Ambernath Fire : अंबरनाथमधील हनाका कंपनी आग प्रकरण, कंपनीच्या 2 संचालकांना 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

| Updated on: Jul 01, 2022 | 9:49 PM

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत असलेल्या हनाका केमिकल्स या कंपनीला 25 मार्च 2014 रोजी दुपारी भीषण आग लागली होती. ही आग एमआयडीसीत लागलेली आजवरची सर्वात मोठी आग समजली जाते. या आगीत कंपनीचे संचालक शिवा सुब्रमण्यम नारायणन आणि व्हिजिटर कामगार बाबासाहेब सुर्वे या दोघांचा मृत्यू झाला होता.

Ambernath Fire : अंबरनाथमधील हनाका कंपनी आग प्रकरण, कंपनीच्या 2 संचालकांना 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा
अंबरनाथमधील हनाका कंपनी आग प्रकरणी संचालकांना कारावासाची शिक्षा
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमधील हनाका केमिकल्स या कंपनीला 2014 साली भीषण आग (Fire) लागली होती. या आगीत कंपनीच्या एका संचालकासह एका कामगाराचा मृत्यू (Death) झाला होता. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात कोर्टानं दोन्ही संचालकांना दोषी ठरवत 6 महिन्यांच्या सश्रम कारावासा (Rigorous Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. उदय मनोहर खानोलकर आणि हरेंद्र जयंतीलाल शहा शिक्षा सुनावण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणात सरकारी वकील म्हणून व्ही. जी. बनसोडे, तर आरोपींच्या वकील म्हणून सुधा जोशी यांनी काम पाहिलं. या निकालामुळे आठ वर्षांनी मृतांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

हनाका केमिकल्समध्ये 2014 मध्ये लागली होती आग

अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीत असलेल्या हनाका केमिकल्स या कंपनीला 25 मार्च 2014 रोजी दुपारी भीषण आग लागली होती. ही आग एमआयडीसीत लागलेली आजवरची सर्वात मोठी आग समजली जाते. या आगीत कंपनीचे संचालक शिवा सुब्रमण्यम नारायणन आणि व्हिजिटर कामगार बाबासाहेब सुर्वे या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक उदय मनोहर खानोलकर आणि हरेंद्र जयंतीलाल शहा या दोघांवर आयपीसी 304 अ आणि आयपीसी 285 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोषींना 3 महिने सश्रम कारावास आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा

उल्हासनगर न्यायालयात आलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीत तब्बल आठ वर्षांनी न्यायालयाने कंपनीचे संचालक उदय मनोहर खानोलकर आणि हरेंद्र जयंतीलाल शहा या दोघांनाही दोषी ठरवलं आहे. या दोघांना कलम 304 अ साठी सहा महिने सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड, तसंच दंड न भरल्यास 15 दिवसांची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर कलम 285 मध्ये 3 महिने सश्रम कारावास आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मृत व्हिजिटर कामगार बाबासाहेब सुर्वे यांच्या कुटुंबियांना 10 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायाधीश टंडन यांनी दिले आहेत. (Two directors sentenced to six months imprisonment in Hanaka company fire case in Ambernath)

हे सुद्धा वाचा