बैठकीला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोन करून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. फक्त तुम्ही घट्ट राहा मी मराठवाड्यात फिरणारच आहे काळजी करू नका असा आदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  • 13 Nov 2025 04:10 PM (IST)

    अजितदादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत – हर्षवर्धन सपकाळ

    आपल्यावर कारवाई नको म्हणून अजित पवार महायुतीत गेले होते, ते सत्तेशिवाय राहुच शकत नाहीत. सरकारमधून बाहेर पडण्याची त्यांच्यात तेवढी हिंमत नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • 13 Nov 2025 04:01 PM (IST)

    हिमायतनगर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दादाच्या राष्ट्रवादीत

    नांदेडमधील हिमायतनगर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कांग्रेसची साथ सोडत दादाच्या राष्ट्रवादीत आले आहेत. मोहम्मद जाविद यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद जाविद यांनी काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

  • 13 Nov 2025 03:47 PM (IST)

    कुंभमेळ्याच्या विविध कामांचा भूमिपूजन आपण केलं आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    कुंभमेळ्याच्या विविध कामांचा भूमिपूजन आपण केलेला आहे . यावेळचा कुंभ विशेष आहे. 75 वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आला आहे. मला जाणकार लोकांनी सांगितलं गुरु सिंह राशीत येणार. हे कुंभाचे पर्व 28 महिने चालणार आहे. हा कुंभमेळा 2028 पर्यंत चालणार आहे. पहिलं अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे. प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक जागरणाची मोहीम चाललेली आहे. ती कुंभमेळ्यात पाहायला मिळाली”, असं देवंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

  • 13 Nov 2025 03:24 PM (IST)

    भाजप पालघर जिल्ह्यात स्वतंत्र लढणार, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची माहिती

    पालघर जिल्ह्यात भाजपाची आमची स्वतःची टाकत वाढली आहे. तीन आमदार एक खासदार आमचा आहे. त्यामुळे आम्ही जिल्ह्यात महायुती म्हणून नाही तर स्वतंत्र लढणार आहोत, अशी माहिती पालघरचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी टीव्ही9 मराठीसोबत बोलताना दिली. पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायत या चारही ठिकाणी आम्ही भाजपाच्या नगराध्यक्ष निवडून आणणार, असा विश्वासही राजपूत यांनी व्यक्त केला.

  • 13 Nov 2025 03:14 PM (IST)

    कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलनार आहे. राज्य सरकार आधीपासूनच कुंभमेळ्याच्या तयारीसाठी लागली आहे. हा धार्मिक सोहळा नाही. नाशिकला जागतिक नकाशावर आणणारा हा कुंभमेळा ठरेल. नाशिकला स्वच्छ आधुनिक शहर करण्याची मोठी संधी आहे. देशभरातील कोटी लोक येतील. त्यांचे नियोजन करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. उत्तम नियोजन आणि अंमलबजावणी याची आवश्यकता आहे आणि त्या अनुषंगाने सर्व सुरु आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 13 Nov 2025 02:59 PM (IST)

    महिला डॉक्टरबाबत महिला आयोगाच्या मताशी मी सहमत नाही : रुपाली ठोंबरे पाटील

    ‘महिला डॉक्टरबाबत महिला आयोगाच्या मताशी मी सहमत नाही” असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटलांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तसेच पक्षाने खुलासा पत्र मागवलं होतं तेही कायदेशीररित्या खुलासापत्र पाठवलं असल्याचं रुपाली ठोंबरेंनी म्हटलं आहे.

     

  • 13 Nov 2025 02:50 PM (IST)

    अंबड नगरपरिषदेत भाजप स्वबळावर लढणार: नारायण कुचे

    अंबड नगरपरिषदेत भाजप स्वबळावर लढणार असल्याचं नारायण कुचे यांनी म्हटलं आहे. “आमचे सर्व उमेदवार ठरलेले आहेत. पक्षाने आदेश देताच उमेदवार जाहिर करू” असं कुचेंनी म्हटलं आहे.

     

  • 13 Nov 2025 02:37 PM (IST)

    सरकारमधून बाहेर पडतो, दादा रागात वर्षावर बोलले : दानवे

    वर्षावर झालेल्या बैठकीत दादांची भूमिका काय होती याबद्दल दानवे यांनी स्पष्ट सांगितले आहे. “सरकारमधून बाहेर पडतो, दादा रागात वर्षावर बोलले” असं दानवेंनी सांगितलं आहे.

     

     

  • 13 Nov 2025 02:34 PM (IST)

    नाशिकमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन; मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री उपस्थित

    नाशिकमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचं भूमिपूजन केलं आहे.

  • 13 Nov 2025 01:58 PM (IST)

    घोसाळकर कुटुंबाला वॉर्ड क्रमांक 1 मधून का निवडणूक लढवता येणार नाही?

    मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 मधून आता घोसाळकर कुटुंब निवडणूक लढवू शकणार नाही.वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत घोसाळकर कुटुंबाचे वर्चस्व होते. मनीषा चौधरी यांच्या आधी शिवसेना नेते विनोद घोसाळकर दहिसर विधानसभेचे आमदार होते. वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर 2012 ते 2017 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर 2017 ते आतापर्यंत नगरसेविका होत्या. पण आता वॉर्ड क्रमांक 1 महिला ओबीसी झाल्यामुळे घोसाळकर कुटुंबाला निवडणूक लढवता येणार नाही.

  • 13 Nov 2025 01:49 PM (IST)

    दिलीप मानेंना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ऑफर

    भाजपमधील रखडलेल्या पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार दिलीप मानेंना राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. दिलीप माने हे मातब्बर नेते ते पक्षात आल्यास आम्हाला फायदा होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांची प्रतिक्रिया. आम्ही पदाधिकाऱ्यांनी दिलीप माने यांची भेट घेतली, मात्र ही भेट राजकीय नसून खासगी होती.

  • 13 Nov 2025 01:36 PM (IST)

    कीर्तनकार इंदुरीकर महाराज कीर्तनाला रामराम करणार का?

    कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केली खंत. पुणे येथील जुन्नर येथे झालेल्या किर्तनात व्यक्त केली खंत.मुलीच्या साखरपुड्यावरून ट्रोल झाल्यानंतर कीर्तनाला रामराम करणार का?. आता कंटाळलोय,थांबून घेणार. पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे कीर्तनावेळी महाराजांचे वक्तव्य.

  • 13 Nov 2025 01:15 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचं भूमिपूजन

    नाशिकमध्ये विविध विकासकामांचं भूमिपूजन. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचं भूमिपूजन. कुंभमेळ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचं भूमिपूजन.

  • 13 Nov 2025 01:01 PM (IST)

    ससून डॉकची जागा रिकामी करण्याविरोधात कोळी बांधव एकत्र

    ससून डॉक इथल्या मच्छीमार बांधवांना तिथून हटवून जागेचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केलीय. मुंबई पोर्ट ट्रस्ट बंदरातील जागा रिकामी करण्यासाठी १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान पोलिसांच्या मदतीने कारवाई होणार आहे याला स्थानिकांचा विरोध होतोय. अनेक वर्षांपासून इथे व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाकडून सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला जातोय. आज याचं संदर्भात कोळी बांधव एकत्र आले आहेत.

  • 13 Nov 2025 12:49 PM (IST)

    भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण तातडीची बैठक

    भास्कर आंबेकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण तातडीची बैठक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माजी आमदार संतोष सांबरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा जाणार असल्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे. भास्कर आंबेकर यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाला जालन्यात मोठे खिंडार पडलं. आगामी निवडणुकीमध्ये रणनीती ठरविण्यासाठी बैठक पार पडणार आहे.

  • 13 Nov 2025 12:37 PM (IST)

    आता लपू नका, नार्कोटेस्ट करा; मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना आव्हान

    “धनंजय मुंडेंना प्रत्येक वेळी वाचवायचं नाही. धनंजय मुंडेंनी स्वत: कट रचला, हे सत्य आहे. आता लपू नको, आता नार्कोटेस्टला चला. मला राजकारणाचा नादच नाही. नार्कोटेस्टचा अर्ज मी दुसऱ्याच दिवशी दिला होता. माझा अर्ज चुकला असेल तर तसं सांगा, दुसरा देतो,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 13 Nov 2025 12:35 PM (IST)

    मला राजकारणाचा नाद नाही – मनोज जरांगे पाटील

    “मला राजकारणाचा नाद नाही. आता लपू नको. नार्को टेस्टला चला. धनंजय मुंडेंनी स्वत: कट रचला हे सत्य आहे. धनंजय मुंडेंना प्रत्येकवेळी वाचवायचं नाही. अन्याय केल्यास मी कोणालाही सोडणार नाही. अजितदादांनी धनंजय मुंडेंना बळ देण्याचं बंद करावं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 13 Nov 2025 12:32 PM (IST)

    दिल्ली लाल किल्ला येथे झालेल्या बॅाम्ब स्फोटांचे कनेक्शन ठाणे जिल्ह्या पर्यंत का?

    9 सप्टेंबर 2025 या दिवशी कल्याण येथून आफताब कुरेशी आणि मुंब्रा येथून सुफियान शेख नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलने घेतले होते ताब्यात. ⁠ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवाया मध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून घेतले होते ताब्यात. ⁠सुफियान आणि आफ्ताब देशात घडवणारे होते दहशतवादी हल्ले. ⁠यांचा दिल्ली लाल किल्ला बॅाम्ब स्फोटाशी संबंध आहे का? याची चौकशी दिल्ली स्पेशल सेल करणार.

  • 13 Nov 2025 12:23 PM (IST)

    बिबट्या पकडला जात नाही तो पर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

    बिबट्याने उचलून नेलेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर सापडला. नगर तालुका येथील खारेकर्जुने गावात बिबट्याने मुलीवर हल्ला करून नेले उचलून. रियांका सुनील पवार पाच वर्षीय मुलीचे नाव. चिमुकलीचा मृतदेह आढळल्यानंतर गावकरी आक्रमक. सर्व गावकरी गावात झाले जमा. जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही आणि प्रशासन ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,गावकऱ्यांची भूमिका.

     

  • 13 Nov 2025 12:20 PM (IST)

    उन्मेष पाटलांविरोधात गुन्हा दाखल; भाजप आमदार मंगेश चव्हाणांची प्रतिक्रिया समोर

    उन्मेष पाटलांवर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिक्षणाचा फायदा फक्त बँक लुटण्यासाठी केला आहे, अशी टीका मंगेश चव्हाणांची उन्मेष पाटलांवर केली आहे. “कर्ज देताना ते भागीदार नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊच शकत नाही हा साधा नियम आहे. त्यांच्यावर झालेला गुन्हा राजकीय द्वेषापोटी असेल तर आम्ही या विषयाशी सहमत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेऊन ती जिनिंग सीसीआय केंद्र मंजूर करून त्यांनी काय काय घेतलं आता हा टेक्निकल पार्ट आहे,” असं ते म्हणाले.

     

  • 13 Nov 2025 12:10 PM (IST)

    दिल्लीतील लाल किल्ला इथं झालेल्या बॉम्बस्फोटाचं कनेक्शन ठाणे जिल्ह्यापर्यंत?

    ⁠९ सप्टेंबर २०२५ या दिवशी कल्याण इथून आफताब कुरेशी आणि मुंब्रा इथून सुफियान शेख नावाच्या तरुणांना दिल्ली स्पेशल सेलने ताब्यात घेतलं होतं. ⁠ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित कारवायामध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ⁠⁠यांचा दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटाशी संबंध आहे का, याची चौकशी दिल्ली स्पेशल सेल करणार आहे.

  • 13 Nov 2025 11:58 AM (IST)

    रोह्यात राष्ट्रवादीला धक्का,प्रतिष्ठित पडवळ कुटुंबाचा शिवसेनेत प्रवेश

    रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शहरातील प्रतिष्ठित आणि अनेक दशकं नगरसेवकपदाची धुरा सांभाळणाऱ्या पडवळ कुटुंबाने शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.यदुराम पडवळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि रोहा तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी सुमारे पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून कार्य केले, त्यानंतर त्यांचा मुलगा दहा वर्षे आणि सून पाच वर्ष नगरसेवक होती. मात्र, राष्ट्रवादीमध्ये युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत जुन्या नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने पडवळ कुटुंबाने अखेर शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे.

  • 13 Nov 2025 11:49 AM (IST)

    शितल म्हात्रे यांचा मोठा निर्णय

    शिवसेनेतून शितल म्हात्रे नगरसेवक निवडणूक न लढवण्यावर ठाम आहेत. शितल म्हात्रे यांनी पक्ष श्रेष्ठींना भूमिका कळवली आहे. वॉर्ड क्रमांक ७ मझून पक्ष ज्याला तिकीट देणार त्याच्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली. शितल म्हात्रे आमदारकीसाठी इच्छूक असल्याची माहिती समोर येत आहे., पक्षाने तसा विचार करावा असंही मत मांडलं आहे.

  • 13 Nov 2025 11:40 AM (IST)

    मनिषा कायंदेंची बॅनरवरून टीका

    एक गोष्ट तर जनता नक्कीच बघेल की ठाकरेंचा सेवक तोच नगरसेवक याचा अर्थ काय ? त्यांनी ठाकरेंची चाकरी करायची का ? का त्यांनी लोकांची चाकरी करणं अपेक्षित आहे. ठाकरेंची चाकरी म्हणजे चित्र स्पष्ट झालेले आहे की तुम्हाला तुमचा महापौर का हवा आहे ? तुम्हाला तुमच्या महापौर यासाठी पाहिजे कारण पूर्ण मुंबई महानगरपालिकेची तिजोरी तुम्हाला तुमच्या हातात पाहीजे, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली.

  • 13 Nov 2025 11:30 AM (IST)

    नाशिकमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार

    आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात भाजप कार्यालयात प्रवेश सोहळा होणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांचा प्रवेश सोहळा झाला. अन्य काही माजी नगरसेवक देखील आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरु झाले आहे.

  • 13 Nov 2025 11:20 AM (IST)

    आय लव्ह मोहम्मद नंतर आता अमरावतीत यावरून वादंग

    आय लव्ह मोहम्मद नंतर आता अमरावतीत लागले होते IIC अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे फलक लागले. फलकावर विचारा इस्लामविषयी? असा मजकूर होता. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या आक्षेपानंतर पंचवटी चौकातील ते बॅनर हटवले. नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पंचवटी चौकात IIC चे फलक लागल्याने भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक झाले. त्यांनी या पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

  • 13 Nov 2025 11:10 AM (IST)

    मुलीचा मृतदेह सापडला

    बिबट्याने उचलून नेलेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर सापडला.नगर तालुका येथील खारेकर्जुने गावात बिबट्याने मुलीवर हल्ला करून उचलून नेले होते.रियांका सुनील पवार पाच वर्षीय मुलीचे नाव आहे. काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. गावातील काट्याच्या झुडपात 16 तासांनी मृतदेह आढळला.

  • 13 Nov 2025 11:00 AM (IST)

    मिरा-भाईंदरच्या राजकारणात पुन्हा खळबळ,माजी आमदार गीता जैन अडचणीत

    ठाणे न्यायालयाने महापालिका अधिकाऱ्याला मारहाणीच्या प्रकरणी गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना जून २०२३ मधील असून, गीता जैन यांनी अतिक्रमण कारवाईनंतर महापालिकेच्या इंजिनीअरला कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. तक्रार मागे घेतली असली तरी आपचे बृजेश शर्मा यांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर हा आदेश देण्यात आला. न्यायालयाने म्हटलं आहे की, सरकारी सेवकावरील हल्ल्याच्या प्रकरणात इतरांनाही तक्रार करण्याचा अधिकार आहे. दरम्यान, गीता जैन यांनी या आदेशावर स्थगिती घेतल्याचा दावा केला असून, “आमच्यावर राजकीय हेतूने कारवाई होतेय,” असा आरोप त्यांनी केला आहे.

  • 13 Nov 2025 10:59 AM (IST)

    मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150

    मुंबई महापालिकेत भाजपचं मिशन 150. पालिका निवडणुकीत भाजपला 150 जागा लढायच्या आहेत. भाजपचा 100 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार आहे, गेल्या निवडणुकीत भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या.

  • 13 Nov 2025 10:43 AM (IST)

    सोलापूर – बेडरूममध्ये गळफास घेऊन वकिलाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी लिहीली चिठ्ठी

    सोलापुरात वकिलाने बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  आईकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहीली होती. सागर श्रीकांत मंद्रूपकर असं आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.  सागर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं .

     

  • 13 Nov 2025 10:34 AM (IST)

    नाशिक – आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठी खिंडार..

    नाशिक –  आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठी खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल भाजप प्रवेश करणार . थोड्याच वेळात भाजप कार्यालयात  मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शेकडो समर्थकांचा प्रवेश सोहळा होणार आहे.

  • 13 Nov 2025 10:07 AM (IST)

    दिल्लीत पुन्हा स्फोटाचे आवाज, नेमकं काय झालं ?

    राजधानी दिल्लीच्या महिपालपूर भागात गुरुवारी स्फोटासारखे आवाज ऐकू आले. दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. सुदैवाने पोलिसांना काही संशयास्पद आढळलं नाही. सोमवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर शहरात भीतीचे वातवरण असून आज पुन्हा रॅडिसन हॉटेलजवळ स्फोटाचे आवाज आल्याने नागरिक घाबरले.

  • 13 Nov 2025 09:55 AM (IST)

    मनसे नेते राजू पाटील याचे भाऊ विनोद पाटील यांची ईडी चौकशी 

    ईडी पथकाने काल 10 तास चौकशी करत विनोद पाटील याचा मोबाईल जप्त केल्याची सूत्रांची माहिती. लोढा गृपचे भागीदार राजेंद्र लोढा यांच्याकडून झालेल्या फसवणूक संदर्भत चौकशी. लोढा ग्रुपचे विषवस्थ यांचा विश्वास घात आणि फसवणूक प्रकरणी राजेंद्र लोढा यांचा तपास आता इडिकडे. १९९४ पासून पाटील कुटुंबीय आणि लोढा यांचे संबंध आणि अर्थीक व्यवहार असल्याची माहिती

     

  • 13 Nov 2025 09:50 AM (IST)

    पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

    केवळ 10 महिन्यात तब्बल 888 शेतकऱ्यांनी संपवले आपले जीवन. दिवाळीच्या ऑक्टोबर महिन्यात 87 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. नैसर्गिक आपत्ती आणि पिकांचे नुकसान ठरले मुख्य कारण. बँका आणि खाजगी सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याने शेतकरी त्रस्त. अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांतील आकडे चिंताजनक

     

  • 13 Nov 2025 09:40 AM (IST)

    स्टेजवर नवरदेवावर हल्ला करणारा आरोपी राघो बक्षी व त्याच्या साथीदाराला अकोल्यातून अटक

    पोलिसांनी नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर हल्ला करणाऱ्या दोन्ही आरोपींना अकोल्यातून काल रात्री उशिरा केली अटक. 11 नोव्हेंबर च्या रात्री सुजल समुद्रे वर राघो जितेंद्र बक्षी याने स्टेजवर जाऊन चाकूने वार करून जखमी केले होते. फरार असलेल्या राघो जितेंद्र बक्षी व अल्पवयीन युवकास अकोल्यातून बडनेरा पोलिस ASI प्रमोद गुडधे व त्यांच्या पथकाने केली अटक.

  • 13 Nov 2025 09:30 AM (IST)

    अमरावतीच्या मेळघाटात जून पासून कुपोषणाने ६५ बालकांचा मृत्यू..

    उच्च न्यायालयाने राज्य सरकारची काढली खरडपट्टी. आदिवासीबहुल मेळघाटात कुपोषणामुळे मुले, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने व्यक्त केली चिंता. न्यायालय २००६ पासून या समस्येवर आदेश देत आहे. मात्र, सर्व काही व्यवस्थित असल्याचा दावा सरकार कागदावर करत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. यावरून तुम्ही (राज्य सरकार) या मुद्यावर किती गंभी आहात, हे दिसते. तुमची वृत्ती अत्यंत बेजबाबदार आहे, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला खडसावले.

  • 13 Nov 2025 09:21 AM (IST)

    अकोल्यातील तरूणाचे शरद पवारांना पत्र

    लग्न होत नसल्याने अकोल्यातील तरूणाने थेट शरद पवार यांना पत्र पाठवले आहे. आता हे पत्र व्हायरल होत आहे.

  • 13 Nov 2025 09:10 AM (IST)

    धुळे जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठी घट

    तापमान कमी झाल्यामुळे थंडीमध्ये वाढ. धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 8 अंशाच्या खाली. गेल्या आठवड्यभरा पासून तापमानाचा पारा येतो आहे खाली. तापमान मध्ये घट झाल्याने थंडीमध्ये मोठी वाढ..

     

  • 13 Nov 2025 09:00 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले थांबता थांबेना..

    नगर तालुका येथील खारेकर्जुने गावात बिबट्याने मुलीवर हल्ला करून नेले उचलून… रियांका सुनील पवार पाच वर्षीय मुलीचे नाव… बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली घटना…  अद्यापही मुलीचे शोध कार्य सुरू…  अंधार असल्यामुळे काल रात्री शोधकार्यात येत होते अडथळे…

  • 13 Nov 2025 08:58 AM (IST)

    आय लव्ह मोहम्मद नंतर आता अमरावतीत लागले IIC अर्थात इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे फलक

    फलकावर विचारा इस्लामविषयी? असा मजकूर… नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता…पंचवटी चौकात IIC चे फलक लागल्याने भाजप खासदार अनिल बोंडे आक्रमक, घेतला तीव्र आक्षेप… फलकावर असलेल्या टोलफ्री क्रमांकावर बोंडेनी केला फोन…  हैदराबादवरून ही संस्था चालविली जातं असल्याची दिली माहिती…

  • 13 Nov 2025 08:45 AM (IST)

    उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम

    कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 9.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद… या थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी शेकोट्या पेटवून मिळवतात उब… हिवाळ्याच्या प्रारंभीच तापमानात झालेली ही घट पाहता पुढील काही दिवस थंडीचा जोर राहणार कायम…

  • 13 Nov 2025 08:28 AM (IST)

    धुळे जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठी घट…

    तापमान कमी झाल्यामुळे थंडीमध्ये वाढ… धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा 8 अंशाच्या खाली… गेल्या आठवड्यभरा पासून तापमानाचा पारा येतो आहे खाली… तापमान मध्ये घट झाल्याने थंडीमध्ये मोठी वाढ… थंडी वाढल्याने पांजरा नदी किनारी व्यायाम प्रेमींची गर्दी…