AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठीत बोलू की हिंदीत? मोदींनी दिल्या उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा; निकम यांची पहिली प्रतिक्रिया काय?

प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्जवल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. ही नियुक्ती देशाच्या ऐक्यासाठी आणि संविधानाच्या बळकटीसाठी त्यांचे योगदान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मराठीत बोलू की हिंदीत? मोदींनी दिल्या उज्ज्वल निकम यांना शुभेच्छा; निकम यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Ujjwal Nikam pm modi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2025 | 2:55 PM
Share

ज्येष्ठ आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मला फोन आला. ते म्हणाले, उज्जवलजी हिंदीत बोलू की मराठी. त्यानंतर त्यांनी माझ्याशी मराठीत संवाद साधला. त्यांनी मला सांगितले की राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने माझ्यावर लोकसभा निवडणुकीवेळी जो विश्वास प्रकट केला होता, तो यावेळी सार्थ करुन दाखवेन, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

माझ्यावर मोठी जबाबदारी

अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचे विश्लेषण या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशारितीने प्रबळ राहिल, याची काळजी घेण्याकरिता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेन, असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांचे मी व्यक्तीश: आभारी आहे. तसेच निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सर्वांचे, महाराष्ट्रातील जनतेचे, इतर भाषिकांचे सहकार्य मला मिळेल यात शंका नाही, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

त्याचप्रमाणे अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवत असताना मला आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सहकार्य केले. त्यामुळे आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहितील, यात मला शंका नाही. आपल्याला एक विधायक काम करायचं आहे की हा देश हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एकसंघ कसा आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. त्या दृष्टीकोनातून सर्वांच्या शुभेच्छा मला लागतील, यात शंका नाही, असेही ते म्हणाले.

राजकीय शक्तींनी विसरु नये हीच माझी सूचना

लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी लोकसभेपुरता त्यात होतो. लोकसभा निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली, जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. जिथे गैरसमजुतीला लोक बळी पडले. परिणाम जेव्हा लोकांच्या लक्षात आले आपलं चुकलं. कसाबच्या गोळीने आमच्या शहिदांच्या हत्या झाली नाही असे ही पसरवले. पण हा फेक नरेटिव्ह विधानसभेला जनतेने हाणून पाडला. आमची जनता ही साक्षर आहे हे काही राजकीय शक्ती विसरतात, त्यांनी ते विसरु नये हीच माझी सूचना आहे, असे उज्जवल निकम यांनी लोकसभा निवडणुकीतील अनुभवावर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

उज्ज्वल निकम यांचे कायदेशीर क्षेत्रातील आणि आपल्या संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे. ते केवळ एक यशस्वी वकीलच नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नामांकित केले आहे, हे आनंददायी आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.