AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरेदीसाठी बाहेर गेले अन् अवघ्या 120 मिनिटांत… घरी येऊन पाहताच कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?

उल्हासनगरच्या शिवनयना अपार्टमेंटमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीत ४.६६ लाखांचा ऐवज चोरीला गेला असून, या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरेदीसाठी बाहेर गेले अन् अवघ्या 120 मिनिटांत... घरी येऊन पाहताच कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली, नेमकं काय घडलं?
फोटो प्रातिनिधिक
| Updated on: May 13, 2026 | 7:23 AM
Share

उल्हासनगर शहरात चोरट्यांचे धाडस इतके वाढले आहे की आता वर्दळीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडू लागल्या आहेत. कॅम्प ३ मधील सी-ब्लॉक परिसरात भरदुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ६६ हजार ७१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत चोरट्यांनी हा हातसाफ केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील सी-ब्लॉक येथील ‘शिवनयना अपार्टमेंट’मध्ये झिनतबानो सिद्दीकी या आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी, १० मे रोजी दुपारी झिनतबानो, त्यांचे पती आणि मुलगा असे सर्वजण काही महत्त्वाच्या खरेदीसाठी पडघा येथे गेले होते. घर बंद असल्याची खात्री करूनच त्यांनी दुपारी घराला कुलूप लावले होते. मात्र, चोरट्यांनी त्यांच्या हालचालींवर आधीच पाळत ठेवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरी उघड

सिद्दीकी कुटुंब बाहेर गेल्यानंतर काही वेळातच चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा शिताफीने तोडून घरात प्रवेश केला. दुपारी घरफोडी केल्यानंतर चोरटे पसार झाले. सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास शेजाऱ्यांनी सिद्दीकी यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले. घराची कडी तुटलेली पाहून त्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने सिद्दीकी यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

लाखोंचा मुद्देमाल लंपास

यानंतर कुटुंबियांनी धावतपळत घर गाठले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांच्या घरातील बेडरूममधील कपाट फोडलेले होते आणि त्यातील कपडे व इतर साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त फेकलेले होते. चोरट्यांनी कपाटातील कप्प्यात ठेवलेले सोन्याचे दागिने (चैन, अंगठ्या, नेकलेस, टॉप्स), चांदीचे दागिने आणि ७० हजार रुपयांची रोख रोकड असा एकूण ४,६६,०७१ रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

तपासाचे आव्हान

याप्रकरणी झिनतबानो सिद्दीकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, इमारतीतील आणि परिसरातील रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली जात आहे. चोरट्यांनी घराची रेकी केली होती का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!