हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर

हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर

नागपुरात दारुची दुकाने बंद असल्याने नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Hand Sanitizer use as Drug Nagpur) आला आहे.

Namrata Patil

|

Apr 15, 2020 | 8:23 AM

नागपूर : राज्यात कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत (Hand Sanitizer use as Drug Nagpur) लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रात संचारबंदीदरम्यान सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे तळीरामांना दारु मिळणे कठीण झालं आहे. मात्र नागपुरात दारुची दुकाने बंद असल्याने नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर (Hand Sanitizer use as Drug Nagpur) करण्यात येत होता. हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु असल्याचे काही जण मद्यपींना सांगत  होते. त्यानंतर याची विक्री सुरु होती. नागपूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

यावेळी आरोपी आशू गुप्ताच्या घरातून हँड सॅनिटायझरच्या 46 बॉटल जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे हॅंड सॅनिटायझर दारु म्हणून विकणाऱ्यांवर नागपुरात पहिल्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्व ठिकाणी सॅनिटायझर सहज उपलब्ध होत आहे. मात्र काही लोक या गैरफायदा उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासनाने बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्याविरोधात कारवाई केली आहे. मात्र आता सॅनिटायझरचा नशेसाठी उपयोग करण्यात येत असल्याचे धक्कादायक प्रकारही उघडकीस येत आहेत.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पण नागरिक सरकारच्या सूचनांचे पालन करत नसल्याने दिसत आहे. त्यामुळे अनेकांवर कारवाई करण्यात येत (Hand Sanitizer use as Drug Nagpur) आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें