शरद पवार पुन्हा केंद्रस्थानी! ठाकरे, राऊत भेट घेणार, डिलिमिटेनश बिलावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली

मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी दिल्लीत येणार असल्याने दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील पवार यांची भेट घेणार आहेत. हे दोन्ही नेते पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील.

शरद पवार पुन्हा केंद्रस्थानी! ठाकरे, राऊत भेट घेणार, डिलिमिटेनश बिलावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली
sharad pawar and uddhav thackeray and sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 11:08 AM

Delimitation Bill : मोदी सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची सध्या देशभरात चर्चा आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केला जाणार आहे. सभागृहात चर्चा झाल्यानंतर तसेच मंजुरी मिळाल्यावर हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवले जाईल. दोन्ही सभागृहांत विधेयक पारित व्हावे यासाठी एनडीए आणि भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. विरोधी बाकावर असलेले शरद पवार यांचा राष्ट्रवादी तसेच डीएमके हे पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना दुसरकीडे महाराष्ट्रातही हालचाली वाढल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीला जाणार आहेत.

सोनिया गांधी, खरगे पवारांच भेट घेणार

इंडिया आघाडीतील घटकपक्ष या विधेयकाला संसदेत पूर्ण ताकदीने विरोध करणार आहेत. राज्यसभेत बहुमत गाठण्याठी मोदी सरकारला कसरत करावी लागतेय. पवार गट, डीएमके तसेच इतर पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याने सध्या सत्ताधाऱ्यांची बाजू भक्कम दिसत आहे. त्यामुळे आता दिल्लीतील काँग्रेसेचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी सक्रीय झाले आहेत. हे दोन्ही नेते आज मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पवार गटाने या विधेयकाच्या विऱोधात राहावे, अशी विनंती हे दोन्ही नेते पवारांना करणार आहेत.

Loading...

संजय राऊत, उद्धव ठाकरेही पवारांची भेट घेणार

दुसरीकडे मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी दिल्लीत येणार असल्याने दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील पवार यांची भेट घेणार आहेत. हे दोन्ही नेते पवार यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील. अकंदरीत महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील बडे नेते पवारांची भेट घेणार असल्याने देशाचे आणि राज्याचे लक्ष सध्या मुंबईकडे लागले आहे. त्यामुळे सध्या नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us