Uddhav Thackeray : आधी म्हणालात मराठीसाठी एकत्र आलो, आता म्हणता सत्तेसाठी, या प्रश्नावर उद्धव ठाकरेंकडे उत्तर काय?

"2019 ला कळलं की शक्य होतं नाही. त्यांनी खोटं खोटं नाटक केलं आणि पुन्हा पाठीत सुरा खुपसला. राजकारणात आम्ही दोन भाऊ एकत्र आलो तर यांना मिर्ची का लागली. एकत्र आलो. युती झाली. यापूर्वी भाजपसोबत युती होती" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : आधी म्हणालात मराठीसाठी एकत्र आलो, आता म्हणता सत्तेसाठी, या प्रश्नावर उद्धव ठाकरेंकडे उत्तर काय?
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 10, 2026 | 1:52 PM

नाशिकच्या भाषणात तुम्ही म्हणालात आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, याआधी म्हणालेलात मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र आलो. आता म्हणता सत्तेसाठी एकत्र आलो? या प्रश्नावर उद्धव ठाकरे उत्तर देताना म्हणाले की, “हे गोट्या खेळण्यासाठी की विटी दांडू खेळण्यासाठी एकत्र आलेत. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप केले. मिंधेंना मांडीवर घेतलं” “सत्तेसाठी बदलापुरातील सहआरोपी तुषार आपटेला भाजप आडून नगरसेवक केलं. ज्या बदलातपुरात चिमुकलीवर अत्याचार झाले. तिथे अक्षय शिंदे काही बोलू नये म्हणून त्याचं एन्काऊंटर केलं अशी पुष्टी मिळते या बातमीवरुन. कारण अक्षय शिंदे जिवंत असता तर तुषार आपटे तुरुंगात गेला असता. सत्तेसाठी आम्ही तर असं काही करत नाही ना” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“सत्तेसाठी हे विकृतीला स्वीकृती देतायत. विकृतीला स्वीकृती आहे याची. आणि दोन भाऊ एकत्र आले मराठी महाराष्ट्रासाठी तर हे म्हणतात सत्तेसाठी एकत्र आलो. हे आलो सत्तेसाठी एकत्र. निवडणूक कशाला लढवतात मग” असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली.

आप गंदे हो हे माझ्या घरात मला कोण ऐकवत असेल तर काय करायचं?

सत्तेसाठी एकत्र आलो याचा दुसरा अर्थ असाही निघतो की, एकत्र आले नसते तर सत्ता आली नसती, “आम्ही प्रामाणिकपणे मराठीसाठी एकत्र येण्याचं कारण सांगितलं. मराठी माणसाला त्याच्या हक्काच्या मुंबईमध्ये घर नाकारलं जात. त्याच्या आहारावरुन आप गंदे हो हे माझ्या घरात मला कोण ऐकवत असेल तर काय करायचं?.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबईवर गुजरातचा डोळा होता. नरराक्षक मोरारजी देसाईने पोलिसांना सांगितलं मी तुम्हाला गोळ्या माणसं मारायला दिल्या. अशा परिस्थितीत मुंबई मिळवल्यानंतर मराठी माणसाची अहवेलना सुरू झाली. 2012 पर्यंत ठिक होतं. त्यानंतर हे सुरू झालं. शिवसेनाप्रमुख गेल्यावर माझा उपयोग करून पंतप्रधानपद मिळवलं आणि 2014 मध्ये युती तोडली” असं उद्धव ठाकरे म्हणाले.