मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
Harshwardhan Sapkal
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 5:56 PM

मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसने केला आहे. त्यांनी ट्विट करत या भेटीसंदर्भात दावा केला आहे. दरम्यान या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान यावर काँग्रेसची काय भूमिका असणार? काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार? याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नेमकं काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसकडून दावा करण्यात आला आहे, यावर हर्षवर्धन सपकाळ यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं.  ही अफवा आहे, या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. या प्रकरणात त्याची शहानिशा झाल्याशिवाय त्यावर बोलणं उचित ठरणार नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय गायकवाड यांनी शिविगाळ प्रकरणात दिलिगीरी व्यक्त केली आहे. या प्रकरणाकडे कसं पहाता असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.  त्यांनी माफी मागितलेली नाही, आणि त्यांनी जी दिलिगीरी व्यक्त केली आहे, ती त्यांनी कशा संदर्भात व्यक्त केली त्याचा खुलासा देखील या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्यांनी अतिशय अश्लील भाषेत शिव्या दिल्या, त्यानंतर त्यांनी कुठंतरी ब्रह्मण समाजावर जातिवाचक टिपणी केली. वारकरी संप्रदायातील जे संत आहेत ते वाईट भावनेतून, मुली पळवण्याच्या भावनेतून सप्ताहाला जातात, इथपर्यं त्यांची विधानं आहेत, ही सर्व विधानं आपण पाहिलीत तर अशा व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचं आहे, असं यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

 

 

Follow Us