Ladaki Bahin Yojna: नव्याने नोंदणी…; लाडकी बहीण योजनेबाबत उद्धव ठाकरेंनी केली पोलखोल
Ladaki Bahin: लाडकी बहिण योजनेबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

आज, 5 जुलै रोजी वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. अनेकांची कित्येव वर्षांपासून त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे.
विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी दिली योजनेबाबत अपडेट
महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती. या योजनेचे नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असे देण्यात आले होते. ही योजना गेमचेंजर ठरली होती. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळ्याव्यात ही अपडेट दिली आहे. नव्याने नोंदणी बंद झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
वाचा: या वासाला सापही चळाचळा कापतात, वास येताच पळतात 100 किलोमीटर दूर; पावसाळ्यात तर…
‘नव्याने नोंदणी होणार नाही’
लाडकी बहिण योजने संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद होणार. नव्याने नोंदणी होणार नाही. आता बसा बोंबलत. देशात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र थांबणार नाही. कर्ज काढतच राहणार.’
आदिती तटकरेंनी दिली होती मोठी अपडेट
मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी बहिण योजनेबाबत काही माहिती दिली होती. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. २ हजार २८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. याच सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितले होते. आता नव्या नोंदणी बंद करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.