AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंडखोर खासदारांचं मतदारसंघात फिरणं मुश्कील? ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप; रस्त्यावर…

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात संगमनेरमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं. वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

बंडखोर खासदारांचं मतदारसंघात फिरणं मुश्कील? ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप; रस्त्यावर...
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 17, 2026 | 7:05 PM
Share

Bhausaheb Wakchaure : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या बंडखोर खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केला आहे. लवकरच हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होऊन या खासदारांनी तसा निर्णय घेतल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, खासदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या पक्षात स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या नेत्यांंनी अनेक ठिकाणी रोष व्यक्त केलाय. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात तर अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

अहिल्यानगरात नेमकं काय घडतंय?

वाकचौरे यांच्या भूमिकेमुळे शिर्डीतील ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येतोय. 2014 साली वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले होते. त्यांना पुन्हा पक्षात घेऊन नका अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली होती, मात्र साईबाबांची शपथ घेतल्याने त्यांच्यावर विश्वास दाखवत ठाकरेंनी वाकचौरेंना उमेदवारी दिली. आता वाकचौरे यांनी ठाकरेंशी पुन्हा गद्दारी केली असून, त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवू अशा संतप्त भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.

तदारसंघात फिरू देणार नाही

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात संगमनेरमध्ये आक्रमक आंदोलन करण्यात आलं. वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ‘गद्दारी सहन केली जाणार नाही’, ‘ठाकरे विचारांशी विश्वासघात करणाऱ्यांना माफी नाही’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी वाकचौरे यांच्यावर पुन्हा एकदा गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल