AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुपारी एकनाथ शिंदेंसोबत प्रवास करणाऱ्या खासदाराला उद्धव ठाकरेंचा फोन, नेमकं काय झालं बोलणं? वाचा…

Uddhav Thackeray : आज ठाकरे गटाच्या एका खासदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्याच खासदाराला आता उद्धव ठाकरेंनी फोन केला आहे.

दुपारी एकनाथ शिंदेंसोबत प्रवास करणाऱ्या खासदाराला उद्धव ठाकरेंचा फोन, नेमकं काय झालं बोलणं? वाचा...
Shinde ThackerayImage Credit source: Google
| Updated on: May 05, 2026 | 10:13 PM
Share

राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. गेल्या काही काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले आहे. अशातच आता शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर बाबत चर्चा सुरू झाली आहे. या ऑपरेशन अंतर्गत अनेक बडे नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आज ठाकरे गटाच्या एका खासदाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. आता यात खासदाराला उद्धव ठाकरे यांनीही फोन केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता. काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता, त्यांच्यावर मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. एकनाथ शिंदे निघाले तेव्हा त्यांच्या गाडीत संजय दिना पाटील बसले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा संजय दिना पाटील यांना फोन

खासदार संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना फोन केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या तब्ब्येतीची विचारपूस केली. तसेच अपघाताबाबतही विचारपूस केली. याचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील हे जुने सहकारी आहेत, एक जुने सहकारी मित्र म्हणून रुग्णालयात तब्येतीची विचारपूस करायला जाण्यापर्यंत ठीक होतं. मात्र संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. कारण काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...