
“आम्ही सोबत होतो. तेव्हा करू शकले नाही. म्हणून युती तोडली आणि शिवसेनेला फोडली. 2013 ला महापालिका त्रुटीत होती. आम्ही 2022 पर्यंत 92 हजार कोटीपर्यंत प्लसला नेली. तेव्हा त्यांची हिंमत होत नव्हती. आम्ही तेव्हा त्यांच्यासोबत होतो. तेव्हा मुंबईला तोडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला नव्हता. आता दोन तीन वर्षात हे जाणवत आहे. मुंबईकरांवर बिल्डरची दादागिरी सुरू आहे. वेज नॉनव्हेज करत आहेत. या बिल्डरांना हाकलून द्या. कोण आहेत ते. आमच्यात मिठाचा खडा टाकणारे हे लोक आहेत. तो भैय्या जोशी आला. काय संबंध तुमचा. कोण ओळखतं तुम्हाला. हिंदीची सक्ती. का करता सक्ती” असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारले. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली.
“लहान मुलांच्या फुफ्फुसांचा आजार वाढला आहे. धुम्रपान करा किवा नका करू. आजार होतो. 22 हजार कोटीची ठेवी तोडल्याचे हे प्रकरण आहे. विकास का विनाश? स आणि श आहे. यांची विनाशाची निती आहे. हॉस्पिटल लागू नये असं आयुष्य हवं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हॉस्पिटल स्थापन केली हा विकास नाही का?
“कोस्टल रोड हा विकास नाही का? शाळांचा सुधारणा हा विकास नाही का? झोपडपट्टी धारकांना चांगली घरे देणं हा विकास नाही का? वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली, हॉस्पिटल स्थापन केली हा विकास नाही का? किती तरी विकासाची कामे केली. महापालिका त्यासाठीच असते. एक निवडणूक नाही की त्यांनी हिंदू मुस्लिम केलं नाही” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
का यांना कचरा गोळा करावा लागतो?
“त्यांनी विकृत नगरसेवक केले त्यावर बोलावं. साधू हत्याकांडातील आरोपी घेतला त्याच्यावर बोलावं. प्रफुल्ल पटेलवर बोलावं. त्या कुत्तावर बोलावं. देवयानी बाईंना अश्रू आवरेना. त्य़ांनी आपला पक्ष बघावा. का यांना कचरा गोळा करावा लागतो? आम्ही म्हणतो मराठी होणार. ते म्हणातता हिंदी मराठी होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? बाळासाहेबांचं एक वाक्य आहे. हिंदुस्थानात हिंदू महाराष्ट्रात मराठी आहोत. हिंदुस्थानात हिंदू आणि गुजरातमध्ये गुजराती आहे. पण ते मराठी माणसाला हिंदू मानत नाही. आम्ही अस्सल हिंदू आहोत. हिंदू मराठी आहोत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.