‘कम ऑन किल मी’, उद्धव ठाकरे गरजले, पण येताना ॲम्ब्युलन्स…

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.

कम ऑन किल मी, उद्धव ठाकरे गरजले, पण येताना ॲम्ब्युलन्स...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 9:00 PM

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘मी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभचा पिक्चर होताना ॲम्ब्युलन्स घेऊन येतो तसं येत असाल तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर घणाघात केला. ‘जर तुम्हाला वाटत असेल शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशान महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही, भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज तर मी तयारीने उभा आहे. ९२-९३ साली जेव्हा दंगा भडकला होता, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती आली होती हे बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं, पुरे झालं, ती व्यक्ती कोण सांगणार नाही, ते हयात आहेत. मी पिक्चर पाहिला, तो  नाना पाटेकर यांचा प्रहार चित्रपट आहे. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभा राहोत. सांगतो कम ऑन किल मी. तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे. म्हणतोय कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा पिक्चर होता ना तो ॲम्ब्युलन्स घेऊन येतो. तसं येत असाल तर ॲम्ब्युलन्स घेऊन या,  येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.