उद्धव ठाकरेंचं ठरलं… राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत निर्णय झाला…
राज्यातील कॉँग्रेस नेते हे राज्यात येणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जोरदार तयारी करीत आहे.

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी मुंबई : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने पायी प्रवास करत आहे. हजारो किलोमीटर पर्यन्तचा प्रवास राहुल गांधी पायी करत विविध राज्यामध्ये राहुल गांधी जात आहे. केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत सर्वसामान्य नागरिकांना भेटत राहुल गांधी ही भारत जोडो यात्रा करत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात देखील येणार आहे. कॉँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, भाई जगताप यांनी हे निवेदन दिले आहे. सोशल मीडियावर निमंत्रणाचे वेळेचे फोटो देखील व्हायरल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार की नाही अशी चर्चा होती. मात्र आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोघेही राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होणार आहेत.
राज्यातील कॉँग्रेस नेते हे राज्यात येणाऱ्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची जोरदार तयारी करीत आहे.
7 सप्टेंबर पासून राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रा सुरू केली होती, त्यानुसार 7 नोव्हेंबरला ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
त्याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होणार आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 07 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील नांदेड शहरात दाखल होणार आहे.
महाराष्ट्रात ही यात्रा 16 दिवसांसाठी असणार आहे. राज्यात एकूण 383 किमीचा प्रवास करणार आहे.
काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
भारत जोडोच्या व्यासपीठावर यावेळी निमंत्रण दिलेल्यापैकी शरद पवार, उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहे.
