AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील सर्वात मोठी बातमी; निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

मोठी बातमी समोर येत आहे, वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत, त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील सर्वात मोठी बातमी; निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक
nilesh chavan
| Updated on: May 30, 2025 | 4:22 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या आहेत, त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आई-वडिलांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. समोर आलेल्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.

काय आहे निलेश चव्हाणवर आरोप 

वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं, वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, त्यानंतर देखील त्याची काही प्रकरण समोर आली होती, त्यानंतर तो फरार झाला होता, त्याच्याविरोधात स्टँडिंग वारंट देखील काढण्यात आलं होतं. सुरुवातील पोलिसांच्या तीन पथकांकडून निलेश चव्हाण याचा शोध घेण्यात येत होता, त्यानंतर पोलिसांची पथकं वाढवण्यात आली, सहा पोलिसांच्या पथकाकडू निलेश चव्हाणचा शोध सुरू होता, अखेर आज त्याला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जाऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसेच वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला धमकावल्याचा आणि त्यांच्यावर बंदूक रोखल्याचा देखील त्याच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता, त्याने नेपाळ गाठलं होतं. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तो वैष्णवीची नणंद असलेल्या करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे. अखेर आता पोलिसांनी त्याला नेपाळमधून अटक केलं आहे, त्याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वैष्णवीची, सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी 

दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेली वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना गुरुवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. तर दुसरीकडे वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत. बुधवारी न्यायालयानं त्यांच्या पोलीस कोठडीत 31 मे पर्यंत वाढ केली.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...