
नगराध्यक्ष, नगरपालिका आणि नगर पंचायतींमधील प्रभागांमध्ये अर्जाच्या अवैधतेवरून निर्माण झालेले पेचप्रसंग टाळण्यासाठी दहा आठवड्यांत म्हणजे आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी नवीन नियमावली तयार करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले. न्यायालयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने 24 नगरपालिका आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे 2 डिसेंबर आणि 20 डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांमधील मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतींचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
महिलेची पर्स चोरताना बंटी-बबलीची जोडी जेरबंद
रिलस्टार कोमल काळे बसमधील महिलांची पर्स चोरताना पकडली
अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्यास केलं जेरबंद
चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली आरोपी महिला, कोमल नागनाथ काळे हिचे तब्बल 50 हजारांहून अधिक फॉलोअर्स
कांदिवली पूर्वेतील ठाकूर गावातील गुरुकुल टॉवरला भीषण आग
इमारतीच्या २३ व्या मजल्यावर लागली आग
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं वृत्त
बीडचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यक अमृत डावखरांची मनोज जरांगे पाटलांनी फोनवरून प्रकृती संदर्भात विचारपूस केली. काल गेवराईतील घरी त्यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि बेल्टने मारहाण झाली. भाजपच्या बाळराजे पवार यांनी मारहाण केल्याचा डावखर यांचा आरोप आहे.
महाराष्ट्रात बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर सरकारची मोठी धडक कारवाई सुरू झाली आहे. रॅपीडो आणि उबेरसारख्या ॲप कंपन्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संदर्भात 17 नगरपालिका संस्थांना सूचना जारी केल्या आहेत. सूचनांमध्ये असे म्हटले आहे की त्यांनी नगरपालिका संस्थांमध्ये काम करणाऱ्या रोहिंग्या आणि बांगलादेशी स्थलांतरितांची यादी तयार करावी आणि ती आयुक्त आणि महानिरीक्षकांना सादर करावी
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना पोलीसांनी अटक केली आहे. सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. देवळाली कॅम्प परिसरातील एका फ्लॅट व्यवहारात परस्पर थकबाकी दाखवून फसवणूक केल्याचा आरोप कारडा यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही सेवानिवृत्त सैन्य अधिकारीही पुढे येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथे अपघात झाला आहे. येथील एका पेट्रोल पंपासमोर भरधाव कार उलटी होऊन महामार्ग फरफटत गेल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर काल मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यासोबत त्यांचे पती भगीरथ भालके आणि अन्य चार इसमांनी विनापरवाना थेट मतदान केंद्र प्रवेश केला. यामध्ये केवळ प्रणिता भालके यांचा प्रवेश वैध होता. उर्वरित पाच इसम घुसखोरी करत मतदान केंद्रात आले आणि ईव्हीएम मशीनचे फोटो काढून आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार केंद्रप्रमुख दशरथ मोरे यांनी दिली होती. त्यानंतर आता भगीरथ भालके यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील सुजदे गावात खेळता खेळता विजेच्या धक्का लागल्याने 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. प्रेम नरेंद्र सोनवणे असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. प्रेम हा घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये खेळत होता, याच दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये उतरलेल्या विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शेडवरील मुख्य विद्युत तारांपैकी एक तार तुटून थेट पत्र्याच्या शेडवर पडली होती, ज्यामुळे संपूर्ण शेडमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता.
मिरा–भाईंदर येथील उत्तन परिसरातील स्थानिक मच्छीमारांची व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक उघड झाले आहे. स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मासे खरेदी करून त्यांच्या बदल्यात चेक देत होते.
शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का बसला आहे. उपतालुका प्रमुख विकास देसले आणि कल्याण ग्रामीण मधील कार्यकर्त्याचा भाजपामध्ये प्रवेश. भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.
मुंबईतील कांदिवली पोईसरनदी पुलावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने एका व्यक्तीला चिरडले. डंपरने चिरडल्याने व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बांगुर नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ते प्रकरणाचा तपास करत आहेत. डंपर चालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
राज ठाकरे संजय राऊतांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे संजय राऊतांच्या घरी पोहोचले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पण शेतकऱ्यांना हवा तसा न्याय द्यायचं काम होत नाही. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सरकारच्याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणुकांमध्ये हाणामाऱ्या. बंदुक दाखवणं असे अनेक प्रकार घडल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अशा घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.मतदानावेळी मतदान केंद्रावर झालेल्या राड्याबद्दल त्यांनी तक्रार करत पोलिसांसोबत संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. सानपाड्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश. ‘गद्दारांमध्ये आता बाचबाची, मारामारी सुरु झालीय गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलाय’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उपाऱ्या उमेदवार होता तो cmo ऑफिस पर्यंत गेला. व्हिडिओ मधील हा बोगस मतदार नव्हता. तो त्याचे मतदान कुठे आहे हे विचारण्यासाठी आला होता आणि लगेच त्याला मारायला सुरुवात केली . माझा मुलगा त्याला वाचवण्यासाठी गाडीवर आला होता. मारताना कुणाला वाचविणे गुन्हा आहे का? असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी विचारला.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीचे मतदान पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व मशीन, उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये ऑन ऑफ आणि सील करून स्ट्राँग रूममध्ये नेण्यासाठी तहसील कार्यालय येथे नेण्यात आल्या. परंतु तहसील कार्यालयामध्ये सदर मशीन 17 प्रभागातील ईव्हीएम मशीन सील तोडून पुन्हा ऑन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उमेदवारांनी केला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बेकायदा बांधकामाविरोधात अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे. हिंजवडी जवळील जांभे येथील एका अनधिकृत RMC प्लांटवर धडक कारवाई केली आहे. प्रशासनाने कोणतीही भीड न ठेवता हे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. पी एम आर डी ए च्या या कारवाईमुळे अनधिकृतरित्या RMC प्लांटवर उभारणी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याणमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बैल बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज भाईंदर स्टेशन पश्चिम येथे नव्या एसटी डेपोच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा पार पडला. या शहरात आधुनिक आणि मोठ्या सुविधा असलेला हा नवा डेपो उभारला जाणार आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार खोटे बोलत असून राज्याने अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदतीसाठीचा कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शेतकरी जनता या खोटारड्या केंद्र सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात प्रतिभा धानोरकर यांनी टीका केली.
नाशिक तपोवनपाठोपाठ नाशिकच्या सोमेश्वर जवळ तयार होणारा जॉगिंग ट्रॅक वादात सापडला आहे. शेकडो झाडांच्या मधून काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे शेकडो झाड उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत. कोणाच्या मागणीवरून ट्रेक तयार करताय ते सांगा ? असा सवाल शिवसेना नगरसेवक विलास शिंदे यांनी केला आहे. यामुळे सोमेश्वर मंदिरा शेजारील झाडांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये भाजप पक्षात मोठा पक्षप्रवेश होणार आहे. वसई विरार येथील माजी नगरसेवक यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. बहुजन विकास आघाडी मधील हे माजी नगरसेवक असून शेकडो महत्वाच्या पदाधिकारी भाजपमध्ये सहभागी होणार आहे. यामुळे वसई विरार येथे हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे.
काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झालेत. वृक्षतोड योग्य नाही अशीच सरकारची भूमिका आहे, वृक्ष तोडले जावेत असं आमचं कोणाचंही मत नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यातील हिंजवडी फेज 1 मधील एका इंटरनॅशनल नामांकित शाळेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ माजली. शाळेच्या ई-मेल वर धमकीचा मेल आल्यानंतर शाळा प्रशासनाने तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाळा पूर्णपणे मोकळी करण्यात आली असून शाळेत कसून तपास सुरू आहे.
सातारा नगरपालिकेच्या ईव्हीएम मशीन एमआयडीसी येथील एका गोदाम मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्या स्ट्राँग रूम परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 21 डिसेंबरला मतमोजणी असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक स्ट्रॉंग रूमची प्रशासनाकडून 8 तासानंतर पाहणी केली जाणार आहे.
पैठण–छत्रपती संभाजीनगर मार्गावर इसारवाडी शिवारात भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर-अँपरिक्षाची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आठ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या.
पिंपळवाडी पिराची येथील महिला मजूर सकाळी कामानिमित्त धनगावकडे निघाल्या होत्या. इसारवाडीत सकाळी दुभाजक ओलांडत असलेल्या ट्रॅक्टरला रिक्षाची पाठीमागून भीषण धडक बसली.
शिरुर तालुक्यातील फाकटे गावातील शेतशिवारातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आलीय, रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात भटकंती करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यु करुन बाहेर काढण्यात यश आले, बिबट्याला रेस्क्यु करुन माणिकडोह बिबट निवारा केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
प्रेम प्रकारातून खून झालेला सक्षम ताटे कुटुंबियांची अंजली आंबेडकर भेट घेणार आहेत. आज दुपारी बारा वाजता अंजली आंबेडकर साधनार ताटे कुटुंबीय व आंचल सोबत संवाद साधणार आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते नंतर आता अंजली आंबेडकर ताटे कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
घायवळ विरोधात आता रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. गुन्ह्यात आरोपी निलेश घायवळ फरार आहे… पोलिसांनी त्याच्याविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावली…. आता पोलिसांकडून घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
भीमा कोरेगाव आयोगासमोर हजर न राहिल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढा… प्रकाश आंबेडकर यांच्या वकिलांनी भीमा कोरेगाव आयोगांकडे अर्ज केला. शरद पवार यांनी भीमा कोरेगाव दंगल बाबत उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं एकत्र शरद पवार यांच्याकडे नसल्याने उद्धव ठाकरेंनी द्यावे अशी नोटीस देण्यात आली होती… नोटीस देऊनही उद्धव ठाकरे किंवा त्यांचे कुठलेही प्रतिनिधी हजर राहिले नाहीत…
आयोगाच्या नोटीसीला हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाने केली आहे… कोरेगाव भीमा आयोगाने या अर्जावर अद्याप निर्णय दिलेला नाही
उल्हासनगरमध्ये रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर बिल वाढवल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत. उल्हासनगर मधील कॅम्प नंबर एक परिसरातील घटना आहे.
विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरास गेल्या वर्षभरात (1 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर) एक कोटी 51 लाख 67 हजार 100 भाविकांनी भेट दिली.. यात देशभरातील पर्यटक सामील होते.. गेल्या वर्षभरात मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक इत्यादी राज्यातील भाविकांनी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतलं.. कोरोना काळानंतरचा हा सर्वाधिक आकडा असल्याच मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं..
विनापरवाना गोमांस वाहतुकीवर वाळूज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 800 किलो गोमांसासह एक कार जप्त करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल 7 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. नियंत्रण कक्षाला गोमांस वाहतुकीची माहिती मिळताच पोलिसांनी वाळूज टोलनाक्यावर नाका बंदी केली.
14 वर्षीय बालिकेचा विनयभंग. 54 वर्षीय नराधम अटकेत. त्या मुलीस घेऊन जात गिरणा धरण परिसरात घडला प्रकार. शाळेतून घरी येत असताना आरोपीने मुलीला फूस लावून दुचाकीवर गिरणा धरणाकडे नेले. त्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. स्थानिक लोकांना लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात POCSO अंतर्गत गुन्हा
बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश. बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. बेशुद्ध करून बिबट्याला पकडले. बेशुद्ध करत बिबट्या जेरबंद. बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांच्या मोठी गर्दी…
यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती. वृक्षतोडीला विरोध होत असताना पालिकेकडून मात्र पुनररोपणासाठी यंत्र खरेदीची तयारी. पर्यावरण प्रेमी मात्र पुनर्रोपण बाबत नकारात्मकय पर्यावरण प्रेमींच्या वतीने तपोवनात सुरू आहेत दररोज आंदोलन
श्री मतोबा महाराजांच्या दोन चांदीच्या मुर्त्या आणि दानपेटीतून रोकड अशी केली चोरट्यांनी लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथे आहे श्री मतोबा महाराज मंदिर. मंदिरात चोरी करताना दोन चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…
नाशिक- तपोवन आतील वृक्ष पुनर्रोपणासाठी दीड कोटीचं यंत्र खरेदीचा घाट घातला आहे. यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती आहे. वृक्षतोडीला विरोध होत असताना पालिकेकडून मात्र पुनर्रोपणासाठी यंत्र खरेदीची तयारी करण्यात आली.
निफाड- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मतोबा महाराज मंदिरात चोरी झाली. श्री मतोबा महाराजांच्या दोन चांदीच्या मुर्त्या आणि दानपेटीतून रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे इथे श्री मतोबा महाराजांचं मंदिर आहे.
पुण्यात कडाक्याची थंडी असून तापमानाचा पारा नऊ अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीची लाट पसरलेली आहे. बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमान ९ ते १० अंशांपर्यंत खाली आले आहे. पुढील ४८ तासांत धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर आणखी वाढू शकतो.
पुण्याच्या संशोधकांनी सर्पिल दीर्घिका शोधली. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिक केंद्रातील संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी सर्पिल दीर्घिका शोधली आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करून शोधलेली ही सर्वात दूरची नवी दीर्घिका आहे. जी विश्व केवळ 1.5 अब्ज वर्षाचे असताना अस्तित्वात होती.
या दूरच्या सर्पिल दीर्घिका चे नाव अलकनंदा असं ठेवण्यात आले आहे. हिमालयातील प्रसिद्ध नदीच्या नावावरून अलकनंदा हे नाव दिले आहे.
धावत्या लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासमोर अश्लील चाळे केल्याप्रकरणी संतप्त नातेवाइक आणि प्रवाशांनी दोघांना चोप देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. सीएसएमटी-अंबरनाथ लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. गाडी सुटताच महिलेची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर उल्हासनगर स्टेशनवर प्रवाशांनी धडा शिकवत दोघांना पकडलं.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. नळदुर्ग इथल्या ‘अपना घर’मध्ये रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात त्यांना रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.