AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, सुरत महाराष्ट्र का लुटत आहे?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढवला. आम्ही सर्व जागा लढवत आहोत. आणि जिंकण्याच्या ईर्षेने लढत आहोत. आमच्या 48 जागा जिंकून येतील हा आम्हाला विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर, सांगलीत विशाल पाटील हे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीत. त्यांनी बंडखोरी केली आहे. काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, सुरत महाराष्ट्र का लुटत आहे?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
| Updated on: Apr 24, 2024 | 11:31 AM
Share

गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचा पहिला विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. गद्दारांना सुरत सुरक्षित का वाटली? ज्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. ती सुरत महाराष्ट्र का लुटत आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे हे नांदेडमध्ये आले होते. मात्र, वेळेच्या अभावी त्यांनी सभा घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर नवीन चेहरे पुढे येत आहेत. त्यांनी ज्यांची वाट अडवणू ठेवली होती, त्यांना आता संधी मिळत आहे. आमच्याकडेही काही सुभेदाऱ्या निर्माण झाल्या होत्या. ते गेले आणि नवीन लोकांना संधी मिळाली. तसंच अशोक चव्हाण तिकडे गेल्याने काँग्रेसला नवचैतन्य निर्माण झालं आहे. नेते मोठे झाले की केले तरी जनता कधीच गद्दार होत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आदर्श घोटाळ्याचा निकाल अजूनही लागला नाही. त्यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेतलं आणि त्यांना राज्यसभेत पाठवलं. चव्हाण यांनी शहीदांच्या कुटुंबाला फसवलं असं तुम्ही तेव्हा म्हणत होता. याचा अर्थ तुम्ही शहिदांना फसवणाऱ्या लोकांमध्ये सामील झाला आहात, असा टोला त्यांनी लगावला.

आलेली स्क्रिप्ट वाचतात

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. मी घटनाबाह्य लोकांवर बोलत नाही. त्यांना सकाळी स्क्रिप्ट येते, ते कण्हून कण्हून बोलतात. कुंथून कुंथून बोलतात. लोकं त्यांना काय म्हणत आहेत ते जनतेत गेल्यावर कळतं, असा टोला त्यांनी लगावला.

घरकाम करणाऱ्यांनाही सुरक्षा

पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरूनही त्यांनी जोरदार टीका केली. घरात काम करणाऱ्यांना या सरकारने झेड प्लस, वाय प्लस सुरक्षा दिली आहे. सर्व सामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. महिला सुरक्षित नाहीत. सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहे. लोकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. पण गद्दारांना कडेकोट बंदोबस्तात ठेवत आहेत. सुरक्षेचा खर्च कोण करतंय हा प्रश्न आहे. लोकांचा कर घेऊन सुरक्षा दिली जात आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.