1992-93च्या दंगलीत वाजपेयी आणि आडवाणी यांनी माफी मागितली होती; उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा एकेरी शब्दात उल्लेख करीत जोरदार हल्लाबोल चढविला आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर चौफेर हल्ला केला.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची तोफ आज जोरदार धडाडली. उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नेते अमित शाह यांच्या जोरदार टीकास्र केले. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचे नाव घेऊन जोरदार टीका केली आहे. मी मुस्लीमांची माफी मागितली अशी अफवा प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन पसरवली जात आहे. त्याचा खुलासा करताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शेलक्या शब्दात अमित शाह यांची सालटी काढून टाकली.
उद्धव ठाकरे यावेळी आपल्या अत्यंत आक्रमक शैलीतील भाषणात भाजपा आणि गोमूत्रधारी ब्राह्मणवादावर जोरदार टीका केली. आम्ही विधानसभेत आपण गाफिल राहिलो. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात त्यांना अपप्रचार केला. आपण हिंदुत्व सोडलं नाही. मला सांगा हिंदुत्व सोडलं असेल तर. मी चेंबूरच्या चिता कॅम्पमध्ये भाषण केलं. तिथे मुस्लिम होते. मी हिंदीत भाषण केलं. त्यांना म्हटलं मी हिंदुत्व सोडलं का? माझं हिंदुत्व मान्य आहे का? तर ते हो म्हणाले असा दाखला दिला.




टोप्या घातलेले तुमचे फोटो आहेत
मी ९२-९३च्या दंगलीची माफी मागितल्याचं छापून आणलं. मी कुठे मागितली. कधी मागितली. माफी वाजपेयींनी मागितली होती. ‘इट वाज टेरिबल मिस्टेक’ असं आडवाणी म्हणाले होते. अमित शाह जा .. अडवाणी आहेत अजून जा जाऊन त्यांना विचारा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरे यांनी नव्हे मोदींनी खाल्ला होता. आमच्या बाजूला मुस्लिम राहायचे, ते ताजिया द्यायचे. मी खायचो, असं मी नाही मोदी म्हणाले. टोप्या घातलेले तुमचे फोटो आहेत. तुम्ही मला हिंदूत्व सोडलं म्हणतात. देशाच्या तिरंग्यात हिरवा आहे. तो तिरंगा तुम्ही स्वातंत्र्यानंतरही फडकवत नव्हता. आमच्या भगव्याला डाग लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला असा जोरदार हल्ला ठाकरे यांनी यावेळी आहे.