क्षयरुग्णांची नोंदणी न केल्यास दोन वर्षाचा कारावास, ठाणे पालिकेचा संबंधित रुग्णालयांना इशारा

Namrata Patil

|

Updated on: Feb 11, 2021 | 12:03 AM

केंद्र सरकारकडून क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम जाहीर केला आहे.  (TB patients registration is mandatory)

क्षयरुग्णांची नोंदणी न केल्यास दोन वर्षाचा कारावास, ठाणे पालिकेचा संबंधित रुग्णालयांना इशारा
नीट पोस्ट ग्रेजुएशन परीक्षेची तारीख ठरली

Follow us on

ठाणे : केंद्र सरकारकडून क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम जाहीर केला आहे.  या अनुषंगाने ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात क्षयरोगांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व रुग्णांना तसे निर्देश देण्यात  आले आहे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (Thane Municipal Corporation mandatory to Registration of TB patients)

प्रत्येक क्षयरोगावर उपचार होऊन क्षयरोगाचा प्रसार रोखता यावा यासाठी खाजगी रुग्णालये आणि संस्थांना क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येईल. प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होवून त्यांचेवर उपचार करणे आणि क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे हा या नोंदणीमागील मुख्य उद्देश आहे.

नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्षयरोग ‍ निदान करणाऱ्या शहरातील सर्व ठिकाणांचा समावेश आहे. यात पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडीओलॉजी, सुविधा असलेल्या संस्था, क्षयरोगावर उपचार करणारे विविध पॅथीजी याचा समावेश आहे. सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विक्री करणारे विक्रेते, केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट यांचा समावेश यामध्ये असणार आहे. तर या सर्वांनी क्षयरोगाची काटेकोरपणे नोंदणी करणे बंधनकारक राहील.

ज्या प्रयोगशाळा डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते, क्षयरोगाची नोंदणी करणार नाहीत अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येईल. अशा सर्वांवर भारतीय दंड विधान कलम 269, 270नुसार कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तींवर ‍किमान 6 महिने ते 2 वर्षापर्यत कारावास आणि दंडाची शिक्षा करण्यात येईल असे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने क्षयरोग निर्मुलनासाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमास महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Thane Municipal Corporation mandatory to Registration of TB patients)

संबंधित बातम्या :  

अजोय मेहता यांची ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, नव्या वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयाला मान्यता, किती खाटा वाढणार?

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI