गिरीश महाजनांना नाशिकचं प्रकरण भोवणार? प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयानं खळबळ; मोठी अपडेट समोर!

गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकदाही नाव घेतले नाही, असा आरोप केला जातोय. याबाबत प्रकास आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

गिरीश महाजनांना नाशिकचं प्रकरण भोवणार? प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयानं खळबळ; मोठी अपडेट समोर!
PRAKASH AMBEDKAR AND GIRISH MAHAJAN
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 26, 2026 | 9:44 PM

Girish Mahajan : प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ध्वजवंदन कार्यक्रमामुळे मंत्री गिरीश महाजन चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रजासत्ताक दिन असताना त्यांनी संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या माधवी जाधव या कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला आहे. आंबेडकर हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा करत माधवी जाधव यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच माझी नोकरी गेली तरी चालेल, पण बाबासाहेब आंबेडकर हे नाव संपू देणार नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळीकडे संताप व्यक्त केला जात असताना गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली मोठा निर्णय जारी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका घेतली?

नाशिकमधील माधवी जाधव यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यांनी माधवी जाधव यांना थेट कॉल केला आहे. माधवी जाधव यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले आहे. तसेच महाजन यांच्या कथित कृत्याचा निषेध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स खात्यावर पक्षाच्या भूमिकेबाबत सविस्तर सांगितलं आहे. आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजनच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

गुन्हा नोंदवण्यास भाग पाडणार

तसेच, मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजप आणि गिरीश महाजनच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे म्हणत त्यांनी महाजन यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.