कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर

वसईत आज 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका 38 वर्षीय महिला आणि 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे (Vasai-Virar Corona update).

चेतन पाटील

|

Apr 15, 2020 | 3:20 PM

वसई : राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Vasai-Virar Corona update). वसईत आज 2 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका 38 वर्षीय महिला आणि 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत आतापर्यंत 49 तर ग्रामीण भागात 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वसई ताल्युक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 52 वर पोहोचली आहे (Vasai-Virar Corona update).

वसईत नव्याने आढळलेला 35 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण हा मुंबईच्या कुर्ला परिसरातून वसईत वास्तव्यास आला होता. गेल्या 4 दिवसांपासून तो क्वारंटाईनमध्ये होता. मात्र, आज त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. तर दुसरी 38 वर्षीय कोरोनाबाधित महिला ही विरार पश्चिमेकडील रहिवासी आहे.

वसई ताल्युक्यात आतापर्यंत 5 कोरोनाबाधित रुगणांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेने कोरोनावर मात केली आहे. वसई-विरारमध्ये काल म्हणजेच 14 एप्रिल रोजी 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा 2 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्वोत्तोपरी मेहनत घेत आहे. सर्वांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 702‬ वर पोहोचली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वाधिक 1 हजार 774 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 178 कोरोनाबळी गेले आहेत. यात मुंबईत 112 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.

मुंबईत दादर-माहिम-धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढतेच

दरम्यान, मुंबईला कोरोनाचा विळखा सातत्याने वाढताना दिसत आहे. मुंबईत वरळीनंतर आता दादर, धारावी, माहिम परिसरातील रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज दादरमध्ये 2, धारावीत 5, माहिममध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर मुंबईतील भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे मुंबईत आज (15 एप्रिल) 18 रुग्णांची वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या : 

नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मात

धक्कादायक! नागपुरात थेट मेडिकल स्टोअर्सधून दारुची विक्री

हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें