AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper leak: मोटेगावकर, कुलकर्णी, वाघमारेसह 13 जणांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र

NEET Paper Leak CBI Files Chargesheet: नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष न्यायालयात एकूण 13 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील 3 तज्ज्ञ, लातूर आणि पुण्यातील कोचिंग क्लासेस मालक-चालकांचा समावेश आहे. CJP च्या आंदोलनानंतर न्यायालयीन प्रक्रियेलाही वेग आल्याचे समोर येत आहे.

NEET Paper leak: मोटेगावकर, कुलकर्णी, वाघमारेसह 13 जणांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र
मोटेगावकर, कुलकर्णी, वाघमारेसह 13 जणांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र
| Updated on: Jul 29, 2026 | 8:40 AM
Share

UG-NEET 2026 पेपरफुटीप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी विशेष न्यायालयात एकूण 13 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमधील तीन प्रश्नपत्रिका तज्ज्ञ, पुणे आणि लातूरमधील दोन कोचिंग क्लासचे संचालक, मालक, मध्यस्थ आणि प्रश्नपत्रिका फुटीत सहभागी काही उमेदवारांचाही समावेश आहे. हे सर्व 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीतील रोऊझ एव्हेन्यू कोर्टात याविषयी सुनावणी सुरू आहे. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे आरोपपत्र दाखल केले आहे.

सीबीआयने आरोपत्रात गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि पुरावे नष्ट करण्यासह भारतीय न्याय संहिता(बीएनएस) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्ग प्रतिबंध) कायदा 2024 अंतर्गत सीबीआयने हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. नीट परीक्षेतील अनुचित प्रकार, प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांच्या चौकशीसाठी 12 मे रोजी सीबीआयकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. 3 मे ची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली.

सीबीआयने महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह इतर राज्यांतील 92 ठिकामी छापे घातले. दोन महिन्यांच्या तपासात प्रश्नपत्रिका फुटीची पाळमुळं खोदण्यात आली. या घोटाळ्यातील सर्व आरोपींची चौकशी करणे, त्यांची धरपकड करणे, त्यांच्यातील हितसंबंध निश्चित करणे आणि साखळी प्रक्रिया उघड करण्याची कामे सीबीआयने केली आहेत.

आरोपपत्रात कोण कोण?

आरोपींमध्ये राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे तीन विषयतज्ज्ञ मनीषा संजय हवालदार (भौतिकशास्त्र), मनीषा गुरुनाथ मांढरे( जीवशास्त्र), पी. व्ही. कुलकर्णी(रसायनशास्त्र) यांचा समावेश आहे. लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे, पुण्यातील डॉ. अभंग प्रभू, शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह, लातूरमधील कोचिंग क्लास संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याच्यासह यश यादव, मांगीलाल बिवल, दिनेश बिवल, विकास बिवल, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे अशा एकूण 13 आरोपींविरोधात सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे.

सीबीआयने पुणे, लातूर, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह देशभरात छापे टाकून आरोपींना अटक केली. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींची बँक खातीही गोठवण्यात आली आहे. तपासात परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या आरोपींनी नीट-युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याचा आणि देशभरातील विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण हितसंबंधातून ती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन केले. 35 दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार