AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 PAK vs SL : पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी केलं पराभूत, पण उपांत्य फेरीपूर्वीच गेम झाला

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पाकिस्तान श्रीलंका सामन्याचा निकाल लागला. पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी पराभूत केलं. पण न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. आता चौथ्या संघासाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरस असणार आहे.

T20 WC 2026 PAK vs SL : पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी केलं पराभूत, पण उपांत्य फेरीपूर्वीच गेम झाला
T20 WC 2026 : पाकिस्तानने श्रीलंकेला 5 धावांनी केलं पराभूत, पण उपांत्य फेरीपूर्वीच गेम झालाImage Credit source: Icc X account
| Updated on: Feb 28, 2026 | 11:25 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला आहे. सुपर 8 फेरीत गट 2 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा सामना झाला. हा सामना पाकिस्तानने जिंकला पण नेट रनरेटचं गणित सोडवण्यात अपयश आलं. पाकिस्तानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. पाकिस्तानने या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमवून 212 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेची सुरूवात काही चांगली झाली नाही. पण नंतर श्रीलंकेने डाव सावरला. श्रीलंकने 20 षटकात 6 गडी गमवून 207 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना श्रीलंकेने फक्त 5 धावांनी गमावला. हा सामना श्रीलंकेने गमावला असला तरी न्यूझीलंडचं भलं करून गेले. कारण या सामन्यात पाकिस्तानला नेट रनरेटचं गणित काही सोडवता आलं नाही. त्यामुळे न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे.

नाणेफेकीचा कौल गमवल्याने पाकिस्तानच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. साहिबजादा फरहाना आणि फखर जमान यांनी पहिल्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी केली. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज धडाधड बाद झाले. साहिबजादा फरहानने 60 चेंडूत 100, तर फखर जमाने 42 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज तग धरू शकला नाही. मोहम्मद नवाज आणि सलमान आघा यांना खातंही खोलता आलं नाही. तर ख्वाजा नाफाय 2, शादाब खान 7, उस्मान खान 8, शाहीन आफ्रिदी 4, नसीम शाह 1 धाव करून बाद झाले.

श्रीलंकेचा डाव आणि पाकिस्तानचा गेम

श्रीलंकेसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं असलं तरी 147 धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण तसं झालं नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचे प्रत्येकी 3 गुण होते. पण नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली. न्यूझीलंडचा नेट रनरेट हा +1.390 आहे. तर पाकिस्तानचा नेट रनरेट हा -0.123 राहिला. दरम्यान या दोन्ही संघातील सुपर 8 फेरीतील सामना पावसामुळे ड्रॉ झाला होता. त्यामुळे प्रत्येकी 1 गुण मिळाला होता. उलट श्रीलंका जिंकते की काय अशी स्थिती होती.

कर्णधार दासून शनाकाने सातव्या क्रमांकावर उतरून पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंध्या उडवल्या. त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकार मारत नाबाद 76 धावा ठोकल्या. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 28 धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदी गोलंदाजीसाठी आला होता. दासूनने त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तीन चेंडूत तीन षटकार मारले. सामना 2 चेंडूत 6 धावा असा आणला. पण शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव गेले.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला