AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅकेज मान्य नाही, पण जे… उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर असून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. आता नुकताच त्यांनी कर्जमुक्तीच्या विषयावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पॅकेज मान्य नाही, पण जे... उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 05, 2025 | 10:50 AM
Share

उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीवर ते ठाम आहेत. मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांच्याकडून केली जातंय. 7 नोव्हेंबरपर्यंत ते मराठवाड्याच्या दाैऱ्यावर असून विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नुकताच उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केलीये. केंद्रीय पथक झालेल्या नुकसानीची पाहणी मोबाईलची बॅटरी लावून करत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पीक विम्याचे 40 ते 50 हजार मिळायला हवे होते. मोसंबीला 80 हजार मिळायला हवे होते. कापसाला वेगळे हवे होते. पीक विम्याचे पैसे मिळाले. तुम्ही खोटं बोलत आहेत. अकोल्यात 2 रुपये तीन रुपये मिळाले. पालघरमध्ये अडीच रुपये मिळाले. शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. जेवढे तुम्ही भरले तेवढेही मिळाले नाही. सहा रुपये आले. बँकेचं स्टेटमेंट आहे. मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावला.

मुख्यमंत्री म्हणत आहेत, आता जर कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता कोणी तरी मला गणित सांगा बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी देतात. आता कर्ज नाही फेडलं तर खरीपाचं कर्ज मिळणार का. 30 जूनला कर्जमाफी देणार असेल तर तोपर्यंत हप्ते भरायचे की नाही भरायचे. भरायचे असेल तर कुठून भरायचे. कर्जमाफी करण्या आधी माती तर द्या. मग कर्ज द्या. मी हा विषय सोडणार नाही.

कर्जमुक्ती करा. आताच्या आता करा. निवडणुकीसाठी कर्जमुक्ती केली आहे. खोटं बोलत आहेत. सरकारने जाहीर केलेले पॅकेज आम्हाला मान्य नसल्याचेही सांगताना उद्धव ठाकरे दिसले. पॅकेज मान्य नाही पण जे जाहीर केलं ते तरी द्या ना. शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठा पाऊस झाला आणि शेतांचे मोठे नुकसान झाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...