AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही'; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
| Updated on: Feb 27, 2025 | 9:02 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले, यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो आणि मातांनो, उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे  आजपासूनच सुरु करा की गर्व से कहो हम हिंदू है आणि अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. एक ठिणगी पडली आणि उपऱ्याचं आक्रमन बाजूला केलं ती म्हणजे शिवसेना. शिवजयंती झाली, महाशिवरात्री झाली, गुढीपाढवा येईल व्हाटसअप वर तुम्ही जे मेसेज पाठवतात ते पण मराठीतच केले पाहिजेत, कारण  पंतप्रधान म्हटले अमृताशी पैजा जिंके तुम्ही हसताय काय? तुम्ही हसताय त्यामुळे मी पुढचं विसरतोय, असं म्हणत त्यांनी यावेळी हल्लाबोल केला.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.  ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काल परवा साहित्य संमेलन झालं, कसलं संमेलन झालं माहिती नही. विशेष म्हणजे अध्यक्ष यांनी जे विचार मांडले त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. दिशा दाखवणारे भाषण होत.  यावर देशात चर्चा झाली पाहिजे. माझे आजोबा जे विचार मांडायचे त्यांचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते आहेत. आपल्या देशाचे यान मंगळावर गेलं म्हणून आपण फटाके फोडतो पण दुसरीकडे माणसाच्या पत्रिकेत आपण मंगळ शोधतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा