Thane News : घोडबंदर रोडवर इमारतीत भीषण आग, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी

ठाणे येथील घोडबंदर रोडवर एका रहिवासी इमारतीला शनिवारी आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले.

Thane News : घोडबंदर रोडवर इमारतीत भीषण आग, दोघांचा मृत्यू तर तिघे जखमी
Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 5:02 PM

ठाणे | 25 नोव्हेंबर 2023 : ठाणे येथील घोडबंदर रोडवर एका रहिवासी इमारतीला शनिवारी आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या आगीत घरातील दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अन्य तीन जखमींना उपचारांसाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळतचा अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघ बीळ नाका परिसरात ‘माधवी निवास’ ही इमारत आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर आज( शनिवार) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. पहाटेची वेळ असल्याने घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. त्यापैकी दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. ते कसाबसा जीव वाचवून घराबाहेर पडले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण ही आग लागली कशी, हे अद्याप तरी समजू शकलेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.