UMC Election Results 2026 : उल्हासनगरमधील प्रभाग 1ची रचना कशी असणार? वाचा सविस्तर

UMC Election Results 2026 : राज्यात महापालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला होणार आहे तर 16 ला मतमोजणी होणार आहे. उल्हासनगर प्रभाग क्रमांक एकची रचना कशी आहे, लोकसंख्या किती आहे चला जाणून घेऊया...

UMC Election Results 2026 : उल्हासनगरमधील प्रभाग 1ची रचना कशी असणार? वाचा सविस्तर
Ulhasnagar Ward-01
Image Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:44 AM

UMC Election Ward No 1: राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणुक आयोगाने 15 जानेवारी महापालिका निवडणुकांचे मतदान होणार असल्याची घोषणा केली. तसेच 16 जानेवारी मत मोजणी होणार असल्याचे सांगितले. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 01मध्ये आता गेल्या वर्षीच्या तुलनेत वॉर्ड कमी करण्यात आले आहेत. यंदा प्रभाग क्रमांक 1मध्ये चार वॉर्ड असणार आहेत. या वॉर्डमध्ये एकूण लोकसंख्या किती आहे, तसेच हे वॉर्ड कसे विभागण्यात आले आहेत चला जाणून घेऊया सविस्तर…

प्रभाग 1मधील आरक्षण

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जातींसाठी एकूण 13 जागा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 7 जाग्या या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी 1, नागरिकांचा मागसवर्ग प्रवर्गासाठी 21 जागा आहेत. त्यापैकी 11 महिलांसाठी राखीव आहेत. जनरल वर्गासाठी 43 जागा आहेत. त्यापैकी 20 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण 78 जागा आहेत. त्यापैकी 39 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रभागमध्ये 1-अ वॉर्डमध्ये अनुसुचित जाती, 1-ब मध्ये अनुसूचित जमाती (महिला), १- क नागरिकांचा मागास वर्ग (महिला) आणि 1- ड ही सर्वसाधरणसाठी आरक्षण देण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक १ची व्याप्ती

उल्हासनगरचा प्रभाग क्रमांक १मध्ये कल्याण मुरबाड रोड, आय.डी. आय कंपनी, अमर डाय लि., नाका क्रमांक १०, रीजन्सी अँटिलिया, गुलशन नगर, शहाड गावठाण, बिर्ला मंदिर परिसर, सेंच्युरी रेयॉन कॉलनी, धोबीघाट, प्रमोद महाजन चौक, शिवनेरी नगर, टिळक नगर, एमआयडीसी रोड, विवेकानंद शाळा परिसर, नीळकंठ मंदिर, शहाड रेल्वे स्टेशन हा परिसर येतो.

प्रभाग रचना

उल्हासनगरचा प्रभाग क्रमांक १चा विस्तार हा उत्तर- उल्हास नदीस लागून उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीपर्यंत.

कल्याण-मुरबाड रोडने उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीपासुन, मुरबाड चौक

पूर्व-नाका क्र. १०, स्मशानभूमीजवळील चौक (सुनील चौक) पर्यंत. ते

दक्षिण – स्मशानभूमीजवळील चौक (सुनील चौक), स्व्. प्रमोद महाजन चौक (फकड मंडळी चौक) मार्गे, दरेकर रेशन दुकानाच्या बाजूने जाणाऱ्या मार्गाने, श्री सुरेश पाटील यांच्या घराजवळून, टिळक नगर, इंदिरा नगर, गंगोर चौक, उत्तम अपार्टमेंट यांचा समावेश करून, विवेकानंद शाळेजवळील पायऱ्यांमार्गे एमआयडीसी टैंक रोडपर्यंत, शेख किराणा स्टोअरसह शिवनेरी नगरचा समावेश करून, शिव रोडने नीलकंठ मंदिरांपर्यंत आणि त्यानंतर कल्याण- मुरबाड रोडला लागून, मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावरील जुन्या पालिकेच्या नाक्यापर्यंत.

2017 सालचे विजयी उमेदवार कोण?

1अ अर्चना गोकुळ करणकाळे अनुसूचित जाती भाजप

1ब मंगल बाळकृष्ण वाघे अनुसूचित जमाती- आरपीआय

1क जयश्री ज्ञानेश्वर पाटील -ओबीसी भाजप

1ड ज्योती पाटील गायकवाड सर्वसाधारण -स्त्रियांसाठी शिवसेना

2017 साली उल्हासनगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन वॉर्डमध्ये भाजपचा विजय झाला होता. त्यामध्ये 1अ आणि 1क चा समावेश आहे. एका वॉर्डात शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. तर एक वॉर्ड आरपीआयने आपल्या नावावर केला होता. आता 2026च्या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE