AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena | सुप्रीम कोर्टातल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, उद्धव ठाकरे गटाची मागणी, सरन्यायाधीश काय म्हणाले?

शिवसेनेच्या याचिकांवरील सुनवाणी तातडीने घ्यावी, अशी मागणी कोर्टासमोर या गटाने केली. मात्र हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे द्यायचं की नाही या निर्णयासाठी लांबणीवर आहे, असा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला.

Shivsena | सुप्रीम कोर्टातल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्या, उद्धव ठाकरे गटाची मागणी, सरन्यायाधीश काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Aug 16, 2022 | 12:24 PM
Share

नवी दिल्लीः राज्यातील राजकीय नाट्याला एक महत्त्वाचं वळण मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना विरुद्ध शिंदेसेना (Eknath Shinde Group) यासंदर्भातील विविध याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच शिवसेना (Shivsena) कुणाची या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा (Election Commission) निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोर्टातल्या याचिकांवरील सुनावणी आधी घेण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे आज सुप्रीम कोर्टासमोर मेंशन करण्यात आली. मात्र हा खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही, यासंदर्भातीलच निकाल होणे बाकी आहे, असे सरन्यायाधीशांनी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आज केलेल्या मागणीवरही समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचं सध्या तरी दिसून येतंय. एकूणच केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी होणार असल्याने शिवसेना पक्ष हातातून निसटतो की काय, अशी भीती मूळ शिवसेनेच्या गोटात व्यक्त केली जातेय.

उद्धव ठाकरे गटाची मागणी काय?

एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंबंधीसहित इतर काही याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. या याचिकांवरील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर कुणाचा हक्क आहे, यासंदर्भातील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत येत्या 19 ऑगस्ट रोजी घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाला झुगारून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. आज याच संदर्भातील एक याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे सुप्रीम कोर्टात मेंशन करण्यात आली. शिवसेनेच्या याचिकांवरील सुनवाणी तातडीने घ्यावी, अशी मागणी कोर्टासमोर या गटाने केली. मात्र हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे द्यायचं की नाही या निर्णयासाठी लांबणीवर आहे, असा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला.

निवडणूक आयोगाकडे राज्याचं लक्ष

19 ऑगस्ट 1989 रोजी शिवसेनेला धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह मिळालं. मात्र याच चिन्हावरून निवडणूक आयोगासमोर वाद रंगला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतील बहुतांश आमदारांचं पाठबळ असल्याने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच, असा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. आयोगाच्या आदेशानुसार उद्धव ठाकरे गटानेही शिवसेनेवर दावा सांगणारे पुरावे सादर केले आहेत. मात्र दोन्ही गटांचे पुरावे नमके काय आहेत, याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. आता कोणत्या गटाकडे किती सदस्य अथवा पदाधिकारी आहेत, तसेच आमदार आणि खासदार कुणाच्या गटात जास्त आहेत, यासंबंधीचा विचार केल्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेऊ शकते. येत्या 19 ऑगस्टला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. निर्णय घेण्यास विलंब होत असल्यास आयोगाकडून शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवले जाऊ शकते. अशा वेळी दोन्ही गटाला दुसरे एखादे स्वतंत्र नाव आणि चिन्ह दिले जाऊ शकते. भविष्यात दोन्ही गट एकत्र आल्यास ते चिन्ह परत देता येते.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं