AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL : श्रीलंकेमुळे निकालाआधीच पाकिस्तानचं वर्ल्ड कप स्पर्धेतून पॅकअप, न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये

Pakistan vs Sri Lanka Super 8 : श्रीलंकेने पाकिस्तान विरुद्ध 148 वी धाव घेताच न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळाला. श्रीलंकेमुळे न्यूझीलंडला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं. तर पाकिस्तानचा निकालाआधीच स्पर्धेतून बाजार उठला.

PAK vs SL : श्रीलंकेमुळे निकालाआधीच पाकिस्तानचं वर्ल्ड कप स्पर्धेतून पॅकअप, न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये
Pavan Rathnayake Salman Agha and Matt HenryImage Credit source: ICC/ICC via Getty Images
| Updated on: Mar 01, 2026 | 12:32 AM
Share

यजमान श्रीलंकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 फेरीतील आपल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 213 धावांचा पाठलाग करताना 16 व्या ओव्हरमध्ये 148 धावा पूर्ण केल्या. श्रीलंकेने 148 वी धाव घेताच पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर श्रीलंकेमुळे न्यूझीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरली. न्यूझीलंड यासह उपांत्य फेरीत पोहचणारी तिसरी टीम ठरली. पाकिस्तानला नेट रन रेटच्या हिशोबाने सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी श्रीलंकेला 147 धावांपर्यंत रोखणं बंधनकारक होतं. मात्र पाकिस्तानचे गोलंदाज श्रीलंकेला 147 धावांआधी रोखण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सामन्याच्या निकालाआधीच पाकिस्तानचा बाजार उठला. तर श्रीलंकेमुळे न्यूझीलंडने सुटकेचा निश्वास सोडला.

सामन्याचा धावता आढावा

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यासह पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी नेट रनरेटच्या हिशोबाने हा सामना 65 धावांनी जिंकायचंय हे स्पष्ट झालं. पाकिस्तानच्या सलामी जोडीने याच हिशोबाने चाबूक बॅटिंग केली. साहिबजादा फरहान आणि फखर झमान या सलामी जोडीने 176 रन्सची पार्टनरशीप केली. साहिबजादाने शतक (100) केलं. तर फखरने 84 धावांचं योगदान दिलं. मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमाल केली. श्रीलंकेने पाकिस्तानला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 14 रन्स देऊन 6 झटके दिले. श्रीलंकेने यासह पाकिस्तानला स्कोअर दाबला. त्यामुळे पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 212 धावांपर्यंच पोहचता आलं.

श्रीलंकेची बॅटिंग

यजमान श्रीलंकेला हा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र श्रीलंकेचे प्रयत्न अवघ्या 5 धावांनी कमी पडले. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 धावांपर्यंतच पोहचता आलं. श्रीलंकेचा ओपनर पाथुम निसांका 3 रन्सवर आऊट झाला.

त्यानंतर कामिल मिशारा याने 26 आणि चरिथ असलांका याने 25 धावा केल्या. पवन रथनायके याने 58 धावांची खेळी केली. त्यानंतर कामिंदु मेंडीस (3) आणि जनिथ लियागने याने 5 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान हा सामना 20 ओव्हरआधीच जिंकेल, असं चित्र होतं. मात्र कॅप्टन दासून शनाका याने कहर केला. शनाकाने शेवटपर्यंत नाबाद राहत 245 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. मात्र दासून श्रीलंकेला विजयी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे श्रीलंकेला 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 207 धावांपर्यंत पोहचता आलं. दासूनने 31 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 2 फोरसह 76 रन्स केल्या. तर दुनिथ वेल्लालागे याने 2 धावा केल्या. पाकिस्तानसाठी अब्रार अहमद याने 3 विकेट्स मिळवल्या. तर मोहम्मद नवाझ,शाहिन अफ्रिदी आणि नसीम शाह या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...