वसई विरारमध्ये पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, तर 52 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आज (10 एप्रिल) दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले (Vasai Virar Corona Cases) आहेत. त्यामुळे वसई विरारमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

वसई विरारमध्ये पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, तर 52 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

वसई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला (Vasai Virar Corona Cases) आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आज (10 एप्रिल) दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. वसई विरार परिसरात राहणाऱ्या एका 57 वर्षीय पुरुषाला तर 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे वसई विरारमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

वसई विरारमध्ये राहणाऱ्या एका 57 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याला (Vasai Virar Corona Cases) कोरोनाची लागण झाली आहे. ते अंधेरीतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर ते विरारमधील एका इमारतीत राहतात. सध्या त्यांच्यावर नालासोपारा पश्चिमेकडील रिध्दीविनायक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील चार जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

तर दुसरीकडे वसईत राहणाऱ्या एका 52 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र 5 एप्रिलला कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आता त्याच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या तिला रुग्णालयात आयसोलेशन विभागात दाखल केलं आहे.

दरम्यान सध्या वसई विरार क्षेत्रात 31 जणांना कोरोना झाला आहे. तर पालघरमध्ये 2 जण कोरोना बाधित आहे. तर यातील 4 जणांचा मृत्यू झाला (Vasai Virar Corona Cases) आहे.

महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Maharashtra COVID 19 Positive) आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी 3 कोटींची मदत

महाबळेश्वर पर्यटन भोवलं, वाधवान कुटुंबासह 23 जणांवर गुन्हे, पाचगणीत 14 दिवस क्वारंटाइन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *