Vegetable in Nanded : नांदेडात टोमॅटो शंभर रूपये किलो; भाजीपाल्याच्या वाढत्या भावाने गृहिणींच्या तोंडचे पळाले पाणी

Vegetable in Nanded : नांदेडात टोमॅटो शंभर रूपये किलो; भाजीपाल्याच्या वाढत्या भावाने गृहिणींच्या तोंडचे पळाले पाणी
भाजीपाला
Image Credit source: tv9

नांदेड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामिण भागात गेल्या दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. ज्यामुळे त्याचा परिणाम हा शेतीवर झाला आहे. ज्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. ज्यामुळे भाजीपाल्यांची आवकीवर याचा परिणाम झाला आहे. तर भाजीपाल्याचे दर हे वधारले आहेत.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 18, 2022 | 4:34 PM

नांदेड : राज्यात मान्सून पुर्व पावसाने (Pre-monsoon rains) काही ठिकाणी हजेरी लावली असल्याने त्याचा फायदा तेथे होताना दिसतश आहे. तर पावसाने सुरूवात केल्याने शेतीच्या कामांना सुरूवात झाली आहे. तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. ज्याचा परिणाम शेतीवर झाला आहे. ज्यामुळे नांदेडमध्ये (Nanded) याचा फटका गृहिणींना चांगलाच बसताना दिसत आहे. आता शाळा सुरू झाल्याने मुलांच्या डब्यासाठी गृहिणीं भाजीपाला (vegetables) घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. मात्र नांदेडमध्ये भाजीपाल्याचे भाव वधारल्याचे पहायाला मिळत आहे. ज्यामुळे गृहिणींना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

भाजीपाल्याचे दर हे वधारले

नांदेड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामिण भागात गेल्या दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. ज्यामुळे त्याचा परिणाम हा शेतीवर झाला आहे. ज्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. ज्यामुळे भाजीपाल्यांची आवकीवर याचा परिणाम झाला आहे. तर भाजीपाल्याचे दर हे वधारले आहेत.

टोमॅटो 80 ते शंभर रूपये किलो

नांदेड शहरात ग्रमीण भागातून तसेच तेलंगणा, जळगाव, भुसावळमधून भाजीपाला येतो. आजमितीस कांदा वगळता सर्वच भाज्यांची दर वाढले आहेत. एरव्ही 40 ते 60 रुपये किलो मिळणारा टोमॅटो हा 80 ते शंभर रूपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे महिलांना काटकसरीने बाजार करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

दर कमी होण्याची शक्यता नाही

सध्या नांदेड मध्ये टोमॅटो 80 ते शंभर रुपये किलो दराने विकले जात आहे. तर त्यासोबतच सर्वच भाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत. मिरची 70 रुपये, कोथंबीर 60 रुपये, कोबी 80, भेंडी 60, गवार 80 रुपये किलो दराने घ्यावे लागच आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतात भाजीपाला खुप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक देखील खूप कमी झाल्याने हे भाव वाढल्याचे म्हटलं जात आहे. आता पेरणी होऊन दोन – तीन महिन्यानी नवीन उत्पादन बाजारात आल्यावरच दर कमी होण्याची शक्यता आहे . तो पर्यंत मात्र नागरिकांना महाग भाजीपाला घ्यावा लागणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें