AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला नाकार्ते म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्युत्तर

Uddhav Thackeray : "मी कर्ज मुक्ती दिली त्याने बँकांना फायदा होणार होता. तुमची कर्जमुक्ती कोणाला फायदा करुन देणार आहे. मी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकून कर्जमाफी करुन दिली होती" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला नाकार्ते म्हणाले, त्यावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड प्रत्युत्तर
Uddhav Thackeray
| Updated on: Sep 17, 2026 | 3:02 PM
Share

‘तुमसे ना हो पायेगा’ या तुमच्या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाकार्त्यांचं आंदोलन म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “ठीक आहे तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. त्यांची पंचाईत अशी झालीय की, प्रवीण स्वामी सांगत होते, तिथले लोक सांगत होते या भागातल्या समस्या हा नाकार्तेपणा कोणाचा आहे?” “5 ऑक्टोंबरला पंचनामे सुरु होणार हा नाकार्तेपणा माझ्या काळातला नाही. चारा छावण्या कधी सुरु करणार, अच्छे दिन आयेंगे मोदी बोलले. पण कब आयेंगे?” असं उद्धव ठाकरेंनी विचारला. “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, किती वर्ष पाहिजे तुम्हाला. मागच्यावर्षी अतिवृष्टी झाली. इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. जमीन खरडून गेलेली. प्रतिहेक्टर साडेतीन लाख रुपये देणार होता. साडेतीन रुपये तरी दिले का?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

“मी कर्ज मुक्ती दिली त्याने बँकांना फायदा होणार होता. तुमची कर्जमुक्ती कोणाला फायदा करुन देणार आहे. मी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकून कर्जमाफी करुन दिली होती” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, मनापासून देतो. पण त्यांनी मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिवे लावण्याचं काय ते ते आवाहन केलय. शेतकऱ्यांच्या घरातले दिवे विझत असताना तुम्ही दिवे लावणार का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

‘शेतकरी मेला तरी चालेल,पण..’

“पाच ऑक्टोंबर तारीख तुम्ही जाहीर केली, पण पाच ऑक्टोंबरला कुठला मुहूर्त काढला माहित नाही. कायदा जनतेसाठी असतो, जनता कायद्यासाठी नसते. आपत्ती आल्यावर निकषात बसत नाही म्हणून थांबणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही नाकार्ते आहात” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “पुढच्या आठवड्यात पश्चिम विदर्भात नितीन बापू शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहेत. आज इकडे मराठवाडा मुक्तीदिन निमित्त झालं. इतर महाराष्ट्रासाठी गरज नाही. गेल्यावर्षीची मदत अजून मिळालेली नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “सत्ताधारी कमी पडतायत. याचं कारण मराठवाड्याचं नेतृत्व हे लोक संपवत आहेत. मराठवाड्यातला शेतकरी मेला तरी चालेल. पण शक्तीपीठ मार्ग झाला पाहिजे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?