
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सातत्याने भाजपावर आरोप करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी काही गंभीर आरोप भाजपावर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, भाजपा कोणतीही निवडणूक मुस्लिम हिंदू वाद केल्याशिवाय करत नाही. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांना सनसनीत मुलाखत उद्धव ठाकरे यांची घेतली. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मोदींचं एक भाषण दाखवा हिंदू मुस्लिम वादावर झालं नाही. कटेंगे तो बटेंगे काय आहे. मंगळसूत्र चोरलं जाईल हे काय आहे. यांची भाषणं ही हिंदू मुस्लिमचीच आहे. हे लढणारे नाही. हे हातपाय गाळणारे आहेत.यांना सर्व फुकटात दिलं. यांचे नगरसेवक 20-25 असायचे. सर्व जाहिराती करायचे. त्यावेळी आमच्या ताटात जेवायचे.
आम्ही होर्डिंग केली करून दाखवलं. 2027 लाही करून दाखवलं. आताही होर्डिंग लागलंय होय आम्ही हे करून दाखवलं. सगळीकडे विनाश ही त्यांची टॅग लाईन आहे. गणेश नाईक बोलत आहेत. संजय केळकर बोलत आहेत.
एक लाख रुपयांचं भाजपला चॅलेंज देतो. मुंबईचा महापौर कोण होणार, सुरुवात कोणी केली. आम्ही तर खान महापौर होणार असं म्हटलं नाही.
यांचं एक भाषण दाखवा की हिंदू मुस्लिम केलं नाही. लोकांची घरे जाळून पोळ्या शेकणारे हे नालायक लोक आहे. ठाकरेंचा शब्द आहे. आता मोदींची गॅरंटी चालत नाही. बाळासाहेब ठाकरे एकमेव ब्रँड होता. त्या आधी प्रबोधनकार ब्रँड होते. आमच्या घरात परंपरा आहे. यांना आगा पिच्छा नाही. यांना बापचं नाव लावता येत नाही. यांच्या बापाचं नाव काय. आमची परंपरा आहे. आम्ही लढ्यात पुढे असणारे लोक आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले, त्यांनी मातोश्रीची बदनामी थांबवावी. माझे वैयक्तीक त्यांच्यासोबतच काहीच नाही. त्यांनी विकृत नगरसेवक केले त्यावर बोलावं. साधू हत्याकांडातील आरोपी घेतला त्याच्यावर बोलावं. प्रफुल्ल पटेलवर बोलावं. त्या कुत्तावर बोलावं, मातोश्रींनी मोदींना वाचवले, असेही त्यांनी म्हटले.